बरेच शेतकरी फुलांची लागवड करतात.कारण फुलांना बाजारपेठेमध्ये भरपूर मागणी असून त्यामुळे फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. आपल्याला माहित आहेच की फुलांच्या प्रकारांमध्ये बरेच शेतकरी झेंडू लागवडीला प्राधान्य देतात.
अनेक सण समारंभ आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये झेंडूच्या फुलांना खूप मागणी असते. जर तुमच्याही डोक्यात झेंडू लागवडीचा विचार असेल तर या लेखांमध्ये आपण झेंडूच्या विविध जातींची तपशिलवार माहिती घेऊ.
झेंडूच्या लागवड योग्य जास्त उत्पादनक्षम जाती
झेंडूच्या आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू संकरित झेंडू असे प्रकार आहेत.
आफ्रिकन झेंडू-आफ्रिकन झेंडूमध्ये अनेक प्रकार आहेत.यामध्ये झाडाची उंची, झाड वाडीची एकंदरीत पद्धत, फुलांचा रंग तसेच आकार इत्यादी गोष्टींमध्ये विविधता आढळते.जर मध्ये फुलांच्या प्रकारानुसार विचार केला तर कार्नेशन आणि शेवंती हे प्रकार दिसतात. तर उंचीनुसार विचार केला तर उंच, सेमी टॉल व डॉर्फ इत्यादी प्रकार पडतात.
कार्नेशन प्रकार - या प्रकाराची झेंडूची झाडे 75 सेंटिमीटर उंच वाढतात व त्यांना मोठ्या आकाराची फुले लागतात. फुलांचा रंग हा नारंगी व पिवळा असतो.
शेवंती प्रकार- शेवंतीची फुले ज्याप्रमाणे दिसतात त्याचप्रमाणे ही फुले दिसतात.यामध्ये उंच आणि बुटकी झाडे आढळतात.
संकरित झेंडू
1- उंच संकरित- या प्रकारात झाडे 60 ते 70 सेंटिमीटर उंच व बारा सेंटीमीटर पेक्षा जास्त व्यासाचे असतात.
2- सेमी टॉल- या प्रकारात दाट व सारख्या आकाराचे 50 सेंटिमीटर उंचीपर्यंत वाढणारी झाडे आढळतात. फुलांचा व्यास सेंटी मीटर व्यासाचा असतो व फुले लिंबू तसेच फिक्कट नारींगी रंगाच्या असतात.
3- द्वार्फ माध्यम संकरित- या प्रकाराची झाडे दाट वाढणारी व एकाच वेळी फुले येणारी असतात व उंची 14 ते 50 सेंटिमीटर पर्यंत असते.
आफ्रिकन झेंडूच्या भारतीय जाती
1- पुसा नारंगी गेंदा- क्रॉक जॉक आणि गोल्डन जुबिली या दोन जातींच्या संकरातून ही जात निर्माण केली आहे. शंभर दिवस वाढीचा काळ असून 80 ते 85 सेंटिमीटर पर्यंत झाडांची उंची असते. बी लागवडीपासून 125 ते 130 दिवसात फुले येतात व 45 ते 60 दिवस फुलावर राहते.
फुलांचा आकार मोठा असतोव फुले नारंगी रंगाचे असतात.लागवडीपासून45 दिवसांनी झाडाचा शेंडा खुडावा लागतो. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागवड केल्यास फेब्रुवारीमध्ये फुले तोडण्यास तयार होतात. या जातीपासून हेक्टरी 25 ते 30 टन फुलांचे उत्पादन मिळते.
2- पुसा बसंती गेंदा- ऑक्टोबर मध्ये बियाण्याची पेरणी करून नोव्हेंबर मध्ये रोपांची पुनर्लागवड होतेआणि फेब्रुवारी-मार्चमध्ये फुलांची काढणी केली जाते. ही जात गोल्डन येलो आणि सन जाइंट या दोन जातींच्या संकरातून तयार करण्यात आली आहे.
झाडाची उंची 60 ते 65 सेंटीमीटर आणि एकशे तीस दिवस वाढीचा काळ असतो. बी पेरणीपासून साधारणतः 135 ते 145 दिवसात पुलावर येते व 45 ते 50 दिवस फुलांचा काळ असतो.
या जातीला मध्यम आकाराची फुले येतात व रंग पिवळसर असतो. 45 दिवसांनी झाडाचा शेंडा खुडावा लागतो. या जातीपासूनहेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन मिळते.
नक्की वाचा:पारंपारिक शेतीला पर्याय! सुगंधित औषधी वनस्पती लागवड जिरेनियम, पामारोजा, दवणा, पचोली
इतर काही महत्त्वाच्या जाती
1- फ्रेंच झेंडू-या जातीतील झेंडूची रोपे कमी उंचीचे असतात व झुडूपा सारखी वाढतात.फुलांचा आकार लहान व मध्यम असून विविध रंगांमध्ये फुले येतात.
2- फ्रेंच संकरित झेंडू-या जातीचे झेंडूची रोपे मध्यम उंचीच्या असतात व भरपूर फुले देणारी जात आहे.
3- मखमल-या प्रकारच्या जातीची झाडे कमी उंचीचे तसेच आकाराने लहान व दुरंगी फुले देणारे आहे.फळबागेच्या कडेने ताठ होण्यासाठी तसेच कुंडीत देखील लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
Published on: 21 July 2022, 01:37 IST