Agripedia

आपल्याला माहित आहेच की, पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी आणि सकस वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. परंतु यामुळे पिकांचे उत्पादन कितपत वाढते हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु जमिनीचे आरोग्य देखील खालावते हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. आपल्याला माहित आहेच कि जमिनीमधील सेंद्रिय कर्ब हा खूप महत्त्वाचा असून त्याचे प्रमाण हे 0.5 टक्क्याच्या खाली घसरले असून यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर जास्त प्रमाणात करणे खूप गरजेचे आहे.

Updated on 08 September, 2022 11:59 AM IST

आपल्याला माहित आहेच की, पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी आणि सकस वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. परंतु यामुळे पिकांचे उत्पादन कितपत वाढते हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु जमिनीचे आरोग्य देखील खालावते हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. आपल्याला माहित आहेच कि जमिनीमधील सेंद्रिय कर्ब हा खूप महत्त्वाचा असून त्याचे प्रमाण हे 0.5 टक्क्याच्या खाली घसरले असून यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर जास्त प्रमाणात करणे खूप गरजेचे आहे.

आता सेंद्रिय खतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खते येतात. परंतु यामध्ये कोंबडी खत हा एक उत्तम पर्याय आहे. कोंबडी खताच्या वापराने मातीची भौतिक आणि जैविक तसेच रासायनिक क्षमता सुधारण्यास मदत होते.या लेखामध्ये आपण कोंबडी खताचे महत्त्व आणि वापरण्याची पद्धत याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:केंद्र सरकारने सादर केला अहवाल; नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात चांगली वाढ

 कोंबडी खताचे महत्व

 जरा आपण एकंदरीत कोंबडी खतांमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचा विचार केला तर यामध्ये तेरा प्रकारची महत्त्वाचे अन्नद्रव्य असतात.

नत्र हे अमोनिया,नायट्रेट,यूरिक ॲसिड या प्रमाणात आढळते तर मुख्य अन्नद्रव्य व्यतिरिक्त कॅल्शियम,मॅग्नेशियम,सल्फर,सोडियम,बोरॉन, झिंक आणि कॉपर इत्यादी महत्त्वाचे अन्नद्रव्य या माध्यमातून उपलब्ध होतात.

अशा पद्धतीने वापरा कोंबडी खत होईल फायदा

1- जेव्हा आपण पेरणीचे अगोदर पूर्व मशागत करतो तेव्हा पेरणी करणे अगोदर एक ते दीड महिना कोंबडी खत जमिनीत चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यावे व यानंतर कुळवाची पाळी द्यावी.

2- ताजे कोंबडी खत उभ्या पिकामधे किंवा जमिनीत मिसळून कधीच देऊ नये. जर तुम्हाला उभ्या पिकामध्ये कोंबडी खत द्यायचे असेल तर त्या आधी एक महिना अगोदर त्यावर पाणी शिंपडून ते थंड करून घ्यावे. म्हणजेच त्याचे कर्ब नत्र गुणोत्तर स्थिर राहते व चांगल्या पद्धतीने अन्नद्रव्य पिकांना मिळते.

नक्की वाचा:Wheat Crop: गव्हाचा 'हा'नवीन वाण बेकरी उत्पादनांसाठी आहे सर्वांत्तम,शेतकऱ्यांनाही मिळेल चांगला फायदा

3- जर तुम्हाला उभ्या पिकात कोंबडी खत द्यायचे असेल तर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे खूप गरजेचे आहे. जर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसताना तुम्ही कोंबडी खत दिले तर संबंधित पीक पिवळे पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोंबडी खत लगेचच पिकांना वापरू नये.

4- जमीन व पीक लागवडी नुसार प्रति एकरी पाच ते 20 टन कोंबडी खताचा वापर करावा.

नक्की वाचा:Crop Protection: ट्रायकोकार्ड म्हणजे काय? कसा करावा वापर काय होतो फायदा?

चांगल्या कोंबडी खताचे गुणधर्म

1-कोंबडी खताचा रंग तपकिरी,भुरकट व काळपट असावा. तसेच त्याचा वास हा मातकट असावा.

2- कोंबडी खताचा सामू साडेसहा ते साडेसात दरम्यान असावा.

3- तसेच खताच्या कणांचा आकार पाच ते दहा मिमी असावा.

4- कर्ब नत्र गुणोत्तर 1:10 ते 1:20 यादरम्यान असणे गरजेचे आहे व त्याचे जलधारणशक्ती 30 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असावी.

नक्की वाचा:Organic Fertilizer: शेण इतर टाकाऊ पदार्थापासून 'या'पद्धतीने तयार करा कंपोस्ट,पीक येईल भरघोस

English Summary: this is proper method to use poultry fertilizer for crop more production
Published on: 08 September 2022, 11:59 IST