Agripedia

शिमला मिरचीची लागवड मागील काही वर्षांपासून वाढत असून अगदी दोन ते तीन महिन्यात काढणीस तयार होत असल्यामुळे सिमला मिरची शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देत आहे. परंतु त्यासाठी या मिरचीच्या योग्य जातींची निवड करणे देखील खूप गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना कमी खर्चात, कमी कालावधीत चांगले उत्पादन देऊ शकतील, अशा महत्त्वपूर्ण जातींची या लेखात आपण माहिती घेऊ.

Updated on 25 September, 2022 10:21 AM IST

शिमला मिरचीची लागवड मागील काही वर्षांपासून वाढत असून अगदी दोन ते तीन महिन्यात काढणीस तयार होत असल्यामुळे सिमला मिरची शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देत आहे. परंतु त्यासाठी या मिरचीच्या योग्य जातींची निवड करणे देखील खूप गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना कमी खर्चात, कमी कालावधीत चांगले उत्पादन देऊ शकतील, अशा महत्त्वपूर्ण जातींची या लेखात आपण माहिती घेऊ.

नक्की वाचा:मिरची वरील डायबँक आणि फळ सडणे अण उपाय

 भारतातील शिमला मिरचीच्या सुधारित जाती

1- इंद्रा कॅप्सिकम- हे मध्यम उंच व वेगाने वाढणारे झुडूपवजा,  गडद हिरवी आणि दाट पाने असलेली जात आहे. या जातीची मिरची गडद हिरवी, जाड आणि चमकदार असते.

खरीप हंगामात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब  आणि ओरिसा या व इतर राज्यांमध्ये या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. लागवडीनंतर 70 ते 80 दिवसात ही मिरची काढणीस तयार होते.

2- इंडिया शिमला मिरची- झपाट्याने वाढणारी मिरचीची जात असून या मिरचीच्या चांगल्या वाढीसाठी लाल चिकन माती आवश्यक असते. मिरचीच्या लागवडीसाठी जून ते डिसेंबर या कालावधीत हवामान अनुकूल मानले जाते. लागवडीनंतर सुमारे 90 ते 100 दिवसांनी ही मिरची काढणीस येते.

नक्की वाचा:Crop Cultivation: 'अशा'पद्धतीने करा शेवग्याची लागवड, मिळेल भरपूर उत्पादन आणि नफा

3- कॅलिफोर्निया वंडर कॅप्सिकम- ही शिमला मिरचीची जात भारतातील सुधारित जातींपैकी एक असून या मिरचीचे झाड मध्यम उंचीचे असून फळांचा रंग हिरवा असतो. लागवडीनंतर सुमारे 75 दिवसांनी काढणीस येते व प्रति एकर उत्पादनाचा विचार केला तर ते 72 ते 80क्विंटल उत्पादन मिळते.

4- यलो वंडर सिमला मिरची- या जातीच्या मिरचीच्या झाडाची उंची मध्यम आकाराचे असून त्याचे पाने रुंद आहेत. या जातीचे मिरची लागवडीनंतर सुमारे 70 दिवसांनी काढणीस येते.

5- पुसा दीप्ती शिमला मिरची- हा वाण संकरित वाणापैकी एक आहे. या जातीच्या मिरचीचा रंग हलका हिरवा असतो व मिरची पिकल्यानंतर गडद लाल होतो. लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांत ही काढणीस तयार होते.

नक्की वाचा:Crop Tips: 'या' गोष्टींकडे लक्ष दिल्यास वांग्याचे उत्पादन वाढेल हमखास, वाचा सविस्तर

English Summary: this is the more productive and profitable veriety of capsicum chilli
Published on: 25 September 2022, 10:20 IST