हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेले ज्या काही हिरव्या वनस्पती असतात त्या वनस्पतींचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या जमिनीमध्ये लागवड करून ती वाढलेली पिके फुलोऱ्यावर आल्यानंतर शेतात नांगरून काढून मातीत एकजीव करणे होय व या माध्यमातून तयार झालेल्या हिरवळीचे खत असे म्हणतात. या खतामध्ये ह्युमसचे नावाचे सेंद्रिय द्रव्ये असल्यामुळे मातीला काळा रंग प्राप्त होतो. हिरवळीच्या खतांमुळे जे काही सेंद्रिय द्रव्य असते.
त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंचा अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते व परिणामी जिवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमदार होते. एवढेच नाही तर जमिनीतील जे काही पोषक द्रव्ये असतातही रासायनिक प्रक्रियेने विरघळून पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात. या लेखामध्ये आपण हिरवळीच्या खतांसाठी उपयुक्त पिकेत्याबद्दल माहिती घेणार आहोत.
हिरवळीच्या खतासाठी उपयुक्त पिके
1- गिरीपुष्प- गिरिपुष्प हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये व हवामानात चांगले वाढणारे पीक आहे. गिरिपुष्पाच्या पानांमध्ये साडेआठ टक्के कर्ब,0.40 टक्के नत्र असते.
या झाडाची शेताच्या बांधावर लागवड करून त्याची पाणी वरचे वर जमिनीमध्ये मिसळता येतात. जर आपण इतर वनस्पती यांचा विचार केला तर त्याच्या तुलनेत गिरीपुष्प पिकाच्या पानांमध्ये नत्राचे प्रमाण जास्त असते.
2- ताग- हे देखील सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले वाढणारे पीक असून याची लागवड केल्यानंतर पाच ते सहा आठवड्यांनी जर जमीनीत गाडले तर हेक्टरी सर्वसाधारणपणे साडेसतरा ते 20 टन सेंद्रिय खत मिळते. तागापासून 60 ते 100 किलो प्रति हेक्टरी नत्र प्राप्त होते. तसेच इतर मुख्य, सूक्ष्म अन्नद्रव्य देखील पिकांना मिळतात.
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळबाग लागवडीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान
3- धैचा- या वनस्पतीच्या मुळावर व फळांवर गाठी निर्माण होतात व त्या गाठींवर रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाचे प्रक्रियेने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करतात. या वनस्पतींच्या मुळांवर गाठी तयार होतात व त्यांची क्षमता इतर द्विदल वनस्पतीपेक्षा दहा टक्के जास्त आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला 25 ते 40 किलो बियाणे पेरावे व जेव्हा पिक सहा ते सात आठवड्याचे होते व त्याची उंची 90 ते 100 सेंटीमीटर झाल्यानंतर जमिनीत नांगरून गाडून टाकावे. या माध्यमातून 18 ते 20 टन हिरव्या वनस्पतीचे उत्पादन मिळते व यामध्ये नत्राचे शेकडा प्रमाण 0.46 टक्के असून त्याच्या मुळावरील व खोडावरील गाठीतील जिवाणू मुळे प्रति हेक्टरी 150 किलो ग्रॅम पर्यंत नत्र स्थिर केले जाते.
4- इतर महत्वाचे द्विदलवर्गीय पिके- यासाठी तुम्ही मूग, चवळी तसेच उडीद, सोयाबीन, गवार इत्यादी पिके फुलोरा आधीसुद्धा गाडून चांगला फायदा मिळतो.
या पिकांचे सर्व अवशेष जर जमीनीत गाडले तर त्याचा उत्तम फायदा मिळतो.
5- हिरवळीच्या खतासाठी इतर फायदेशीर वनस्पती- शेताच्या बांधावर किंवा पडीक जागेवर शेवरी, करंज, सुबाभूळ, गिरीपुष्प इत्यादी पिकांची लागवड करून त्यांची कोवळी पाने अथवा फांद्या तोडून जमिनीत मिसळली तर खूप मोठा फायदा होतो. बांधावर या वनस्पतींची लागवड केल्याने त्यांच्या कोवळ्या फांद्या, पाने तोडून ते मुख्य पिकातील जमिनीवर मिसळता येतात.
नक्की वाचा:लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान! या रोगापासून करा लिंबाचा बचाव अन्यथा होईल मोठे नुकसान
Published on: 27 October 2022, 06:34 IST