काळाच्या ओघामध्ये आता परंपरागत शेती पद्धती आणि परंपरागत पिके हे मागे पडत चालले असून शेतकरी आता आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन पिके घेऊ लागले आहेत. विविध भाजीपाला पिकांची लागवड शेतकरी आता पॉलिहाऊस सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून घेत असून त्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळवत आहेत. सोबतच विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून फुल शेतीमध्ये देखील शेतकरी आता मागे नाहीत.
महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील शेतकरी आता फुलशेती मोठ्या प्रमाणावर करू लागल्यामुळे व त्यासोबतच पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचा वापर फुलं लागवडीसाठी केला जात असल्यामुळे शेतकरी खूप चांगल्या प्रकारे नफा मिळवत आहे.
फुल शेती मध्ये जर शेतकरी बंधूनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच चांगले उत्पादन आणि भक्कम नफा मिळणे शक्य आहे. त्यामुळे फुलशेतीतील काही महत्त्वाच्या बाबी या लेखात आपण समजून घेऊ.
फुलशेतीतील महत्वाच्या बाबी
1- या पद्धतीने करा सुरुवात- जर तुम्हाला देखील फुले शेतीमध्ये म्हणजेच फुलांची लागवड करायची असेल तर सगळ्यात आगोदर इंटरनेटचा वापर तर आपण करतोच. परंतु शास्त्रशुद्ध माहितीसाठी शेतकरी बांधवांनी कृषी शास्त्रज्ञ, फुलशेतीतील प्रगतिशील शेतकरी आणि केवीके यांच्याशी संपर्क साधावा व इतंभूत माहिती घ्यावी.
तसेच फुल शेती करण्याच्या अगोदर राज्याच्या कृषी विभागाची म्हणजेच आपल्या तालुक्याच्या ठिकाणच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा. विविध ठिकाणी फुल शेती विषयी असलेल्या ट्रेनिंग कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे. यामुळे तुम्हाला ज्या काही पुढे अडचणी येतील त्या तुम्ही चुटकीसरशी सोडवू शकतात.
2- फुल शेती मध्ये फुलांची लागवडीचा विचार करताना बाजारपेठ आणि मागणीचा करा विचार- सगळ्यात अगोदर तुम्ही जेव्हा फुलशेती करण्याचा विचार कराल तेव्हा तुम्ही राहात असलेले परिसरातील हवामान आणि जमीन याचा सगळ्यात आगोदर विचार करणे गरजेचे असून
त्यासाठी तुम्ही माती आणि हवामानाच्या आधारावर फुलांच्या जातींची लागवड करावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठेत कोणत्या फुलांना जास्त मागणी आहे, हेदेखील अभ्यासणे तेवढेच गरजेचे आहे.
3- काटेकोरपणे हवे पाणी व्यवस्थापनाची सोय - कुठल्याही पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी सिंचनाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने असणे खूप गरजेचे आहे.
त्यामुळे फुल लागवड करण्यापूर्वी तुमच्याकडे उपलब्ध पाण्याची व्यवस्था कोणत्या पद्धतीची आहे याबद्दल विचार करणे खूप गरजेचे आहे. कारण फुलांच्या चांगल्या उत्पादनासाठी तुमच्याकडे पाणी उपलब्ध असणे तेवढेच गरजेचे आहे.
4- फुल शेती मधील खर्च कमी आणि नफा वाढविण्यासाठी तंत्राचा अवलंब- जेव्हा तुम्ही फुल शेतीमध्ये पडाल तेव्हा खर्च कमी कसा करता येईल आणि अधिक नफा कसा मिळेल याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. उदाहरणच घ्यायचे झाले
तर तुम्ही या फुल शेतीमध्ये मजुरीचा खर्च तुमच्या कुटुंबातील सगळे सदस्य मिळून काम केले तर नक्कीच कमी होऊ शकतो. तसेच खतांचा वापर करतांना माती परीक्षण करून त्याच्या अहवालानुसारच खतांचा आवश्यक तेवढा वापर करावा. खतांचा अतिरिक्त वापर टाळला तर खर्च कमी होईल यात शंकाच नाही.
5- कीड व रोगांपासून संरक्षण आहे महत्वाचे- जर तुम्हाला कीड आणि रोग पासून संरक्षण करायचे असेल व खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचा पर्याय निवडणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलांची काढणी केल्यानंतर त्यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी त्यांची व्यवस्थित साठवनुक करणे देखील तेवढेच गरजेचे आहे.
फुलं बाजारामध्ये ताजेतवाने पोचतील तसेच या फुलांना चांगला दर येईल.त्यामुळे या सर्व बाबीचे तंतोतंत पालन करून फुलशेती केली तर नक्कीच यशश्री शेतकऱ्यांकडे धावून येईल.
Published on: 11 October 2022, 05:11 IST