रब्बी हंगाम आता तोंडावर आला असून ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण होऊन रब्बी हंगामाच्या तयारीला शेतकरी बंधू लागतील. रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. परंतु एकंदरीत आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये गव्हाची लागवड फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी विविध प्रकारच्या उत्पादनक्षम जाती असून त्यापैकी योग्य जातींची निवड ही फायद्याचे ठरते.
या लेखामध्ये आपण जर शेतकरी बंधूंना गहू लागवड करायची असेल तर आपण या लेखात तीन महत्त्वपूर्ण आणि चांगल्या उत्पादन देणाऱ्या जातींची माहिती घेऊ.
गव्हाच्या चांगले उत्पादनक्षम जाती
1- एमएसीएस 6222- या जातीची पेरणी महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते व ही 2010 मध्ये विकसित करण्यात आलेली जात आहे.
उत्पादनाच्या बाबतीत ही गव्हाच्या इतर जातींपेक्षा चांगली असून हेक्टरी 47 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या जातीत आहे. या जातीचा गहू लागवड केल्यानंतर 102 ते एकशे दहा दिवसांमध्ये काढणीसाठी तयार होतो.
2- पीडीकेव्ही सरदार-ही जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी विकसित केली असून गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी या जातीची लागवड करणे फायद्याचे ठरते.
या जातीच्या गव्हाची पेरणी केल्यापासून जवळजवळ 90 ते 100 दिवसात हा काढणीसाठी तयार होतो. या जातीच्या गव्हाची लागवड केली तर मिळणारे उत्पादन हे हेक्टरी 40 ते 42 क्विंटल इतके मिळते.
3- एमएसीएस 6478- गव्हाची ही सुधारित जात 2014 मध्ये विकसित करण्यात आले असून महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर या जातीच्या गव्हाची पेरणी करतात. या जातीच्या गव्हाचे दाणे चमकदार असते व पिकाची उंची मध्यम असते. या जातीच्या गव्हाची लागवड केल्यानंतर 100 ते 110 दिवसांत काढणीस तयार होतो व यापासून प्रति हेक्टरी 45 ते 48 क्विंटल उत्पादन मिळते.
नक्की वाचा:Wheat farming: गहू लागवडीअगोदर बियाणे दर्जेदार आहे की नाही, अशाप्रकारे चुटकीसरशी ओळखा
Published on: 06 October 2022, 03:59 IST