Agripedia

आंतरपीक पद्धती शेतकरी बंधूंसाठी फायद्याची ठरते. एक पिक पद्धती मधील जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धती उपयुक्त आहे. जर आपण आंतरपिकांचा विचार केला तर फळबागांमध्ये देखील विविध प्रकारच्या आंतरपिके लावता येतात.आंतरपिकामुळे शेतकऱ्यांना दुप्पट आर्थिक उत्पन्नाचा फायदा मिळवणे शक्य आहे.

Updated on 20 September, 2022 12:45 PM IST

आंतरपीक पद्धती  शेतकरी बंधूंसाठी फायद्याची ठरते. एक पिक पद्धती मधील जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धती उपयुक्त आहे. जर आपण आंतरपिकांचा विचार केला तर फळबागांमध्ये देखील विविध प्रकारच्या आंतरपिके लावता येतात.आंतरपिकामुळे शेतकऱ्यांना दुप्पट आर्थिक उत्पन्नाचा फायदा मिळवणे शक्‍य आहे.

नक्की वाचा:आता लवकरच शेतकऱ्यांना जांभळ्या टोमॅटोची लागवड करता येणार; टोमॅटोची नवीन जात विकसित

जर यामध्ये तुम्ही रब्बी हंगामाचा विचार केला तर रब्बी हंगामात सलग पिके घेण्याऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येणे शक्य आहे. तसेच एकरी अधिक उत्पादन हातात येऊन जास्त प्रमाणात नफा देखील मिळू शकतो.

यासाठी आपण मराठवाडा विभागाचा विचार केला तर त्या ठिकाणाच्या मृदा आणि पर्जन्यमान नुसार हमखास जास्त उत्पादन आणि आर्थिक नफा देणाऱ्या काही आंतरपीक आणि दुबार पीक पद्धतीची शिफारस करण्यात आली आहे व या शिफारसी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांनी रब्बी हंगामासाठी केले आहेत.

नक्की वाचा:Wheat Veriety: गव्हाची 'ही' जात शेतकऱ्यांना देईल बंपर उत्पादन, बाजार भाव देखील मिळतो उत्तम

फायदेशीर आंतरपीक पद्धती

1- करडई+ हरभरा- शेतकरी बंधूंसाठी ही आंतरपीक पद्धती खूप महत्त्वपूर्ण असून मध्यम ते भारी जमीन असेल तर या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली असून 4:2 किंवा 6:3 ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतल्यास जास्त फायदा मिळणे शक्य आहे.

2- रब्बी ज्वारी+ करडई- आपल्याला माहित आहे कि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये रब्बी ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

अशा क्षेत्रासाठीही शिफारस करण्यात आलेली असून वातावरणामध्ये तापमानाची जी काही तफावत असते त्यामुळे ज्वारी किंवा करडईच्या सलग पिकामध्ये जी काही घट येते ती या आंतरपीक पद्धतीमुळे कमी होते व उत्पादनांमध्ये फायदा होतो.  या आंतरपीक पद्धतीचे प्रमाण हे 6:3 ओळी असे आहे.

नक्की वाचा:Cotton Crop: कपाशीवर दिसत आहे आकस्मिक मर रोग, 'या' उपाययोजना ठरतील परिणामकारक

English Summary: this is the benificial intercroping recomeneded for marathwada region
Published on: 20 September 2022, 12:45 IST