Agripedia

खताची टंचाईचा सामना बऱ्याचदा शेतकरी बंधूंना करावा लागतो. कुठल्याही हंगामामध्ये जेव्हा पिकांना रासायनिक खते द्यायची वेळ येते तेव्हाच नेमकी खतांची टंचाई निर्माण होते. परंतु ही खतांची टंचाई बऱ्याचदा साठा असून देखील वाढीव दरात विक्री करण्याच्या लालसेने अशा पद्धतीचे टंचाई निर्माण केली जाते. परंतु यामध्ये सगळ्यात मोठी आर्थिक पिळवणूक होते ती शेतकरी बंधूंची.

Updated on 13 December, 2022 5:37 PM IST

खताची टंचाईचा सामना बऱ्याचदा शेतकरी बंधूंना करावा लागतो. कुठल्याही हंगामामध्ये जेव्हा पिकांना रासायनिक खते द्यायची वेळ येते तेव्हाच नेमकी खतांची टंचाई निर्माण होते. परंतु ही खतांची टंचाई बऱ्याचदा साठा असून  देखील वाढीव दरात विक्री करण्याच्या लालसेने अशा पद्धतीचे टंचाई निर्माण केली जाते. परंतु यामध्ये सगळ्यात मोठी आर्थिक पिळवणूक होते ती शेतकरी बंधूंची.

नक्की वाचा:जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु होणार; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय

कारण बऱ्याचदा जास्त पैसे देऊन लागणारे खत विकत घ्यावे लागते त्यामुळे आर्थिक भुर्दंड तर बसतोच. परंतु पिकांना वेळेवर खत उपलब्ध न झाल्यामुळे  पिकांवर विपरीत परिणाम होतो. परंतु बऱ्याचदा खतांचा साठा खरंच शिल्लक नसतो हे देखील तेवढे सत्य असते.

परंतु आता विक्रेते खरे बोलत आहेत की खोटे हे आपल्याला अगदी चुटकीसरशी समजू शकते. यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नसून तुम्ही अगदी तुमच्या घरात बसून दुकानातील खताच्या साठ्यासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यामुळे आपण या लेखात या संबंधीची महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.

 दुकानात खताचा साठा शिल्लक आहे की नाही हे अशा पद्धतीने बघा

1- यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर https://www.fert.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल कारण ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे.

2- या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या फर्टीलायझर डॅशबोर्ड या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

3- त्यानंतर तुमच्यासमोर e-Urvaeak नावाचे एक नवीन पेज ओपन होते. या पेजवर असलेल्या किसान कॉर्नर या पर्यायावर क्लिक करावे.

नक्की वाचा:बातमी शेतकरी बंधूंच्या कामाची! जमीन मालकी वरून भाऊबंदकित असणारे वाद आता संपतील, 'ही' योजना करेल यासाठी मदत

4- किसान कॉर्नर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 'रिटेलर ओपनिंग स्टॉक यझ ओन टुडे' नावाचे पेज उघडते. या ठिकाणी तुम्हाला तुमचे राज्य, दुकानदाराचा आयडी  ( समजा तुम्हाला दुकानदाराचा आयडी माहीत नसेल तर संबंधित एजन्सी चे नाव ) हे जरी माहीत नसेल तर ऑल हा पर्याय तसाच राहू द्या व शो या पर्यायावर क्लिक करा.

5- यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या दुकानात किती स्टॉक उपलब्ध आहे याची माहिती मिळणार आहे.

यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानाचा रिटेलर आयडी निवडला की त्या दुकानात किती खताचा साठा शिल्लक आहे हे तुम्हाला कळते.

6- एवढेच नाही तर दुकानदाराकडे कोणत्या कंपनीचे किती खत शिल्लक आहे याचे सर्व माहिती यामध्ये असते व सर्व खतांचे दर काय आहेत हे देखील दिलेले असते. परंतु यामध्ये शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यावे की बऱ्याचदा दर अपडेट केलेले नसतात यासाठी अपडेटेड दर जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक ठरते.

नक्की वाचा:बातमी कामाची: समृद्धी महामार्ग नजीक स्थापन केले जाणार नवनगर,शेतकऱ्यांच्या जमिनीला प्रतिवर्ष मिळणार 'इतका' मोबदला

English Summary: this is online process is so important for know about fertilizer storage in retailer shop
Published on: 13 December 2022, 05:37 IST