Agripedia

दुग्ध उत्पादनाकारता शेतकरी पाळत असलेल्याला दुभत्या जनावरांना लागणाऱ्या महागड्या खुराकामुळे दुग्ध उत्पादनावरील खर्च वाढत असतो.

Updated on 10 March, 2022 3:56 PM IST

अझोला शेती- दुग्ध उत्पादनाकारता शेतकरी पाळत असलेल्याला दुभत्या जनावरांना लागणाऱ्या महागड्या खुराकामुळे दुग्ध उत्पादनावरील खर्च वाढत असतो . खर्च कमी करण्यासाठी घरच्या घरी कमी खर्चात अधिक चांगला नैसर्गिक वनस्पतिजन्य चारा म्हणजेच अँझोला वनस्पती दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशिर ठरत आहे

घरच्या घरी कमी खर्चात अधिक चांगला नैसर्गिक वनस्पतिजन्य चारा म्हणजेच अँझोला वनस्पती दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशिर ठरत आहे.ऍझोला पाणवनस्पती ही बहुगुणकारी वनस्पती आहे. शेतकऱ्यांनी आपल्या घराशेजारी सावलीमध्ये या पानवनस्पतीचे संगोपन कराण्यात‌येत.ही वनस्पती हिरवळीचे खत म्हणून उपयोगात आणता येते. या पाणवनस्पतीच्या पेशीत नत्र स्थिर करणारी ऍनाबीना ऍझोली नावाची नील-हरित शेवाळ वर्गातील वनस्पती वाढत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदेशीर ठरते.

 अझोला ची निर्मिती 

झाडाच्या सावलीत किंवा ५० टक्के शेडनेटचा वापर करून ९ फूट लांब व ६ फूट रुंद व ९ इंच खोलीचा खड्डा करावा.पाणी झिरपू नये म्हणून खड्डा चांगल्या प्रतीच्या प्लॅस्टिक किंवा पॉलिथिनने आच्छादून घ्यावा.१२-१५ किलो माती प्लॅस्टिकवर पसरवून घ्यावी. 

त्यावर ३-४ किलो चांगले कुजलेले गाईचे शेण व ३०-४० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट १० लिटर पाण्यात चांगले मिसळून हे मिश्रण खड्यात सोडावे,खड्डयात ८-१० सें.मी. पाणी राहील, याची काळजी घ्यावी.तयार खड्ड्यातील पाण्यात.५ ते १ किलो अँझोलाचे कल्चर सोडावे.८-१० दिवसांत खड्डा अँझोलाने भरून जातो. अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी असे एकापेक्षा अधिक खडडे तयार करावेत.

 

अझोलाचे फायदे :

•दुग्ध उत्पादनात १५-२० टक्के (अर्धा ते एक लिटर प्रति जनावर ) वाढ होते.

•प्रचलित पशुखाद्यावरील खर्च २०-२५ टक्क्यांनी कमी होतो.

•दुभत्या जनावरांसोबतच ही वनस्पती मांसल (ब्रॉयलर) कोंबड्या तसेच अंडी देणाऱ्या कोंबड्यांनाही पुरवून उत्पादन वाढवू शकतो. याचबरोबर शेळ्या, मेंढ्या, वराह यांना पुरविल्यास त्यांच्याही उत्पादनात चांगली वाढ होते.

•अँझोला उत्पादनावरील खर्च अत्यंत कमी असून, त्यातुलनेत अझोला उत्पादन अधिक आहे.

•अझोला पुरविलेल्या जनावरांची वाढ व उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

•ही सेंद्रिय व नैसर्गिक वनस्पती आहे; त्यामुळे जनावरांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत नाही.

कमी जागेत उत्पादन घेता येते. प्रकल्प सुरू करायला लागणारी गुंतवणूक ही कमी आहे. दुधाची गुणवत्ता वाढते. जनावरांची प्रकृती सुधारून आयुष्यमानही वाढते.

 

अझोलातील पोषण मूल्ये :

प्रथिने :- २५-३० %

आवश्यक अमिनो आम्ले :- ७ -१० %

जीवनसत्त्वे:- १०-१५ %

खनिजे (कॅल्शियम, स्फुरद, पालाश, लोह, तांबे) :-१०-१५%

 

खालील बाबींची काळजी घ्यावी

खड्याचीजागा सावलीत, पण भरपूर सूर्यप्रकाश मिळणारी असावी. दर २५-३० दिवसांनी खड्याची ५ टक्के माती ताज्या काळ्या मातीने बदलावी.

अझोला चे वाळवी, मुंग्या, किडे यांपासून संरक्षण करावे.

दर ५ दिवसांनी खड्ड्यातील २५-३० टक्के पाणी काढून त्यात ताजे पाणी टाकावे.

खड्यातील पाण्याची पातळी कायम ८-१० सें.मी. असणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात कडक उन्हामुळे अझोलाचा रंग हिरवट तांबडा किंवा विटकरी होतो. त्याच्या वाढीवर परिणाम होतो.

अझोला निर्मिती खडडयाच्या गारव्याला कुत्री व अन्य प्राणी येऊन बसतात, त्यांच्यासाठी बाजूने खांब रोवून दोरी किंवा कापड किंवा गॅबियन मेशचे कुंपण करून घ्यावे.

झाडाखाली खडडा केला असल्यास पालापाचोळा पडून कुजल्याने अझोला खराब होऊ शकतो. त्यासाठी वरून आच्छादन आवश्यक आहे.

शेण उपलब्ध आहे म्हणून अधिक वापर होतो. त्यामुळे अमोनिया निर्माण होऊन त्याचा वास अझोला ला येतो; त्यामुळे योग्य प्रमाणात शेणखत टाकावे.

 

अझोला देण्याची पद्धत व प्रमाण

अझोला जसेच्या तसे जनावरांना किंवा इतर खुराकात मिसळून देता येते.दुधाळ जनावरांना रोजच्या आहारात २ ते ३ किलो अँझोला शेतकरी देऊ शकतात. अँझोला जनावरांना देण्यापूर्वी स्वच्छ धुऊनच द्यावे.

 

ऋतुजा ल. निकम ( MBA AGRI)

English Summary: This is one animal feed know about detail information
Published on: 10 March 2022, 03:56 IST