Agripedia

भाजीपाला पिकांमध्ये मिरची लागवड बरेच शेतकरी करतात. महाराष्ट्रामध्ये मिरचीची लागवड बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. अनेक शेतकरी बंधुंनी मिरची पिकाच्या माध्यमातून चांगले आर्थिक प्रगती केली आहे. परंतु या आर्थिक प्रगतीमध्ये शेतकऱ्यांची योग्य नियोजन तसेच पाणी व्यवस्थापनापासून तर खत व्यवस्थापनाकडे अत्यंत अचूक नियोजन असल्यामुळेच ही गोष्ट शक्य होते.

Updated on 03 October, 2022 12:53 PM IST

 भाजीपाला पिकांमध्ये मिरची लागवड बरेच शेतकरी करतात. महाराष्ट्रामध्ये मिरचीची लागवड बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. अनेक शेतकरी बंधुंनी मिरची पिकाच्या माध्यमातून चांगले आर्थिक प्रगती केली आहे. परंतु या आर्थिक प्रगतीमध्ये शेतकऱ्यांची योग्य नियोजन तसेच पाणी व्यवस्थापनापासून तर खत व्यवस्थापनाकडे  अत्यंत अचूक नियोजन असल्यामुळेच ही गोष्ट शक्य होते.

त्यामुळे मिरची लागवड केली असेल किंवा करत असाल खत व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. जेणेकरून उत्पादन जास्त येईल आणि केलेल्या कष्टाचे व खर्चाचे चीज देखील होईल. या लेखात आपण मिरची पिकाचे खत व्यवस्थापन बद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Watermelon Veriety: कलिंगडचे 'हे' वाण देतील बंपर उत्पादन, वाचा 'या' वाणांची वैशिष्ट्ये

 मिरची पिकाचे व्यवस्थापन

 मिरची पिकासाठी जमिनीची पूर्वमशागत करत असताना जेव्हा तुम्ही वाफे तयार कराल त्याच्या अगोदर शेतामध्ये 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्‍टर जमिनीमध्ये मिसळून द्यावे.तसेच मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे.

नियोजन करताना लागवडीच्या वेळी संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धी मात्रा नत्राची द्यावी व लागवडीनंतर चार ते सहा आठवडे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे जेव्हा मिरची पीक फुलधारणेसाठी अवस्थेत असते तेव्हा नत्राचा अर्धा हप्ता द्यावा. तसेच जेव्हा लागवड कराल तेव्हा 20 ते 25 किलो फेरस सल्फेट व झिंक सल्फेट प्रति हेक्‍टरी द्यावे.

तसेच आठ ते दहा बॅग प्रति हेक्‍टर निंबोळी पेंडीचा वापर केला तर खूप महत्त्वपूर्ण ठरते. हे सर्व खते बेडमध्ये व्यवस्थित भरावे व त्यावर माती पसरून झाकून घ्यावेत. खतांची मात्रा दिल्या नंतर मिरचीला ताबडतोब पाण्याची व्यवस्था करावी व नंतर मिरचीच्या रोपाची लागवड करावी.

नक्की वाचा:Crop Tips: शेतकरी बंधूंनो! ज्वारीचे 'हे'वाण देईल पशुसाठी पौष्टिक हिरवा आणि वाळलेला चारा, वाचा डिटेल्स

 फवारणी ड्रीपद्वारे खतव्यवस्थापन

 मिरची पिकाची लागवड केल्यानंतर 25 ते 30 दिवसांनी फवारणीतून पाच मिलि प्रति लिटर आणि ड्रीपच्या माध्यमातून एक लिटर प्रति एकर मायक्रोन्यूट्रिएंट द्यावे.

जेव्हा पीक फुलोरा अवस्थेमध्ये असते तेव्हा दहा दिवसांच्या अंतराने फवारणीद्वारे सात ग्रॅम प्रति लिटर ड्रिप मधून तीन किलो प्रती एकर मायक्रोन्यूट्रिएंट द्यावे. तसेच लागवडीला 55 ते 60 दिवस झाल्यानंतर फवारणीच्या माध्यमातून पाच

मिलि प्रति लिटर ड्रीपद्वारे दीड लिटर प्रति एकर मायक्रोन्यूट्रिएंट द्यावे.फळधारणा व्हायला सुरुवात होते तेव्हा दोन वेळा दहा दिवसांच्या अंतराने फवारणीच्या माध्यमातून दहा ग्रॅम प्रति लिटर आणि ड्रिप मधून पाच किलो प्रती एकर द्यावे.

नक्की वाचा:केळी उत्पादकांनो सावधान! केळीवर घसा चोकिंग रोगाचा पादुर्भाव; करा उपाय अन्यथा मोठे नुकसान

English Summary: this is the proper way of the fertilizer management to chilli crop
Published on: 03 October 2022, 12:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)