Agripedia

जर आपण मूग या पिकाचा विचार केला तर तूर या कडधान्य पिकाच्या खालोखाल मुगाची लागवड महाराष्ट्र मध्ये खरीप हंगामात केली जाते. बऱ्याचदा कपाशी सारख्या पिकांमध्ये देखील मुगाची लागवड आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणावर केली जाते. या पिकापासून अगदी कमी कालावधीत जास्त नफा मिळतो. जर आपण बाजारपेठेतील बाजारभावाचा विचार केला तर मुगाला बाजारपेठेत कायमच चांगली मागणी असल्यामुळे दर देखील चांगले असतात.

Updated on 30 October, 2022 9:22 PM IST

जर आपण मूग या पिकाचा विचार केला तर तूर या कडधान्य पिकाच्या खालोखाल मुगाची लागवड महाराष्ट्र मध्ये खरीप हंगामात केली जाते. बऱ्याचदा कपाशी सारख्या पिकांमध्ये देखील मुगाची लागवड आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणावर केली जाते. या पिकापासून अगदी कमी कालावधीत जास्त नफा मिळतो. जर आपण बाजारपेठेतील बाजारभावाचा विचार केला तर मुगाला बाजारपेठेत कायमच चांगली मागणी असल्यामुळे दर देखील चांगले असतात.

नक्की वाचा:ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन बिजोउत्पादन करायचे असेल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सल्ला

त्यामुळे शेतकरी बंधूनी मुगाची लागवड करताना मुगाच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करणे खूप महत्त्वाचे असते. दर्जेदार जाती आणि चांगले व्यवस्थापन अगदी कमी कालावधीत मुगापासून बंपर उत्पादन देते. या लेखामध्ये आपण मुगाच्या दोन महत्त्वपूर्ण चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची माहिती घेऊ.

 मुगाच्या दोन चांगल्या उत्पादनक्षम जाती

1- कोपरगाव- मुगाचे हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी प्रसारित केले असून लागवडीनंतर 65 ते 70 दिवसांनी काढणीस तयार होते. या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे करपा तसेच पिवळा केवडा रोगास प्रतिकारक आहे.

नक्की वाचा:काळ्या तांदळाची लागवड बदलवणार शेतकऱ्यांचे नशीब! बाजारात मिळतोय 200 ते 300 रुपये किलो भाव

हा वाण मध्यम आकाराचा व हिरव्या रंगाचा असून दाणे चमकदार असतात. जर आपण या वाणाच्या 100 दाण्याचे वजनाचा विचार केला तर ते तीन ते साडेतीन ग्रॅम पर्यंत असते. या वाणाच्या लागवडीतून हेक्‍टरी सरासरी नऊ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते.

2- फुले मूग 2- हे वाण देखील शेतकऱ्यांसाठी खूप महत्वपूर्ण असून चांगले उत्पादन देणारे वाण आहे. लागवडीनंतर 60 ते 65 दिवसात काढणीस येते तसेच एका हेक्टरमध्ये उत्पादन 10 ते 12 क्विंटल पर्यंत मिळते.

या जातीचे दाणे मध्यम आकाराचे व हिरव्या रंगाचे असतात. याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे खरीप उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी महत्त्वाचे असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी प्रसारित केलेले वाण आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांच्या कापसाला १३ हजार रु. सोयाबीनला हजार रु. भाव घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही!प्रशांत डिक्कर.

English Summary: this is two veriety of moong crop is so productive and give more profit to farmer
Published on: 30 October 2022, 09:22 IST