Agripedia

भाजीपाला पिकामध्ये वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जर आपण एकंदरीत वांगे लागवडीचा विचार केला तर बाजारपेठेत देखील कायमच वांग्याला चांगली मागणी असते.बरेच शेतकरी बंधू बाराही महिने वांग्याचे उत्पादन यशस्वीरित्या घेतात. परंतु जर आपण वांग्याचा विचार केला तर किडींचा प्रादुर्भाव देखील फार मोठ्या प्रमाणावर या पिकावर होतो.

Updated on 03 November, 2022 8:11 AM IST

भाजीपाला पिकामध्ये वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जर आपण एकंदरीत वांगे लागवडीचा विचार केला तर बाजारपेठेत देखील कायमच वांग्याला चांगली मागणी असते.बरेच शेतकरी बंधू बाराही महिने वांग्याचे उत्पादन यशस्वीरित्या घेतात. परंतु जर आपण वांग्याचा विचार केला तर किडींचा प्रादुर्भाव देखील फार मोठ्या प्रमाणावर या पिकावर होतो.

यामध्ये शेंडे आळी  आणि फळ पोखरणाऱ्या अळी या दोन महत्वाच्या किडी असून त्यासोबतच पांढरी माशी सारख्या रस शोषण करणाऱ्या किडींचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो.

नक्की वाचा:शेतकऱ्यांच्या जीवावरच काही महाभाग झाले महाभकास क्रांतीचे शिल्पकार

या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकरी बंधू खूप प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करतात. परंतु शेंडे अळी आणि फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव हव्या त्या प्रमाणात आटोक्यात येत नाही. या दृष्टिकोनातून जर आपण वांगी पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला तर नक्कीच  किडींचा प्रादुर्भाव थांबवता येणे शक्य आहे.

 वांगी पिकासाठी अशा पद्धतीने करा एकात्मिक कीड व्यवस्थापन

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिकाची लागवड करण्यापूर्वी ज्या शेतामध्ये वांगी लागवड करायची आहे त्या शेताची चांगली खोलगट नांगरटी करून घेणे खूप गरजेचे असून जमीन थोडी तापू देणे गरजेचे आहे. त्यामुळे या उपद्रवी किडींचे कोष मरतात व पुढील पिकामध्ये होणारा प्रादुर्भाव कमी होतो.

2- दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जर वांगी लागवड करत असलेल्या शेतामध्ये त्या अगोदर जर मिरची किंवा भेंडी तसेच वेलवर्गीय भाजीपाला पिके घेतली असतील तर अशा ठिकाणी वांगी पिकाची लागवड करणे टाळावे.

3- जेव्हा आपण वांग्याची रोपवाटिका तयार करतो तेव्हा प्रतिवाफ्यामध्ये कार्बोफ्युरॉन 30 ग्रॅम किंवा फोरेट दहा ग्रॅम टाकावे. तसेच वांग्याच्या रोपांवर डायमेथोएट  ३० टक्के प्रवाही दहा मिनिट दहा लिटर पाण्यातून वापर करावा.

नक्की वाचा:आनंदाची बातमी: किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार

4- जेव्हा तुम्ही वांग्याच्या रोपांची पुनर लागवड कराल तेव्हा लागवड करण्याआधी रोपे इमिडाक्लोप्रीड दहा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून घ्यावे व त्यामध्ये रोपे तीन तासापर्यंत बुडवून ठेवावीत व नंतर लागवड करावी.

5- वांगे लागवडीनंतर 45 दिवस झाल्यानंतर जर पांढरी माशी किंवा मावा यासारखी रस शोषक करणाऱ्या किडी आढळून आल्यास डायमेथोईट 30% प्रवाही दहा मिली किंवा मिथिल डिमॅटोन 25% प्रवाही दहा मिली दहा लिटर पाण्यातून फवारून घ्यावे.

6- लागवड केल्यानंतर दोन महिन्यांनी जर वांग्याची किडलेली फळे किंवा शेंडे आढळून आली तर ती गोळा करून नष्ट करून टाकावीत. त्यासोबतच चार टक्के निंबोळी अर्क किंवा सायपरमेथिन 25% प्रवाही दहा लिटर पाण्यातून फवारून घ्यावे.

नक्की वाचा:पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा; खात्यात नुकसान भरपाई म्हणून एका गुंठ्यामागे चक्क रुपये

English Summary: this is so important integreted management tips for insect management in brinjaal crop
Published on: 03 November 2022, 08:11 IST