मक्याची लागवड महाराष्ट्रामध्ये तसेच भारतात अनेक ठिकाणी केली जाते. जर आपण मक्याचा वापराचा विचार केला तर बऱ्याच प्रकारची औद्योगिक उत्पादने तयार करण्यासाठी मक्याचा वापर केला जातो.
इतकेच नाही तर जनावरांचा चारा म्हणून देखील मक्याचा उपयोग होतो. भारतातीलच नव्हे तर जगातील पोल्ट्री उद्योगाचा डोलारा मका पिकावर उभा आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील मका एक शरीरासाठी आवश्यक असून अनेक प्रकारचे पौष्टिक मूल्ये आहेत.
तसे पाहायला गेले तर आपल्याकडे मका लागवड करताना विविध प्रकारच्या जातीची लागवड केली जाते. विशिष्ट भागांमध्ये विशिष्ट प्रकारच्या जाती या शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडलेले असतात.
परंतु पीक कुठलेही असो पिकांच्या नवनवीन जाति शोधण्याचे काम कृषी विद्यापीठे आणि विविध कृषी संस्था तसेच कृषी विज्ञान केंद्रे सातत्याने करत असतात.
अशाच परिस्थितीत अलमोडा येथील विवेकानंद हिल कृषी संशोधन संस्थेने मक्याच्या तीन नवीन वाण विकसित केले आहेत. हे खाण्यासाठी आणि उत्पन्नासाठी देखील भरघोस फायदा देणारे आहेत.
नक्की वाचा:पिक लागवड:अवघ्या 4 महिन्यात कमवू शकता 2 लाख रुपये, 'या' पिकाची लागवड ठरेल टर्निंग पॉइंट
या जाती प्रामुख्याने संस्थेने डोंगराळ भागासाठी विकसित केले असून या जातींना केंद्रीय प्रजाती प्रकाशन समितीची मंजुरी देखील मिळाली आहे.
शरीरासाठी आवश्यक अमिनो ऍसिड ट्रिप्टोफॅन आणि लायसिन हे घटक सामान्य मक्या पेक्षा या वानांमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी जास्त आहेत. या लेखात आपण या जातींची माहिती घेऊ.
मक्याचे तीन नवीन विकसित वाण
1- व्हीएल क्यूपीएम हायब्रीड 45- ही जात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा च्या ईशान्येकडील पर्वती प्रदेशासाठी आहे
या जातीमध्ये ट्रिप्टोफॅनचे प्रमाण 0.70, लायसिनचे प्रमाण 3.17 आणि प्रथिने यांचे प्रमाण 9.62 टक्के असून या प्रजातीमध्ये टर्सीकम आणि मेडिस फॉलीयर स्कॉर्चला देखील मध्यम प्रतिकारक असतो
नक्की वाचा:Farming Idea:एकदा लावा गुलाब आणि कमवा दहा वर्ष,गुलाबा पासून बनतात 'ही'उत्पादने
2- व्हीएल क्यूपीएम हायब्रीड 61- ही जात लवकर म्हणजे 85 ते 90 दिवसांत काढणीस तयार होते या जातीमधील पोषक तत्वांचा विचार केला तर ट्रिप्टोफॅन चे प्रमाण 0.76, लायसिन 3.30 आणि प्रथिनांचे प्रमाण 9.16 टक्के असून या प्रजातीमध्ये टर्सीकम आणि मेडिस फॉलियर स्कॉर्चला मध्यम प्रतिकारक असतो.
3- व्हीएल क्यूपीएम हायब्रीड 63- ही मक्याची जात 90 ते 95 दिवसांत काढणीस तयार होते. राज्यस्तरीय समन्वित चाचण्यांमध्ये त्यांचे सरासरी उत्पादन 4675 किलो प्रति हेक्टर आहे.
यामध्ये घटकांचा विचार केला तर ट्रिप्टोफॅन चे प्रमाण 0.72, लायसिन 3.20 आणि प्रथिनांचे प्रमाण 9.22 टक्के इतके आहे.
नक्की वाचा:लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे, आणि ही आहे बनविण्याची पध्दत
Published on: 08 July 2022, 06:41 IST