ज्यांनी तुरीचे शेंडे खुडले नसतील आणि ज्यांनी अगोदर खुडणी केली असेल त्यांनी हा पाऊस कमी होताच शेंडे खुडणी करावी. ही संधी दवडू नये हीच योग्य वेळ का ?तुरीचे शेंडे केंव्हा खुडावीत ?पारंपारिक पद्धतीने ज्यांनी पेरणी केली असेल त्यांनी सोयाबीनची वाढ अवस्था संपल्यानंतर म्हणजे सोयाबीन फुल लागुन नुकतेच काही फूले आणि शेंगा
दीसु लागतात ती अवस्था. या नंतर सोयाबीनची ऊंची वाढणे थांबते व तुर सोयाबीन पेक्षा उंच दीसते तेंव्हा वर आलेले शेंडे खुडावेत शास्त्रीयदृष्ट्या तुरीचे शेंडे ३०-४५-६० दीवसांनी खुडावेत ते चुकीचे आहे का ?नाही ते अगदी बरोबर आहे .परंतु ते कोणत्या लागवड पध्दतीत करावेत हे सुध्दा महत्त्वाचे आहे.पारंपारिक पद्धतीने या पध्दतीने शेंडे खुडणे चुकीचे आहे.It is wrong to do this traditional method.
सोयाबीन तुर पेरणी करतांना ज्यांनी तुरीच्या दोन्ही बाजूला कीमान २.५ ते ३फुट अंतर सोडले आहे फक्त त्यांनीच २५-४०-५५ दीवसांनी शेंडे खुडणी करावी.असे का ?पारंपारिक पद्धतीने पेरणी केली तर सोयाबीन मधील तुरीला सोयाबीनच्या उंचीपर्यंत सुर्य प्रकाश मीळत नाही त्यामुळे तुर सुर्यप्रकाश मीळतो तोपर्यंत आपल्या फांद्या ठेवते परंतु सोयाबीन वाढल्याने तुरीच्या ज्या फांद्यांना सुर्यप्रकाश मीळत नाही त्या फांद्या सोडुन देते.
त्यामुळे अगोदर खुडणीचा काहीच फायदा होत नाही. परंतु ज्यांनी तुरीला सुर्यप्रकाश मीळेल ऐव्हढे अंतर ठेवले असेल त्यांनी अगोदर खुडणी करावी.हे खरे आहे का?होय याची आपण पडताळणी कराच . आपण दरवर्षी पाहतो पण निरक्षण नाही.सोयाबीन कापणी नंतर तुरीचे निरक्षण करा तुमचे सोयाबीन जेव्हढे वाढले होते त्या ऊंची पेक्षा जास्त उंचीवर तुरीच्या फांद्या दीसतील.थोडक्यात आता एक नंतर शक्य झाल्यास पुन्हा एकदा तुरीची खुडणी करावी.
Published on: 20 August 2022, 04:26 IST