Agripedia

कलिंगड लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्याला माहित आहेच की,उन्हाळा ऋतुत कलिंगडला सर्वाधिक मागणी असते. या पिकाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे कमी कालावधीत चांगला नफा देऊ शकणारे पिक आहे. या पिकापासून भरघोस उत्पादन मिळावे यासाठी आपण कलिंगडच्या काही महत्त्वपूर्ण जातींची माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Updated on 01 October, 2022 12:44 PM IST

कलिंगड लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्याला माहित आहेच की,उन्हाळा ऋतुत कलिंगडला सर्वाधिक मागणी असते.  या पिकाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे कमी कालावधीत चांगला नफा देऊ शकणारे पिक आहे. या पिकापासून भरघोस उत्पादन मिळावे यासाठी आपण कलिंगडच्या काही महत्त्वपूर्ण जातींची माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

नक्की वाचा:हरभऱ्याच्या फुले विक्रम पीडीकेव्ही कांचन (एकेजी 1109) या वाणाची गुणवैशिष्ट्ये

कलिंगडच्या सर्वात्कृष्ट उत्पादनक्षम जाती

2- मधु- ही एक संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात व फळांची साल गर्द हिरवी असते. एका फळाचे वजन सहा ते सात किलो भरते. आतील गर भरपूर लाल असतो. या जातीला देखील बऱ्यापैकी मागणी असते.

2- अर्का माणिक- या जातीची फळे आकाराने मोठी व गोल असतात. एवढेच नाही तर साल गर्द हिरव्या रंगाची व मध्यम जाडीचे असते.

3- मिलन- ही जात लवकर काढणीस तयार होणारी असून फळे लंबगोल आकाराची असतात व वजन सहा ते सात किलो असते.

4- अमृत- ही महिको कंपनीचे संकरित जात असून फळे मध्यम आकाराची व किंचित लांबट गोल असतात. या जातीची फळे पाच ते सात किलो वजनाची असून फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो व बी कमी असते.

5- शुगर बेबी- या जातीच्या फळांची साल गर्द हिरव्या रंगाची व कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्ता सारखे पट्टे असतात. आतील गर लालभडक रंगाचा व खायला रवाळ व गोड असतो. महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक लागवड या जातीची होते.

नक्की वाचा:Vegetable Tips: 'या'सुधारित जातींची लागवड देईल दोडका उत्पादन भरघोस, मिळेल भरपूर नफा

 संकरित जाती

1- ऑगस्टा- ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळांचा आकार गोल असतो व सालीचा रंग काळपट गर्द हिरवा असतो. सरासरी वजन सात ते दहा किलो भरते. आतील गर आकर्षक लाल व चवीला गोड असते. दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी हे उत्कृष्ट वाण आहे.

2- बादशाह-  लवकर तयार होणारी जात असून फळे धरण्याची क्षमता उत्तम आहे. फळाचा आकार लांबट गोल व गर्द हिरवे पट्टे असलेले फळ असते. एका फळाचे वजन सरासरी आठ ते दहा किलो असते.  दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी हे वाण उत्तम आहे.

3- शुगर किंग- अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल असलेली जात आहे. फळांचा आकार गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा असतो. आतील गर आकर्षक लाल रंगाचा असून चवीला गोड असते. या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही जात मर रोगास प्रतिकारक आहे.

4- शुगर क्वीन- या जातीच्या फळांची साल गर्द हिरव्या रंगाची असते व आतील गर लाल व कुरकुरीत असतो. साखरेचे प्रमाण 12 ते 14 टक्के असते व या जातीमध्ये फळधारणा उत्तम होते.

नक्की वाचा:Chilli Crop: मिरचीच्या 'या' 10 जाती म्हणजेच शेतकरी बंधूंसाठी भरघोस उत्पन्नाची हमी, वाचा डिटेल्स

English Summary: this is the so profitable and more productive veriety of watermelon
Published on: 01 October 2022, 12:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)