खरिपामध्ये बरेच जण उडीद आणि मुगाची लागवड करतात. बरेच शेतकरी आंतरपीक म्हणून या पिकांची लागवड करण्याला प्राधान्य देतात. या पिकांच्या लागवडी मागील महत्त्वाचा फायदा म्हणजे अगदी कमीत कमी कालावधी मध्ये चांगला आर्थिक नफा तर मिळतोच मिळतो
परंतु या दोन्ही पिकांचे अवशेष जमिनीत गेल्यामुळे जमिनीचा पोत देखील सुधारण्यास मदत होते. कारण यामुळे रायझोबियम जिवाणूंच्या माध्यमातून जमिनीतील नत्राचा साठा वाढण्यास मदत होते.
तसेच आहारात आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील दोन्ही पिकांचे खूप महत्त्व आहे. या लेखामध्ये आपण उडीद आणि मूग या पिकांच्या सुधारित लागवड पद्धतीविषयी माहिती घेऊ.
उडीद आणि मुगाची लागवड
1- जमिनीची निवड व पूर्व मशागत-मूग आणि उडीद पिकाला मध्यम ते भारी,पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिनीची निवड करावी.क्षारयुक्त, पाणथळ तसेच उतारावरील हलक्या जमिनीवर या पिकांची लागवड करू नये.
या पिकाला जास्त मशागतीची गरज नसून रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर एक हलकेसे नांगरट वखराच्या दोन पाळ्या देऊन रब्बी हंगामातील पिकांचे अवशेष, काडीकचरा वेचून रोटावेटरच्या साह्याने जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
शेवटच्या पाळी अगोदर 15 ते 20 गाड्या शेणखत हेक्टरी जमिनीत मिसळावे. या दोन्ही पिकांची पेरणी करणे अगोदर चांगला पाऊस पडू द्यावा व जमीन वाफसा आल्याबरोबर लवकरात लवकर पेरणी करावी.
जर पेरणीस उशीर झाला तर त्याप्रमाणे उत्पादनात देखील घट येण्याची शक्यता वाढते. बियाण्यांचे प्रमाण प्रति हेक्टरी रोपांची संख्या योग्य ठेवण्यासाठी 12 ते 15 किलो बियाणे वापरावे.
नक्की वाचा:कमी कालावधीत येणारे नगदी शेंगभाजी चवळी पीक-लागवड तंत्रज्ञान
2- पेरणी अगोदर प्रक्रिया- पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 30 मीटर व दोन रोपांमधील अंतर दहा सेंटिमीटर असते गरजेचे आहे. बीजप्रक्रिया करताना प्रति किलो बियाण्याला कार्बेन्डाझिम तीन ग्रॅम किंवा थायरम दोन ग्राम चोळावे.
तसेच बुरशीजन्य रोगांपासून उडीद मूग पिकाचा बचाव करण्यासाठी ट्रायकोडर्मा चार ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळवणारे जिवाणूसंवर्धक 250 ग्रॅम किंवा द्रवरूप रायझोफॉस 100 मिली प्रति 10 किलो बियाण्यास लावावे.
नक्की वाचा:Diet Precaution: चपाती आणि भात एकत्र खात असाल तर सावधान, होऊ शकतात हे दुष्परिणाम
3- खत व्यवस्थापन-शेवटच्या वखरणी अगोदर 6 ते 8 टन प्रति हेक्टरी शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे.पेरणी करताना 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरदप्रति हेक्टरी द्यावे.
4- तणनियंत्रण व आंतरमशागत- हे पिके अगदी कमी कालावधीचे असल्यामुळे या ठिकाणांमध्ये वेळीच आंतरमशागत करणे गरजेचे आहे. पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी एक कोळपणी व खुरपणी करून घेणे खूप गरजेचे असते.
5- आंतरपीक म्हणूनही उपयुक्त पिके- या पिकांची लागवड आंतरपीक म्हणून तर केली तरीदेखील खूप चांगला नफा मिळतो. ज्वारी, तुर, प्रामुख्याने कपाशीत आंतरपिके म्हणून ही पिके घेतल्यास चांगला फायदा मिळतो.
Published on: 20 June 2022, 12:12 IST