Agripedia

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सतत डीएपी च्या वाढत्या किमतीमुळे याखताचा पुरवठा आणि मागणीवर परिणाम होत आहे.याच कारणांमुळेशेतकऱ्यांना वेळेवर डीएपी त्यांना असलेल्या आवश्यकतेनुसार उपलब्ध होत नाही.

Updated on 15 May, 2022 11:02 AM IST

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सतत डीएपी च्या वाढत्या किमतीमुळे याखताचा पुरवठा आणि मागणीवर परिणाम होत आहे.याच कारणांमुळेशेतकऱ्यांना वेळेवर डीएपी त्यांना असलेल्या आवश्यकतेनुसार उपलब्ध होत नाही.

नाहीत्यामुळे पीक उत्पादनात  नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसमोर डीएपी  खताच्या बाबतीत असलेल्या स. मस्या सुटावी यासाठी, इंदिरा गांधी कृषि विश्वविद्यालय रायपूरच्या कृषी वैज्ञानिकांनी खरीप व रब्बी हंगाम 2022-23 या वर्षात पर्यायी खताचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्हींमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.

 धान आणि मका या पिकांसाठी डीएपी ऐवजी या खताचा प्रयोग(Paady And Corn Crop)

 धान आणि मका या पिकांमध्ये डीएपी च्या ऐवजी या खताचा प्रयोग करून चांगला नफा मिळू शकतो.

1-नायट्रोजन 40, फास्फोरस 24, पोटॅश 16 किलो ग्रॅम प्रती एकर पूर्ततेसाठी 50 किलो युरिया एक गोणी

2- नायट्रोजन वीस, फास्फोरस 20, पोटॅश 13 + युरिया दोन गोणी म्हणजे शंभर किलोग्रॅम

3- नायट्रोजन 12, फॉस्फरस 32, पोटॅश 16( एनपीके दोन गोणी ), युरियाच्या दोन गोण्या  म्हणजे शंभर किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो, सिंगल सुपर फास्फेट चा तीन गोणी म्हणजेच दीडशे किलो, पोटॅश 27 किलो ग्रॅम चा वापर करणे आवश्‍यक आहे.

4- त्यानंतर वर्मी कंपोस्ट कमीत कमी एका एकर साठी एक क्विंटल उपयोग करणे महत्त्वाचे आहे.

डाळवर्गीय पिके(Leguam Crop)

1-नायट्रोजन 8, फास्फोरस 20, पोटॅश आठ किलो प्रति एकर मात्रेच्या पूर्ततेसाठी युरिया 18 किलो, पोटॅश 14 किलो, सिंगल सुपर फास्फेट अडीच गोणी म्हणजे ते 125 किलो ग्रॅम किंवा युरिया 5 किलो

2-नायट्रोजन 12, फॉस्फरस 32 आणि पोटॅश सोळा किलो ग्रॅम + युरिया ची एक गोणी 50 किलो ग्रॅम, सिंगल सुपर फास्फेट 25 किलोसोबत वर्मी कंपोस्ट च्या कमीत कमी एक एकर साठी एक क्विंटल चा उपयोग महत्त्वाचा ठरेल.

 तेलवर्गीय पिके

1- प्रति एकर साठी नायट्रोजन आठ किलो, फॉस्फरस 20, पोटॅश आठ किलोग्राम + युरिया 17 किलो+ सिंगल सुपर फास्फेट 125 किलो ग्रॅम म्हणजे अडीच गोणी यांच्या सोबत एका एकरासाठी वर्मी कंपोस्ट एक क्विंटल चा उपयोग करणे गरजेचे आहे.

 ऊस पिकासाठी(For Cane Crop)

प्रति एकर साठी नायट्रोजन 120 किलो,फॉस्फरस 32,पोट्याश चोवीस किलोग्राम + युरिया पाच गोणी म्हणजेच अडीचशे किलो + सिंगल सुपर फास्फेट चार गोणी म्हणजेच 200 किलो चा उपयोग करणेमहत्त्वाचे ठरेल.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Urad Farming: अशी करा उडीद लागवड; अन मिळवा दर्जेदार उत्पादन; वाचा याविषयी

नक्की वाचा:Electric Car: एकदा चार्ज केली की 528 किलोमीटर धावते ही कार; जाणुन घ्या या कारची किंमत आणि फिचर्स

नक्की वाचा:Crop Damage: उन्हामुळे पिकाच होतेय नुकसान; पण काळजी नको कृषी वैज्ञानिकांनी दिला 'हा' मोलाचा सल्ला; वाचा

English Summary: this is optional chemical fertilizer is useful against dap fertilizer
Published on: 15 May 2022, 11:02 IST