Agripedia

वांगी हे भाजीपाला पीक असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रातील असे बरेच शेतकरी आहेत की एकदा लागवड केल्यानंतर वर्षभर वांग्याचे उत्पादन घेतात. हे एक भाजीपाला पिकांमधील महत्त्वपूर्ण पीक असून जर बाजारपेठेचा विचार केला तर संपूर्ण वर्षभर चांगली मागणी वांग्याला असते. व्यवस्थित व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन केलेली विक्री वांग्याच्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा मिळवून देऊ शकते.

Updated on 08 October, 2022 5:34 PM IST

वांगी हे भाजीपाला पीक असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रातील असे बरेच शेतकरी आहेत की एकदा लागवड केल्यानंतर वर्षभर वांग्याचे उत्पादन घेतात. हे एक भाजीपाला पिकांमधील महत्त्वपूर्ण पीक असून जर बाजारपेठेचा विचार केला तर संपूर्ण वर्षभर चांगली मागणी वांग्याला असते. व्यवस्थित व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन केलेली विक्री वांग्याच्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा मिळवून देऊ शकते.

नक्की वाचा:Chilli Crop: कराल 'या' किडीचा बंदोबस्त तरच येईल मिरची पिकातून येईल बंपर उत्पादन, नाहीतर बसेल आर्थिक फटका

 त्यासाठी पिकांसाठी आवश्यक असलेले जे काही व्यवस्थापन असते ते तर लागतेच परंतु सगळ्यात अगोदर महत्वाचे असते ते वांग्याच्या चांगल्या उत्पादनक्षम आणि सुधारित जातींची.

लागवड करत असलेले वांग्याची जात जर चांगली उत्पादनक्षम आणि दर्जेदार असेल तर निश्चितच त्या माध्यमातून चांगले उत्पादन मिळते. या लेखात आपण अशाच वांग्याच्या दोन दर्जेदार आणि चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती विषयी माहिती  घेऊ.

 वांग्याच्या दर्जेदार आणि चांगले उत्पादन देणाऱ्या जाती

1- पुसा पर्पल लॉंग-ही एक वांग्याची उच्च उत्पादन देणारी जात असून लवकर लागवडीसाठी ही फायदेशीर जात आहे. जर या जातीची लागवड लवकर केली तर या पासून मिळणारे उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने मिळते. ह्या जातीची लागवड शरद ऋतूमध्ये केली जाते. हिवाळ्यामध्ये या जातीच्या वांग्याला तयार होण्यासाठी सुमारे 75 ते 80 दिवसाचा कालावधी लागतो.

नक्की वाचा:Crop Vetiety: टोमॅटोची 'ही' जात शेतकऱ्यांच्या जीवनात घडवेल बदल, कमी कालावधीत देते जास्त उत्पादन

समजा तुम्ही जर वसंत ऋतूमध्ये  या जातीच्या वांग्याची लागवड केली तर लागवडीपासून साधारणतः 100 ते 110 दिवसांत काढणीस तयार होते. जर आपण या जातीपासून मिळणाऱ्या सरासरी उत्पादनाचा विचार केला तर प्रति हेक्‍टरी 300 क्विंटल इतके सरासरी उत्पादन मिळत असल्याचा देखिल दावा केला जातो.

2- पुसा हायब्रीड 5- ही वांग्याची एक सुधारित जात असून या जातीपासून मिळणारे  वांगे हे चमकदार आणि गडद जांभळ्या रंगाचे असते. वांग्याची ही जात चमकदार, आकर्षक आणि गडद जांभळ्या रंगाची असते व 

या जातीच्या एका वांग्याचे वजन सुमारे 100 ग्रॅमपर्यंत असते. या जातीपासून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर ते हेक्‍टरी 510 क्विंटल इतके मिळते.

3- याशिवाय वांग्याच्या महिको हायब्रीड नंबर 3, महिको रवैया, वायलेट लांब जातीमध्ये गुलाबी आणि एम एस 172 या जाती खूप चांगले आहेत.

नक्की वाचा:Crop Tips: महाराष्ट्रातील हवामानात उत्तम येणारी टोमॅटोची 'ही'जात शेतकऱ्यांसाठी ठरेल वरदान, वाचा डिटेल्

English Summary: this is two veriety of brinjaal crop is give more production and get profit
Published on: 08 October 2022, 05:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)