Agripedia

हरभरा पिकातील येणार्या खुरपणीचा खर्च कमी करण्यासाठी पेरणीपुर्वी

Updated on 06 October, 2022 8:04 PM IST

हरभरा पिकातील येणार्या खुरपणीचा खर्च कमी करण्यासाठी पेरणीपुर्वी फ्ल्युक्लोरँलीन बासालिन अथवा पेंडीमीथँलीन स्टॉम्प हे तणनाशक हेक्टरी १.५ लिटर, ५०० लिटर पाण्यातून फवारावे आणि कुळवाची एक पाळी द्यावी म्हणजे तणनाशक मातीत

चांगले मिसळण्यास मदत होते.हरभरा पेरणीनंतर २१ दिवसांनी कोळपणी It helps to mix it well. 21 days after gram sowing, harvesting आणि एक खुरपणी करावी.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खतरनाक सोयाबीनचे नवे वाण विकसित

आवश्यकता भासल्यास दुसरी खुरपणी हरभरा पीक फुलो-यात येण्यापुर्वी करावी.तणनाशके अनेक प्रकारची असतात.काही तणनाशके उगवण्यापूर्वी मारावयाची असतात,

तर काही उगवून आल्यानंतर मारावयाची असतात.काही फक्त एकदल व बारीक पानाच्या गवतावर परिणाम करतात तर काही द्विदल व मोठ्या पानाच्या गवतावर मारक ठरतात. काही तणनाशके पिकांना

अपाय न करता केवळ तणांचा बंदोबस्त करतात.तर काही पिकांनापण अपाय करतात.त्यमुळे कोणते तणनाशक केव्हा व किती प्रमाणात वापरावयाचे व कसे वापरावयाचे याची योग्य माहीती असणे आवश्यक आहे.

 

विनोद धोंगडे मो.नं.9923132233 मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)

English Summary: This method will reduce the cost of weed control in gram crop
Published on: 06 October 2022, 06:32 IST