इतर पिकांप्रमाणे बटाट्याची शेती खूप फायदेशीर आहे. बटाटा शेतीतून शेतकऱ्यांना बऱ्याचदा कमी नफा मिळतो. त्यामुळे बटाटा लागवडीपूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याद्वारे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल.
या लेखात आपण बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती घेऊ.
कमी खर्चात बटाटा उत्पादनाच्या टिप्स
1- माती परीक्षण-बटाट्याच्या चांगल्या उत्पादनासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. वालुकामय चिकन माती त्याच्या लागवडीसाठी उत्कृष्ट मानली जाते.
त्याशिवाय मातीचा पीएच सहा ते आठच्या दरम्यान असावा. पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था असावी. बटाट्याची लागवड करण्याअगोदर जमिनीचे आरोग्य जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात फायदेशीर सूक्ष्मजीवांचे प्रमाण किती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.
माती परीक्षणाचे फायदे
माती परीक्षणानंतर बटाट्याचे उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्हाला अनावश्यक खाते किंवा पोषकतत्वे घालण्याची गरज नाही. त्यामुळे खतांच्या खर्चात बचत होईल.
2- खतांचा वापर- चांगल्या उत्पादनासाठी शेत तयार करताना सेंद्रिय खताचा वापर करावा. शेणखताचा वापर हा फायदेशीर ठरू शकतो.
सेंद्रिय खताचे फायदे
सेंद्रिय खत वापरल्याने बटाटे हिरवे राहत नाही त्यामुळे बटाटे गोड होत नाहीत आणि कीटक आणि रोगाशी लढण्याची वनस्पतींची क्षमता वाढते.
3- रोगमुक्त बियाणे- शेतात कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नसेल तर रोगमुक्त बियाण्याची निवड फार महत्त्वाचे असते. शिवाय लवकर आणि उशिरा अवस्थेत रोगाना प्रतिरोधक असलेल्या जातींची लागवड करावी.
नक्की वाचा:या खरीप हंगामात मक्याच्या या प्रगत वाणांची करा लागवड, होईल अधिक उत्पादन
रोगमुक्त बियाणे वापरायचे फायदे
रोगमुक्त आणि रोग प्रतिरोधक बियाणे निवडल्याने कीटकनाशके औषधांवर भरपूर पैसे वाचवू शकतात.
4- उष्णते मध्ये खोल नांगरणी- उन्हाळ्यात बटाट्याचे उत्पादन घेणे अगोदर खोल नांगरणी करावी.
खोल नांगरणी चे फायदे
खोल नांगरणी केल्यामुळे अनेक प्रकारचे कीटक,त्यांचे कोशपतंग नष्ट होतात त्यामुळे त्यांची पुढची पिढी नष्ट झाल्याने त्यांचा प्रादुर्भाव होत नाही व पिकांचे नुकसानी पासून बचाव होतो.
Published on: 17 June 2022, 04:26 IST