आपण भाजीपाला पिकांचा विचार केला तर यामध्ये विविध वेलवर्गीय भाजीपाला, शेंगवर्गीय भाजीपाला पिके तसेच टोमॅटो, वांगी आणि मिरची सारखे प्रमुख भाजीपाला पिकांचा देखील समावेश होतो. भाजीपाला पिकांचा विचार केला तर कमीत कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत भरपूर उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न देणारे म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु भरघोस उत्पादनासाठी भाजीपाला पिकांच्या चांगल्या उत्पादनक्षम सुधारित जातींचा लागवडीसाठी वापर करणे देखील तितकेच गरजेचे असते.
नक्की वाचा:जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर करा या पिकाची शेती; तुम्ही लवकर श्रीमंत व्हाल
या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण वाल या भाजीपाला पिकाचा विचार केला तर बाजारपेठेमध्ये कायमच चांगली मागणी असणारे हे पीक असून अजून देखील हव्या त्या प्रमाणात वाल या भाजीपाला पिकाची लागवड शेतकरी बंधू करत नाहीत.
परंतु जर वाल या भाजीपाला पिकाच्या काही सुधारित जातींचा विचार केला तर त्यांच्या लागवडीतून एका हेक्टर मध्ये 100 क्विंटल च्या पुढे देखील उत्पादन मिळणे शक्य आहे. त्यामुळे या लेखात आपण अशाच काही महत्त्वपूर्ण सुधारित जातींची थोडक्यात माहिती घेऊ.
आहेत वालच्या काही सुधारित जाती
1- पुसाअर्ली प्रॉलरिफिक- वालाची ही जात खूप महत्त्वपूर्ण असून ही एक वेलीसारखे वाढते. जर तुम्हाला रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये लागवड करायची असेल तर ही जात खूप महत्वपूर्ण आहे. या जातीच्या वालाच्या शेंगा या पातळ व चपट्या असतात तसेच लांब असून वेलावर झुपक्याने वाढतात.
2- अर्का विजय- ही जात देखील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असून या जातीचे वालाचे पीक हे 70 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढते व झुडपवजा असते. या जातीच्या शेंगांची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर असते व रंगाने या हिरव्या असतात. अर्का विजय जातीपासून एका हेक्टर मध्ये 80 ते 90 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो गव्हाच्या 'या' जाती ठरत आहेत वरदान, शेतकरी बनतील लखपती..
3- पुना रेड- या जातीची लागवड प्रामुख्याने परसबागेमध्ये केली जाते. ही जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले असून या जातीची रोपे उंच व वेलीसारखे वाढत असल्यामुळे त्यांना आधाराची आवश्यकता असते. या जातीच्या शेंगांचा रंग लालसर असतो व आकार चपटा असतो. पुना रेड जातीच्या लागवडीतून एका हेक्टर मध्ये 120 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.
4- कोकण भूषण- वालाची ही जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली असून लागवडीनंतर लवकर काढण्यात येणारी जात असून लागवडीनंतर जास्तीत जास्त 55 ते 60 दिवसांनी काढणीस येते. कोकण भूषण जातीच्या वालाची झाडे 75 ते 80 सेंटीमीटर उंच वाढतात वर शेंगांची लांबी 16 सेंटीमीटर पर्यंत असते. एका हेक्टर मध्ये 80 ते 100 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
नक्की वाचा:एक एकर शेतीमध्ये कोथिंबीरीचे किती उत्पादन होऊ शकते आणि त्याला किती खर्च येईल? वाचा
Published on: 08 November 2022, 03:15 IST