Agripedia

उन्हाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरी पासून चांगले उत्पादन मिळवणे शक्या आहे. त्यासाठी योग्य नियोजन करावे. खरिपातील बाजरी पिकापासून अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे पीक पद्धतीत बदल करीत उन्हाळी बाजरी लागवड करणे आवश्यकक आहे.

Updated on 14 February, 2022 4:18 PM IST

उन्हाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरी पासून चांगले उत्पादन मिळवणे शक्‍य आहे. त्यासाठी योग्य नियोजन करावे. खरिपातील बाजरी पिकापासून अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे पीक पद्धतीत बदल करीत उन्हाळी बाजरी लागवड करणे आवश्‍यक आहे.

महाराष्ट्रामध्ये खानदेश,पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात उन्हाळी बाजरी घेतली जाते.

 या काळात उन्हाळ्यात हवामान कोरडे असल्याने अरगट, गोसावी, तांबेरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे धान्याची व चाऱ्याची गुणवत्ता चांगली मिळते. संरक्षित पाण्याची सोय असल्यास शेतकऱ्यांच्या फायद्यात वाढ होते.

  • जमिनीची निवड :-
  • उन्हाळी बाजरी साठी शक्यतो सपाट मध्यम ते भारीव 6.2 ते 8 सामू असणारी निवडावी.
  • लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या घ्याव्यात. दुसऱ्या कुळवाच्या पाळीच्या अगोदर चांगले कुजलेले हेक्टरी चार ते पाच टन शेणखत वापरावे. जमीन भारी असल्यास ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
  • संकरीत वाण :-

 उन्हाळी बाजरी फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीमध्ये वाऱ्याचा वेग व तापमान जास्त असल्याने काय वानांमध्येपरागीकरण आला अडचण येते.कणसात दाणे कमी भरतात. श्रद्धा, सबुरी असे अधिक उत्पादन देणारे तसेच केसाळ प्रकारातील अतिशय घट्ट कणीस असणारे वाण निवडल्यास पक्ष्यांचा त्रासही कमी होतो.

  • सुधारित वाण :- आय. सी.. पी. 8203 डब्ल्यू. सी. सी. 75 इ.
  • लागवड
  • संकरित बाजरीचे प्रमाणित बियाणे हेक्‍टरी चार ते पाच किलो वापरावे. पेरणीपूर्वी प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास 250 ग्रॅमऍझोस्पिरो लियम या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. शेत ओलावून वाफसा आल्यावर पेरणी करावे. पेरणी तीन ते चार सें.मी. पेक्षा जास्त खोल करू नये. बाजरीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ते फेब्रुवारी दुसऱ्या पंधरवड्यात केली तर फायद्याचे ठरते.
  • पेरणीस उशीर झाल्यास पीक जात किंवा वाणाप्रमाणे50-55 दिवसांनी फुलोऱ्यात येते. अशावेळी तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात.उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.
  • अंतर :- उन्हाळी बाजरी पेरताना दोन ओळीतील अंतर 30 ते 40 सें.मी. व दोन रोपांतील अंतर10 ते 15 सें. मी. ठेवावे. नंतर गरजेप्रमाणे विरघळणीकरून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.
  • खत व्यवस्थापन:-

 माती परीक्षणानुसार प्रति हेक्‍टरी 60 किलो नत्रव 30किलो स्फुरद घ्यावेत.यातील निम्मे नत्र पेरणीच्या वेळीव संपूर्ण स्फुरद, तर उर्वरित नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. तसेच पेरणीनंतर बाजरीची शेत पहिले 30 ते 35 दिवस तणविरहित ठेवावे.

  • पाणी व्यवस्थापन:- जमिनीच्या मगदुराप्रमाणे दहा ते पंधरा दिवसांनी पाणी द्यावे. पिकास पुढील पीक वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत पाणी दिल्यास चांगले उत्पादन मिळते.
  • पहिले पाणी 20 ते 25 दिवसानंतर : फुटवे येण्याची वेळी.
  • दुसरे पाणी 35 ते 45 दिवसांनी: पीक पोटरीत असताना.
  • दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी:कणसात दाणे भरतीवेळी.

पाण्याच्या दुसऱ्या पाळी अगोदर विकास हलकीशी भर दिल्यास, जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होतेव पीक जास्त वाऱ्यावर लोळत नाही.

  • उत्पादन :

 उन्हाळी बाजरीची हेक्‍टरी रोप संख्या योग्य प्रमाणात राखण्यास व योग्य वाणाची निवड केल्यास संकरित बाजरी चे उत्पादन हेक्‍टरी 35 ते 40 क्विंटल पर्यंत मिळते. याचा हिरवा चारा जनावरांना चांगला मानवतो.

English Summary: this proper method of summer millet cultivation for more production
Published on: 14 February 2022, 04:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)