Agripedia

भाजीपाला पिकांमध्ये आपण विचार केला तर टोमॅटो भाजीपाला पीक खूप महत्त्वपूर्ण असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात टोमॅटोची लागवड केली जाते. जर आपण टोमॅटोचा एकंदरीत विचार केला तर उत्पादनाच्या दृष्टिकोनातून टोमॅटोचे उत्पादन भरपूर मिळते. परंतु बऱ्याचदा बाजार भावाच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. परंतु बाजार भाव हा विषय नंतरचा असल्याकारणाने अगोदर उत्पादन जास्त हातात येणे खूप गरजेचे असते.

Updated on 07 October, 2022 10:38 AM IST

भाजीपाला पिकांमध्ये आपण विचार केला तर टोमॅटो भाजीपाला पीक खूप महत्त्वपूर्ण असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात टोमॅटोची लागवड केली जाते. जर आपण टोमॅटोचा एकंदरीत विचार केला तर उत्पादनाच्या दृष्टिकोनातून टोमॅटोचे उत्पादन भरपूर मिळते. परंतु बऱ्याचदा बाजार भावाच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. परंतु बाजार भाव हा विषय नंतरचा असल्याकारणाने अगोदर उत्पादन जास्त हातात येणे खूप गरजेचे असते.

टोमॅटोचे जास्त उत्पादन हवे असेल तर त्यासाठी अगोदर त्याचे बियाणे म्हणजेच आपण लागवड करत असलेल्या टोमॅटोची जात चांगली उत्पादनक्षम आणि सुधारित असली पाहिजे.

लागवड केली जाणारी जात जर प्रगत आणि दर्जेदार उत्पादन देणारे असेल तर चांगले व्यवस्थापनाच्या आधारे निश्चितच टोमॅटोचे भरघोस उत्पादन हातात येते. म्हणून आपण या पार्श्वभूमीवर या लेखामध्ये टोमॅटोच्या एका प्रगत जातीबद्दल माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:Wheat farming: गहू लागवडीअगोदर बियाणे दर्जेदार आहे की नाही, अशाप्रकारे चुटकीसरशी ओळखा

नामधारी 4266 ही आहे टोमॅटोची सुधारित जात

  कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेली सुधारित जात असून लागवडीनंतर अवघ्या 45 दिवसांमध्ये काढणीस तयार होत असल्याचा दावा देखील जाणकारांकडून केला जात आहे. म्हणजे एकंदरीत अवघ्या दीड महिन्याच्या कालखंडानंतर या जातीच्या टोमॅटोपासून हातात उत्पादन यायला सुरुवात होते.

तसेच इतर जातीच्या टोमॅटो पेक्षा या जातीच्या टोमॅटो पासून जवळजवळ दुप्पट अधिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते. तसेच ही जात चांगल्यापैकी कीटक आणि विविध प्रकारच्या रोगांना प्रतिकारक असून कीटकनाशक यांच्यावर होणारा खर्च देखील शेतकऱ्यांचा वाचतो.

यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये बचत होते व साहजिकच उत्पादन आणि मिळणाऱ्या नफ्यात वाढ होते.नामधारी 4266ही जात चंद्रशेखर आजाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कानपूर( उत्तर प्रदेश) येथील शास्त्रज्ञांनी विकसित केली असून उत्तर प्रदेश मध्ये या जातीच्या टोमॅटोची लागवड शेतकरी करत आहेत. परंतु काही दिवसानंतर टोमॅटोचे या जातीची लागवड इतर राज्यात देखील होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:Crop Tips: टोमॅटोपासून हवे भरपूर उत्पादन तर वापरा 'या' टिप्स, मिळेल भरपूर उत्पादन आणि नफा

 या जातीच्या एकंदरीत लागवडीचा खर्च

 जर आपण कृषी क्षेत्रातील तज्ञांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये टोमॅटोची नामधारी 4266 या जातीची पॉलिहाऊसमध्ये लागवड करण्याची तयारी केली तर त्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे.

या जातीच्या लागवडीसाठी थोडे फार उष्ण हवामान चांगले असून सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत या जातीच्या टोमॅटोची रोपे पॉलिहाऊस मधील असलेल्या रोपवाटिकेत तयार केली जातात पण डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत चांगले उत्पादन हातात यायला सुरूवात होते.

काही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की या जातीच्या टोमॅटोला खूपच कमी प्रमाणात पाणी लागते व पाण्याची बचत मोठ्या प्रमाणावर होते. ठिबक सिंचनाच्याद्वारे पाण्याचे व्यवस्थापन केले तर या जातीच्या टोमॅटो पासून चांगले उत्पादन मिळते. जर आपण टोमॅटोच्या इतर जातींच्या तुलनेत याचा विचार केला तर

इतर जातींपासून हेक्‍टरी 400 ते 600 क्विंटल उत्पादन मिळते तर नामधारी 4266 या जातीच्या टोमॅटो लागवडीतून बाराशे ते चौदाशे क्विंटल उत्पादन मिळू शकते.  तसेच या जातीच्या एका झाडावर 50 ते 60 फळे आणि प्रत्येक घडावर चार ते पाच टोमॅटोची फळे आढळतात. जर आपण वजनाचा विचार केला तर इतर जातीच्या एका टोमॅटोचे वजन 50 ते 80 ग्रॅमपर्यंत असते तर या जातीच्या टोमॅटोचे वजन 100 ते 150 ग्रॅम असते.

नक्की वाचा:Crop Tips: महाराष्ट्रातील हवामानात उत्तम येणारी टोमॅटोची 'ही'जात शेतकऱ्यांसाठी ठरेल वरदान, वाचा डिटेल्स

English Summary: this is tommato crop veriety give more production in short time
Published on: 07 October 2022, 10:38 IST