कपाशी लागवड महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. खरीप हंगामातील हे खूप महत्त्वाचे पीक आहे. कपाशी पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. गुलाबी बोंड आळी, वेगवेगळ्या प्रकारचे रसशोषक कीटक त्यांच्यामुळे कपाशी पिकाचे अतोनात नुकसान होते. शेतावर बऱ्याचदा फुलकिडे आणि कोळी किडीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. या लेखामध्ये आपण फुलकिडे व कोळी कीड यांची प्रादुर्भावची कारणे आणि त्याची एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे ते पाहू.
नक्की वाचा:कापूस पिकास आले सोनीयाचे दिवस
कपाशी पिकावर फुलकिडे प्रादुर्भावाचे कारणे
बऱ्याच प्रमाणात कपाशी उत्पादक शेतकरी कपाशी लागवड करताना संकरित बियाण्यांचा वापर करतात. याला थायमेथोक्साम ( 70 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) किंवा इमिडाक्लोप्रिड याची बीजप्रक्रिया ही केलेली असते.
त्यामुळे जेव्हा आपण कपाशी लागवड करतो त्याच्या दीड महिन्यापर्यंत कपाशी पिकाला या किडीपासून संरक्षण मिळते. परंतु जेव्हा आपण कपाशी पिकाला फवारणी सुरुवात करतो तेव्हा इमिडाक्लोप्रिड किंवा थायमेथॉक्झाम याच वर्गातील कीटकनाशकांचा वापर जास्त प्रमाणात फवारणी साठी करतो.
त्यावेळेस नेमके उलटे होते. हेच कीटकनाशक फवारणी केल्यामुळे कीटकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकारक शक्ती त्यांच्याविरोधात विकसित होते असे दिसून आले आहे. त्यामुळे या कीटकांच्या विरोधात फवारणी करून देखील अपेक्षित परिणाम आपल्याला दिसून येत नाही.
आपण बऱ्याचदा इमिडाक्लोप्रिडचा एकापाठोपाठ जास्त फवारणी कपाशी पिकावर जर केल्या तर फुलकिडे यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे देखील झालेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.
असाच पद्धतीने जर आपण कोळी या किडीचा विचार केलातर ज्या ठिकाणी कोरडवाहू क्षेत्रात कपाशी लागवड केलेली असते व त्याला पाण्याचा ताण बसत असेल तर हे वातावरण या किडीसाठी पोषक आहे.
आपल्याला माहित आहेच की पाण्याचा ताण बसला तर कपाशीचे पळाले झाड मलुल,निस्तेज व पिवळसर दिसायला लागते.आणि हीच लक्षणे जर कोळीकिडीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर झाला तर त्यामुळे सुद्धा दिसते. पुढे बर्याच कपाशी उत्पादकांचा गोंधळ होण्याची शक्यता असते.
त्यामुळे पिकाचे सर्वेक्षण करणे खूप गरजेचे आहे. याबाबतीत शेतकऱ्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून आपण कोळीचा प्रादुर्भाव राहिला तर त्याचे लक्षणे कशी दिसतात हे पाहू.
या किडीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीची पाने वरच्या बाजूला ताणलेली किंवा आक्रसलेली दिसतात. तसेच हिरव्या पानांवर टाचणीच्या टोकासारखे पिवळसर पांढरी ठीपके दिसायला लागतात व हे ठिपके एकमेकांमध्ये मिसळून नंतर पाने पिवळळसर दिसायला लागतात
. तसेच काही वेळा पानाच्या मुख्य शिरा भोवती हलके तपकिरी चट्टे किंवा पान करपल्यासारखे अनियमित ठिपके दिसतात.
एकात्मिक व्यवस्थापन
1- कपाशी पिकाचे अंतर मशागत वेळेवर करून पिकामध्ये तन होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच अंबाडी किंवा रानभेंडी सारख्या पर्यायी खाद्य तणांचा नाश करावा.
2-रासायनिक खतांमध्ये जास्तीची नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.
3- ज्या पानांवर प्रादुर्भाव दिसत असेल ती पाने जमा करून किडीसह नष्ट करावीत.
4- जमिनीत ओलावा असेल तेव्हा फोरेट( दहा टक्के दाणेदार) एक किलो प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे.
Published on: 29 July 2022, 02:32 IST