Agripedia

काकडी हे पीक कमी खर्चात आणि कमीत कमी कालावधीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता ठेवते. अतिशय कमी वेळेमध्ये चांगला नफा शेतकऱ्यांना या पिकाच्या माध्यमातून मिळतो. जर व्यवस्थित व्यवस्थापन ठेवले तर काकडी पीक हे खूप शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. या लेखात आपण काकडी लागवडीचे सुधारित तंत्र आणि काही महत्त्वाच्या जाती विषयी माहिती घेऊ.

Updated on 15 October, 2022 4:05 PM IST

 काकडी हे पीक कमी खर्चात आणि कमीत कमी कालावधीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता ठेवते. अतिशय कमी वेळेमध्ये चांगला नफा शेतकऱ्यांना या पिकाच्या माध्यमातून मिळतो. जर व्यवस्थित व्यवस्थापन ठेवले तर काकडी पीक हे खूप शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. या लेखात आपण काकडी लागवडीचे सुधारित तंत्र आणि काही महत्त्वाच्या जाती विषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:Vegetable Farming: हिवाळ्यात या भाज्यांची लागवड करा आणि बंपर उत्पन्न कमवा; आरोग्यासही आहेत लाभदायक

 कारले लागवडीसाठी या गोष्टींकडे दया लक्ष

1- अशा पद्धतीने करा बरं लागवड- कारले लागवड करताना एका एकरासाठी एक ते दीड किलो बियाण्याची आवश्यकता असते व लागवडीआधी बिजप्रक्रिया करून घ्यावी. त्यासाठी काकडीच्या बिया 24 ते 48 तासांसाठी ओल्या फडक्यामध्ये किंवा पोत्यात बांधून ठेवाव्यात व बावीस्टीन वीस ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

काकडी लागवड करायच्या अगोदर जमिनीची नांगरणी करून जमीन भुसभुशीत करणे खूप गरजेचे आहे व त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत 12 ते 15 गाड्या टाकून घ्यावे.नंतर वखरणी करावी. तुम्हाला कोणत्या जातीची काकडी लागवड करायची आहे

त्या नुसार 90 ते 120 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात व त्यामध्ये टोकण पद्धतीने लागवड करावी. दोन ओळीतील अंतर 45 ते 55 सेंटीमीटर ठेवणे गरजेचे आहे व लागवड केल्यानंतर हलकेसे पाण्याचा पुरवठा करावा.

2- अशा पद्धतीच्या खत व्यवस्थापन ठरेल महत्त्वाचे- काकडीच्या अधिक उत्पादनासाठी एका एकराला दहा टन शेणखत आणि 90 किलो युरिया व त्यासोबत 120 किलो सुपरफॉस्पेट  35 किलो म्युरेट ऑफ पोटॅश खतांचा पुरवठा करणे गरजेचे आहे.

नत्राच्या एकूण प्रमाणापैकी अर्धा युरिया हा लागवड करताना द्यावा व उरलेला लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावा. ते देताना ते काकडीच्या वेलीभोवती रिंगण पद्धतीने द्यावी व त्यानंतर पाण्याचा पुरवठा करावा.

नक्की वाचा:Crop Veriety: शेतकरी बंधूंनो!वांगी लागवड करायचा प्लान आहे का? तर करा 'या' संकरित जातीची लागवड, मिळेल बक्कळ उत्पादन

3- अंतर मशागत आहे गरजेची- जर तुम्ही काकडीच्या वेलीला व्यवस्थित प्रकारे आधार दिला तर काकडीची प्रत सुधारते. परंतु ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ व खर्चिक असल्या कारणाने शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु जर ही पद्धत वापरली तर नक्कीच काकडीचे दर्जेदार उत्पादन मिळते.

काकडी पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे असून लागवड केल्यानंतर 25 ते 30 दिवसांनी निदणी करणे गरजेचे आहे.जेव्हा काकडी लागायला सुरुवात होते तेव्हा काकडीचा संपर्क मातीशी होऊ नये म्हणून काकडीच्या खाली वाळलेल्या काडक्या घालाव्यात. तसेच व्यवस्थित पिकाचे निरीक्षण करून एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे.

4- अशा पद्धतीने करावी काढणी- शक्यतो जेव्हा काकडी कोवळी असते तेव्हा काढणी करावी. दर एक ते दोन दिवसांच्या अंतराने काढणी करणे गरजेचे असून त्यामुळे कोवळी काकडीचे उत्पादन मिळते व तिला बाजारात चांगली मागणी असते. हंगामानुसार व जातीनिहाय एकरमध्ये 80 ते 120 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणे शक्‍य असते.

5- लागवडीसाठी महत्त्वाच्या जाती- काकडी पिकाच्या माध्यमातून चांगले उत्पादन हवे असेल तर काही महत्वाच्या जातीची लागवड करणे गरजेचे असून यामध्ये शितल, पुना खिरा, प्रिया तसेच हिमांगी, फुले शुभांगी, रिजवान इत्यादी जातींची लागवड शेतकरी करतात व या खूप महत्त्वपूर्ण वाण आहेत.

नक्की वाचा:Wheat Farming: गव्हाच्या या देशी वाणाची योग्य वेळी पेरणी केली तर कराल मोठी कमाई; पावसातही राहते सुरक्षित

English Summary: this is the improvise cultivation method of cucumber crop
Published on: 15 October 2022, 04:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)