शेवगा लागवड ही पावसाचे कमी प्रमाण असलेल्या ठिकाणी किंवा कोरडवाहू क्षेत्रांमध्ये चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. जमिनीचा मगदूर पाहून योग्य अंतरावर पावसाळ्यामध्ये लागवड केली तर चांगला फायदा मिळतो. जर आपण शेवग्याचा विचार केला तर हे बहुवर्षीय द्विदलवर्गीय वृक्ष आहे. शेवगा हा जमिनीत नत्र स्थिर करतो तसेच त्याचा पाला गळून जमिनीवर पडत असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास देखील मदत मिळते.
जर आपण मागील एक ते दोन वर्षाचा विचार केला तर शेवग्याला चांगल्याप्रकारे भाव मिळत आहे. या लेखामध्ये आपण शेवग्याच्या भरघोस उत्पादनासाठी शेवगा पिकाच्या लागवड पद्धतीची माहिती घेऊ.
नक्की वाचा:Crop Tips: 'या' गोष्टींकडे लक्ष दिल्यास वांग्याचे उत्पादन वाढेल हमखास, वाचा सविस्तर
शेवगा पिकाची लागवड पद्धत
शेवगा लागवड करताना बियांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड ज्या परिसरात कमी पाऊस पडतो अशा मध्ये जून जुलै महिन्यामध्ये करावी. ज्या ठिकाणी अति पाऊस पडतो अशा ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना उत्तम ठरतो.
जर तुम्हाला व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड करायची असेल तर मे आणि जून महिन्यात दोन बाय दोन बाय दोन फूट आकाराचे खड्डे करावेत व त्यामध्ये एक पाटी चांगले कुजलेले शेणखत, दोनशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 500 ग्रॅम निंबोळी खत व 100 ग्रॅम दाणेदार कीटकनाशक मातीमध्ये चांगले एकजीव करुन घ्यावे व खड्डा भरून घ्यावा.
जर तुम्हाला हलक्या जमिनीमध्ये लागवड करायचे असेल तर दोन झाडातील व ओळीतील अंतर अडीच मीटर बाय अडीच मीटर म्हणजेच या अंतराच्या हिशोबाने प्रतिहेक्टरी 640 रोपे बसतात व जमीन जर मध्यम असेल तर तीन मीटर बाय तीन मीटर अंतरावर प्रति हेक्टरी 444 झाडे बसतात.
एवढे अंतर ठेवावे. प्लास्टिकच्या पिशवीत रोपे तयार करावेत. बियाणे टोकताना त्यास कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही काळजी घेऊन बी जास्त न दाबता हळुवारपणे पिशवीत ठेवून नंतर त्यावर माती टाकावी व पाणी द्यावे.
नक्की वाचा:सेंद्रीयकर्ब म्हणजे नक्की काय? तो शेतात कसा वाढवावा? फायदे किती जाणून घ्या
शेवग्याचे बियाणे पिशवीत लावल्यास एक महिन्याच्या आत मध्ये लागवड होईल याची काळजी घ्यावी. जर रोग जास्त दिवस पिशवीत राहिले तर सोटमूळ वाढते व वेटोळे होतात.
त्यामुळे रोप खराब होते.शेवगा लागवडीनंतर पाच ते सहा महिन्यात काढणीस येतो काढणी सुरू झाल्यानंतर पुढील तीन ते चार महिने काढणी चालते.
शेंगा चांगल्या मांसल व मध्यम अवस्थेत तोडाव्यात व तोडणी करताना सायंकाळी किंवा लवकर सकाळी करावी. शेंगांची जाडी, पक्वता व लांबी इत्यादी नुसार प्रतवारी करून घ्यावी व काढणी केल्यानंतर ताजेपणा राहावा यासाठी ओल्या गोणपाटात मध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवावेत.
Published on: 16 September 2022, 07:03 IST