Agripedia

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून युरोप, रशिया, चीन आणि उत्तर अमेरिकेत याची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. जगातील उत्पादन अंदाजे एक कोटी टन असते.

Updated on 29 January, 2022 6:02 PM IST

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून युरोप, रशिया, चीन आणि उत्तर अमेरिकेत याची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. जगातील उत्पादन अंदाजे एक कोटी टन असते.

उष्ण हवामानातील पट्ट्यात हिवाळ्यात आणि समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी याची यशस्वी लागवड केली जाते. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात हे एक महत्वाचे हिवाळी भाजीपाला पीक आहे. महाराष्ट्र मध्ये पुणे,सातारा, नाशिक, अहमदनगर, धुळे,नागपूर, अमरावती आणि अकोला इत्यादी जिल्ह्यात हिवाळी हंगामात लागवड केली जाते. या लेखात आपण वाटाण्याच्या लवकर येणाऱ्या आणि मध्यम कालावधीत येणाऱ्या जातींची माहिती घेऊ.

वाटाण्याच्या लवकर येणाऱ्या जाती

  • असौजी- हे वाटाण्याचे लवकर येणारी जात भारतीय कृषी अनुसंधान संस्था येथे निवड पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. या जातीची वेल बुटके असून शेंगा गडद हिरव्या रंगाच्या व साडेसात सेंटिमीटर लांब, किंचित वाकद आर आणि भरीव असतात. प्रत्येक शेंगे मध्ये 6 ते 7 दाणे असतात.
  • मिटिओर- इंग्लंड मधील गोल बियांची एक जात असून सत्तर दिवसात तयार होते व दाणे गोड असतात.
  • अलिंबॅजर- या अमेरिकन जात असून ऑक्टोबरच्या सुरुवातीला लावण्यास योग्य आहे. बुटकी आणि सुरकुतलेल्या बीयांची जात असून शेंगांची पहिली तोडणी 60 ते 65 दिवसात मिळते. शेंगा भरदार दाणे मोठे व गोड असतात.
  • आर्केल- हि सुरकुतलेल्या बियांची युरोपीयन जात आहे. शेंगा उत्तम प्रतीचे आणि दाणे गोड असून लागवडीपासून पहिली तोडणी 65 दिवसात मिळते.

मध्यम कालावधीत तयार होणारे वाटाण्याचा जाती…..

  • बोनविले- मध्यम वाडीची अमेरिकन जात उत्पादनाला फार चांगली आहे. शेंगा सुमारे आठ सेंटिमीटर लांब असून पहिली तोडणी 85 दिवसात मिळते. सुरकुतलेल्या बियांची ही जात बहुतेक राज्यातून चांगली सिद्ध झाली आहे. महाराष्ट्रात ही जात अत्यंत लोकप्रिय आहे.
  • परफेक्शन न्यू लाईन- ही जात परस्पर उत्पन्न देणारी असून मध्यम वाढीची जात आहे.शेंगा 8 सेंटिमीटर लांब, गडद हिरव्या रंगाच्या आहेत आणि दाणे गोड असतात. सुरकुतलेले बियांची ही जात 80 ते 85 दिवसात तयार होते.
  • फुले प्रिया- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सन 2010 मध्ये निवड पद्धतीने वाटाण्याच्या फुले प्रिया हासुधारित वाण विकसित केला असून पश्चिम महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागवडीकरिता शिफारस करण्यात आला आहे.हा वान शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व भूरी रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणाच्या शेंगा हिरव्या रंगाच्या,आकर्षक आणि चवीस गोड असून प्रत्येक शेंगांमध्ये आठ ते दहा दाणे असतात.या वाणापासून सरासरी हेक्‍टरी 100 क्विंटल हिरव्या शेंगांचे उत्पादन मिळते.
English Summary: this is the useful and benificial veriety of peanut crop for more producion
Published on: 29 January 2022, 06:02 IST