Agripedia

जीवनसत्त्वे ए, बी, डी, ई, के, कॅल्शियम आणि झिंक यांसारख्या सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध आहे. याशिवाय अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाणही खूप चांगले असते.

Updated on 26 January, 2022 9:55 PM IST

जीवनसत्त्वे ए, बी, डी, ई, के, कॅल्शियम आणि झिंक यांसारख्या सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध आहे. याशिवाय अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाणही खूप चांगले असते. कारण शरीराला निरोगी राहण्यासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते. संडे हो या मंडे, रोज खावो अंडे, ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. काही प्रमाणात हे खरेही आहे. कारण, अंडी आपल्या सर्वांच्याच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे जीवनसत्त्वे ए, बी, डी, ई, के, कॅल्शियम आणि झिंक यांसारख्या सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

न्युट्रिशन एक्सपर्ट्सच्या मते, आपल्या आहारात दररोज अंड्यांचा समावेश केला पाहिजे. यामध्ये असलेले पोषक तत्व शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

 याशिवाय अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाणही खूप चांगले असते. कारण शरीराला निरोगी राहण्यासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते. अशा परिस्थितीत आहारातून ही पोषकतत्त्वे पूर्ण होऊ शकतात. या सर्व कारणांमुळे न्यूट्रिशनिस्ट देखील आहारात अंडी खाण्याचा सल्ला देतात.

हे सर्व पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. न्युट्रिशनिस्ट पूजा माखिजाने दैनंदिन मेनूमध्ये अंड्यांचा समावेश केल्याने होणारे फायदे सांगितले आहेत. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये कॅप्शन देत तिने लिहिले की - 'हेल्थ एक्सपर्ट्स अंडी हे एक संपूर्ण अन्न मानतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात, जी तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. अंडी खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.

अंडी गरोदर स्त्रीला व गर्भातील बाळाला पुरेसे पोषक तत्व पुरवतात. तज्ञ म्हणतात की अंडी निरोगी गर्भधारणेसाठी मदत करतात. त्यांच्यामध्ये असलेले फॉलिक ऍसिड स्पाइना बिफिडा सारखे जन्मजात अपंगत्व येणारे आजार रोखण्यासाठी प्रभावी आहे.

मेंदूचे कार्य सुधारते

अंडी हे मेंदूसाठी उत्तम अन्न मानले जाते. तज्ज्ञांनी सांगितले की, अंडी मेंदूचे आरोग्य वाढवतात. पूजाने सांगितले की - अंड्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात असतात. 

याशिवाय, अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये आढळणारे कोलीन हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे मेंदू आणि मज्जासंस्थेला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक असते.

वजन कमी करण्यासाठी

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अंडी तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंड्याचे सेवन देखील चांगले आहे. पूजा माखिजा सांगतात की, अंड्यांमध्ये असलेले प्रोटीन लोकांचे दीर्घकाळ पोट भरलेले ठेऊ शकते. व्यक्तीच्या कॅलरीज कमी करण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर असते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अंडी खाण्याचे फायदे देखील आहेत. पूजा माखिजा यांनी स्पष्ट केले की अंड्यांमध्ये जीवनसत्त्वे ए, बी-12 आणि सेलेनियम असतात, 

 जे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती हा अनेक रोग टाळण्याचा उत्तम मार्ग आहे.

स्नायू मजबूत करण्यासाठी

पूजा माखिजा यांनी सांगितले की, अंडी स्नायू मजबूत करण्यासाठी आणि नवीन स्नायू तयार करण्यास मदत करतात. अंड्याचा पांढरा भाग प्रथिने आणि अमीनो अॅसिड्सनी समृद्ध असतो. हे पोषक तत्व स्नायूंसह शरीराच्या ऊतींची देखभाल आणि दुरुस्ती करण्यास मदत करतात.

English Summary: This people eat eggs see more benifits
Published on: 26 January 2022, 09:55 IST