Agripedia

विषय आहे संत्रा उत्पादक शेतकरी यांचा वाय-बार ही नागपूर संत्र्यामधील फळामध्ये येणारी शरीरशास्त्रीय विकृती आहे. यामध्ये फळांचा आकार लांब होत जातो.

Updated on 22 April, 2022 7:33 PM IST

विषय आहे संत्रा उत्पादक शेतकरी यांचा वाय-बार ही नागपूर संत्र्यामधील फळामध्ये येणारी शरीरशास्त्रीय विकृती आहे. यामध्ये फळांचा आकार लांब होत जातो.

कोणत्या बागेत ही समस्या आढळते?

आंबिया बहरामध्ये (फुलधारणा फेब्रुवारी ते मार्च) ही समस्या आढळते.याच बागेत मृग बहराच्या काळात ही समस्या आढळत नाही.वाय-बार मागील कारणे काय असावीत?फळांची वाढ व परिपक्वता काळामध्ये जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्यांशी ही विकृती संबंधित आहे.

मृग बहरातील फळे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत वाढतात व परिपक्‍व होतात. हा कालावधी साधारणतः कोरडा असतो. आंबिया बहरातील फळे पावसाळ्यात, म्हणजे जुलै ते ऑक्‍टोबर या कालावधीत वाढतात व परिपक्व होतात. त्यामुळे आंबिया बहरादरम्यान ही समस्या आढळून येते.जुलै ते ऑक्‍टोबर या काळात जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा असतो. परिणामी वनस्पतीवरील बाह्यवृद्धी-- होते. तसेच संजीवकाची असमतोल मात्रादेखील विकृतीचे कारण असू शकते.

सध्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि अचलपूर तालुक्‍यांमध्ये जमिनी जास्त खोल आहेत.

चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे. या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक आहे. या विभागामध्ये वाय- बार समस्या अधिक प्रमाणात दिसून आली आहे. पाण्याचा योग्य निचरा फायदेशीर ठरतो.हलकी जमीन व जेथे पाण्याचा निचरा होतो अशा ठिकाणी वाय- बार विकृती आढळत नाही. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र परिसरातील जमीन हलकी, 1-2 फूट खोलीची, कमी चिकण माती असलेली, क्‍ले लोम प्रकाराची व पाण्याचा निचरा होणारी आहे. या परिसरातील संत्रा लागवडीला ठिबकद्वारे पाणी देण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी वाय-बार आढळला नाही. या विषयावर केंद्रामध्ये अधिक संशोधन सुरू आहे.

उपाययोजना

नागपूर येथील राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्राच्या वतीने शिफारस केलेल्या उपाययोजना खालील प्रमाणे :

झाडांमध्ये हवा पुरेशी खेळती असावी.जुलै ते ऑक्‍टोबर या काळात मातीतील अतिरिक्त ओलावा कमी करण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा. पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी उताराला चर खोदावे (3 फूट रुंद आणि 3 फूट खोल).

जमिनीतील तण वेळोवेळी काढून बाग स्वच्छ ठेवावी.फळगळ कमी करण्यासाठी आंबिया बहरात जिबरेलिक ऍसिड व 2-4-डी या संजीवकांच्या फवारण्या केल्या आहेत. अशा बागांमध्ये वाय-बार संत्रा जास्त दिसत असेल, तर 1-2 वर्षे या फवारण्या बंद कराव्यात.

 

डॉ. एम. एस. लदानिया, 0712-2500325 

(राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, नागपूर)

English Summary: This lengthens the shape of the orange fruit.
Published on: 22 April 2022, 07:30 IST