सूर्यफुलाचा जगातील तेलबिया पिकांमध्ये तिसरा क्रमांक लागतो. एकूण तेलबिया क्षेत्रापैकी 28 टक्के क्षेत्र सूर्य फुलांनी व्यापले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर,विदर्भातील बुलढाणा,अमरावती या जिल्ह्यात प्रामुख्याने घेतले जाते.
एकूण क्षेत्राचा विचार करता 70 टक्के क्षेत्र मराठवाड्यात आहे. महाराष्ट्रामध्ये सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता 727 किलो प्रति हेक्टर आहे. सूर्यफूल हा सूर्यप्रकाशात संवेदनशील नसल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात घेता येणारे महत्त्वपूर्ण तेलबिया पीक आहे.अशा या महत्त्वपूर्ण पिकाच्या काही सुधारीत वाणाविषयी या लेखात संक्षिप्त माहिती घेऊ.
सुर्यफुलाचे सुधारित वाण व त्यांची वैशिष्ट्ये…..
मॉडर्न
- या वाणापासून हेक्टरी 800 ते पंधराशे क्विंटल उत्पादन मिळते.
- या वानाचा कालावधी हा 80 ते 85 दिवसाचा आहे.
- यामध्ये तेलाचे प्रमाण 34 ते 35 टक्क्यांपर्यंत आहे.
- संपूर्ण भारतात लागवडीसाठी शिफारसित
- बुटकी व लवकर येणारी जात आहे.
एस.एस.56
- यापासून हेक्टरी आठशे ते चौदाशे क्विंटल उत्पादन मिळते.
- या वानाचा कालावधी 82 ते88 दिवसाचा आहे.
- यामध्ये तेलाचे प्रमाण 34 ते 36 टक्के आहे.
- संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस
- लवकर येणारी जात आहे.
टी.एन.ए.यु.एस.यु.एफ.-7
- याजातीपासूनहेक्टरी 1000 ते 1700 क्विंटलउत्पादनमिळते.
- याचा कालावधी हा 85 ते 90 दिवसांचा आहे.
- या जातीत तेलाचे प्रमाण 38 ते 41 टक्क्यांपर्यंत आहे.
- लागवड क्षेत्रासाठी संपूर्ण भारतात शिफारस
- लवकर येणारी जात आहे.
डी.आर.एस.एफ.108
- याजातीपासूनहेक्टरी 900 ते 1800 क्विंटल उत्पादनमिळते.
- कालावधीहा 95 ते 100 दिवसांचा आहे.
- यामध्ये तेलाचे प्रमाण 36 ते 39 टक्क्यांपर्यंत आहे.
- संपूर्ण भारतात लागवडीसाठी शिफारस
- या वानांमध्ये अधिक तेलाचे प्रमाण आहे.
एल.एस.एफ.-8
- या जातीपासून हेक्टरी 1000 ते चौदाशे क्विंटल उत्पादन मिळते.
- याचा कालावधी 90 ते 95 दिवसाचा आहे.
- यामध्ये तेलाचे प्रमाण 36 ते 39 टक्के आहे.
- संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागवडीसाठी उपयुक्त
- हे वान केवडा, ठिपके व तांबेरा रोगास प्रतिकारक आहे.
भानू(एस.एस.2038)
- या जातीपासून हेक्टरी 1000 ते 1400 क्विंटल उत्पादन मिळते.
- त्याचा कालावधी हा 85 ते 90 दिवसांचा आहे.
- 34 ते 36 टक्के तेलाचे प्रमाण असते.
- महाराष्ट्रासाठी लागवडी उपयुक्त
- अधिक उत्पादन देणारी जात आहे.
डी.आर.एस.एफ.113
- यापासून हेक्टरी 1000 ते 1500 एक क्विंटल उत्पादन मिळते.
- याचा कालावधी हा 90 ते 98 दिवसाचा असतो.
- यामध्ये तेलाचे प्रमाण 36 ते 39 टक्के आहे.
- संपूर्ण भारतात लागवडीसाठी उपयुक्त.
- अधिक उत्पादन देणारी जात
Published on: 18 January 2022, 11:04 IST