Agripedia

कोरोनानंतर माणसाच्या आयुष्याची दिशा जशी बदलणार आहे,

Updated on 14 April, 2022 2:35 PM IST

कोरोनानंतर माणसाच्या आयुष्याची दिशा जशी बदलणार आहे, तशीच कृषी क्षेत्रात देखील मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. या बदलाची तयारी जे शेतकरी बांधव करतील त्यांचे पिकाला मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात मागणी असेल. लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतीउद्योग मोठ्या अडचणीत सापडला होता. तसेच बदलते हवामान, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ अशी अनेक आव्हाने शेतीसह क्षेत्रासमोर उभे आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अनेक नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक शेतीत तंत्रज्ञानाच्या (Protective farming) आधारे होत असलेले अनेक बदल पहावयास मिळत आहे. त्यातली जमेची बाजू म्हणजे शेतीत उपलब्ध भांडवलानुसारते करता येऊ शकतात. अशा प्रयोगातून शेतीच्या नाविण्यापूर्व संकल्पना सक्षम होत असून त्याचा शेतकऱ्यांना आधार होत आहे. त्यामुळे शेतकरी रास्त खर्चात शेती बदल करून उभी करू शकतो. अन त्यामुळे शेतीला व्यवसायचे स्वरूप देऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.

कधी प्रचंड मोठा दुष्काळ पडतो. तर कधी पाऊस पडूनही सिंचनाची अडचण येते. शेतकऱ्याच्या शेतापर्यंत तंत्रज्ञान न पोहचल्याने पर्याय अजूनही मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतीचे नियोजन केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शेतीत क्रांती घडत असताना नव्या पद्धतींचा अवलंब करून यशस्वी होणे काल प्राप्त झाले आहे. ठिबक सिंचनासारखी सूक्ष्मसिंचन पद्धत वापरून रास्त खर्चात सिंचन व्यवस्थापनाचे तंत्र शेतकर्‍याला मोठा आधार ठरले. त्यामुळे उपलब्ध पाण्यात सिंचनाची कार्यक्षमता वाढली. याच धर्तीवर नवीन प्रयोगांमध्ये संरक्षित शेती पद्धतीला मोठे महत्त्व आले आहे. शेतीत अनेक नवे बदल घडत असून शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास उंचावला असल्याचेही पहावयास मिळते. त्यामुळे बदलती शेती काळाची गरज मानून शेती बदलांच्या हाका ऐकू येऊ लागल्या आहेत.

संरक्षित शेतीने ठरतेय आधार :

शेतीत धोके वाढत असून हि जोखीम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल प्रयोगशीलतेकडे आहे. त्यामध्ये संरक्षित शेती पद्धती एक चांगला पर्याय म्हणून नावारूपाला आली. हंगामनिहाय नियंत्रित वातावरणात पिके घेऊन उत्पादन व गुणवत्तेत भरीव वाढ करता येऊ लागली आहे. त्यामध्ये शेतीत शेडनेट, ग्रीन हाऊस, पॉलीहाउस अशा विविध पद्धतींचा समावेश यामध्ये होतो. तापमान नियंत्रण, कीड रोगांपासून संरक्षण, वादळ वाऱ्यापासून पिकाचा बचाव होत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. पिकाच्या आवश्यकतेप्रमाणे वातावरण निर्मिती होत असल्याने हरितगृह वा शेडनेटगृहाचे अनेक फायदे समोर आले आहेत. ज्यामध्ये पीकवाढीसाठी आवश्यक असणारी वातावरण निर्मिती, गुणवत्तापूर्ण पीक उत्पादन या प्रमुख जमेच्या बाजू आहेत. संरक्षित शेती पध्दतीत तापमान कमी करण्यासह वातावरणातील अन्य घटकांचे नियंत्रण करण्यासाठी पॉलहाऊस शेडनेट, प्लस्टिक टनेल मल्चिंग पेपर या पध्द्तीचा वापर होऊ लागला आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्याचे प्रयोग यशस्वीपणे शक्य झाले आहे.

पीकसंरक्षण होण्यासह उत्पादनात होईल वाढ:

पिकाच्या आवश्यकतेप्रमाणे अनुकूल वातावरणनिर्मिती केल्यामुळे संरक्षित शेती पध्द्तीचा अवलंब शेतकरी करू लागले आहेत. वातावरणातील तापमान, आर्द्रता, प्रकाश आदी घटकांचे नियंत्रण ठेवले जाते. तर वापर गरजेनुसार केला जातो. शेडनेटगृहात मुख्यतः वातावरणातील तापमान कमी केले जाते. आर्द्रता, वारा यांचेही नियंत्रण शक्य होते. यासह पीक घेताना कमीत कमी निविष्ठांचा वापर, सिंचनाची कार्यक्षमता वाढ, रोग कीड नियंत्रण करता येते. मल्चिंग पेपरचा वापर केल्याने पिकक्षेत्रात आर्द्रता टिकवून बाष्पीभवन कमी प्रमाणात होण्यास मदत होते. 

तर वातावरण बदलामध्ये शेती टिकून राहणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे पॉलिहाऊस फिल्मच्या माध्यमातून शेती पिके घेताना अनेक बदल होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ असल्याचे पाहायला मिळते. बदलत्या हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही. हंगामी व बिगरहंगामी पिके वर्षभर यामध्ये घेता येतात. यासह गारपीट, अतिवृष्टी या संकटांपासून पिके वाचविता येतात. तर थेट पिकांवर पडणाऱ्या अतिनील सूर्यकिरणापासून बचाव होतो. तर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो.परिणामी काढणीच्या अवस्थेत मिळणारे उत्पादन वाढ होण्यासह टिकवणक्षमता चांगली असते.

क्रॉप कव्हरला शेतकऱ्यांची पसंदी :

अलीकडील काळात भाजीपाला व फळ पिकांत ‘क्रॉप कव्हर’ तंत्र शेतकऱ्यांमध्ये रुजून वापर वाढू लागला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तापमान वाढ झाल्यानंतर पिकांचे संरक्षण करावे लागते. त्यामुळे उपयुक्त व फायदेशीर पर्याय म्हणून विविध पिकांमध्ये ‘क्रॉप कव्हर’चा वापर होऊ लागला आहे. शेडनेटप्रमाणाचे हे क्रॉप कव्हर पिकउत्पादनाच्या संरक्षणासाठी वरदान ठरले आहे. पिकाच्या आतील बाजूस वातावरण नियंत्रण यासह किडी-रोगांना प्रतिबंध करण्यासह पिकाचा दर्जा सुधारून शेतमालाचे वजन वाढते. तीव्र उन्हाळ्यात ‘सनबर्न’ ही समस्या डाळिंबासारख्या पिकात जाणवते. त्यामुळे फळाची गुणवत्ता कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे दरावर परिणाम होतो. या समस्येवर मात करण्यासाठी त्यामुळे फुलोरा अवस्थेनंतर या कव्हरचा वापर फळांचे संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.

क्राँप कव्हरचा वापराचे फायदे 

कलिंगड व खरबूजावर व्हायरस, तुडतुडे,मावा या रसशोसक किडींचा प्रादुर्भावावर मात करण्यासाठी फायदेशीर क्राँप गार्डचा वापर रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी वापर, त्यामुळे शेतात असलेल्या किडीची संख्या समजते व कोणत्या किडीचा प्रादुर्भाव शक्य रोप लागवडीपासून रोपांना क्राँप कव्हरचे संरक्षण असल्यामुळे सुरूवातीच्या काळात किडींचा प्रार्दुभाव नियंत्रण वेलवर्गीय पिकांची निरोगी व जोमदार वाढ होऊन पानांचा आकार मोठा होण्यासाठी मदत

मल्चिंग पेपरचे फायदे 

बाष्पीभवन थांवून पाण्याची बचत

बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षारवरच्या भागावर येण्याचे प्रमाण कमी खतांच्या वापरात बचत होण्यासह वापर पश्चात अपव्यय कमी जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो. वार्षिक तणाच्या वाढीस प्रतिकार होतो. प्लास्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी-रोग प्रमाण कमी जमिनीचे तापमान वाढून निर्जंतुकीकरण होण्यास मदत आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होत असल्याने कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक

लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक सूत्रकृमीचे प्रमाण कमी होण्यासह पावसाच्या थेंबामुळे होणारी जमिनीची धूप होण्यास अटकाव

English Summary: This june july in month do also farming
Published on: 14 April 2022, 02:32 IST