Agripedia

बीटी कपाशीचे उत्पादन व त्याचा दर्जा वाढवायचा असल्यास शास्त्रोक्त पद्धतीने लागवड व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

Updated on 06 May, 2022 7:12 PM IST

 बीटी कपाशीचे उत्पादन व त्याचा दर्जा वाढवायचा असल्यास शास्त्रोक्त पद्धतीने लागवड व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

कपाशीत कीड-रोग नियंत्रण ही प्रभावी पद्धतीने करणे गरजेचे असते. या दृष्टीने लेखा दिलेल्या टिप्स शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील.

1) बीटी कापूस लागवडीची पूर्वतयारी :

1) स्वच्छता मोहीम :- मागील हंगामातील पऱ्हाटी व शेतातील अवशेष वेचून त्याची विल्हेवाट लावावी.

2) जमिनीची निवड :- पाण्याचा निचरा होणाऱ्या आणि जलधारण शक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर कपाशीची लागवड करावी. किंवा कमी खोली असणाऱ्या व हलक्‍या जमिनीवर लागवड करू नये.

3) मशागत:- उन्हाळ्यात खोल नांगरणी व तीन ते चार वखराच्या पाळ्या प्रत्येकी दोन आठवड्यांच्या अंतराने कराव्यात.

4) सेंद्रिय खते :- शेवटच्या पाळीपूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन (10 ते 12 गाड्या) आणि बागायती लागवडीसाठी 10 टन (20-25 गाड्या ) चांगले कुजलेले शेणखत व कंपोस्ट खत जमिनीवर एकसारखे पसरून द्यावे.

2) पीक फेरपालट :(Crop Rotation)

 कोरडवाहू जमिनीत कापूस - ज्वारी किंवा सोयाबीन आणि बागायती कपाशीसाठी कापूस - गहू किंवा कापूस उन्हाळी भुईमूग अशी फेरपालट करावी. भेंडी टोमॅटो अंबाडी किंवा हरभरा लागवड केलेल्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये.

3) वाणांची निवड :(Selection Of Veriety)

1) रस शोषण करणाऱ्या किडींचा सहनशील वा प्रतिकारक तसेच रोगांना बळी न पडणारे वाण निवडावे. तसेच कमी कालावधीच्या (150 ते 160 दिवस) वाणांची लागवड करावी.

2) पेरणीची वेळ - बागायती कपाशीची लागवड मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात कराव. कोरडवाहू कपाशीची लागवड 75 ते 100 मीमी पाऊस झाल्यावर करावी.

4) तण नियंत्रण आंतरमशागत :-(Weed Management)

 पीक तीन आठवड्यांचे झाल्यावर पहिली खुरपणी करावी. लगेच कोळपणी करावी. त्यानंतर सहा आठवड्यांनी दुसरी निंदणी व कोळपणी करावी. पिकास दोन खुरपणी आणि 3 ते 4 कोळपण्या कराव्यात.

 आश्रय ओळीची (रेफ्युजी) लागवड बेटी वाणासोबत बिगर बीटी वाणाचे स्वतंत्र पाकीट दिलेली असते. त्यांची लागवड बीटी कपाशीच्या सर्व बाजूंनी पाच ओळी या पद्धतीने करावी.या वाणाच्या बीटी बियाण्यातच बिगर बीटी बियाणे मिसळलेले (रेफ्युजी इन बॅग) असेल तर वेगळ्या आश्रय ओळी लावण्याची गरज नाही.

5) लागवडीचे अंतर:-

1) कोरडवाहू लागवड: 120×45 सेंमी(4× दीड फूट )

2) बागायती लागवड:150×30 सेंमी(5× एक फूट ) किंवा 180×30 सेंमी (6× एक फूट )

3) बियाण्याचे प्रमाण: 2.5 ते 3 किलो प्रतिहेक्टर

 सिंचन बागायती कापूस मे महिन्याच्या अखेरीस लावल्यानंतर पाऊस पडेपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार 8 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीकवाढीच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्यास पिकास पाणी द्यावे.

 पातेगळ रोखणे शरीरक्रियात्मक कारणांमुळे होणारी पाते गळ रोखण्यासाठी यातील नॅफथील ऍसिटिक ऍसिड( एनएए ) या संजीवकांची 21 पीपीएम (7 मिली प्रति 15 लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.

 अतिरिक्त कायिक वाढ रोखणे अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी पीक 75 ते 90 दिवसांचे झाल्यावर शेंडा खुडावा किंवा क्लोरमेक्वाट क्लोराइड हे वाढ नियंत्रक 4मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाद्वारे फवारणी करावी.

6) एकात्मिक किड नियंत्रण व्यवस्थापन :(Integrated Insect Management)

1) बीज प्रक्रिया :- बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास इमिडाक्‍लोप्रीड किंवा थायामेथोक्झाम ( 70 डब्ल्यूएस ) 5 ते 7 ग्रॅम प्रति किलो बियाणे बीजप्रक्रिया केलेली असते. त्यामुळे सुरुवातीला 15 ते 20 दिवस रस शोषण करणाऱ्या किडींपासून संरक्षण मिळते.

2) रोग व रस शोषक कीटक यांना प्रतिकारक्षम किंवा सहनशील वाणांची लागवड करावी.

3) सुरुवातीच्या काळात इमिडाक्‍लोप्रिडचा वापर टाळावा.पहिली फवारणी शक्‍य तेवढी लांबवावी. त्यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होईल.

 

4) तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे ( स्पोडोप्टेरा लिट्यूर ) अंडीपुंज व लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.

5) सुरुवातीच्या काळातील दुय्यम किडी उदा.करडे भुंगेरे, पाने पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, केसाळ या कमी प्रमाणात आढळून येतात. त्यांच्यासाठी शक्यतो कीटकनाशकांची फवारणी करू नये.

 महत्त्वाच्या बातम्या

नक्की वाचा:तंत्र वापरा परंतु माहिती घेऊन! वडाच्या झाडाखालील माती आणि हरभरा डाळीच्या पिठाचे जीवामृतमधील महत्व

नक्की वाचा:डॉ. अतुल पी.फुसे( कृषी विशेषज्ञ) यांचे अनमोल मार्गदर्शन! संत्रा फळझाडांची उन्हाळ्यातील उपाययोजना

English Summary: this is some useful tips to do help in growth in cotton production and quality
Published on: 06 May 2022, 07:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)