Agripedia

शेतकरी बंधू उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात करू लागले आहेत. या तंत्रज्ञानामध्ये पॉली हाउस मधील शेती हे प्रगत तंत्र आहे. या तंत्राच्या साह्याने शेतकरी हंगामी आणि बिगर हंगामी भाजीपाला घेऊन चांगले उत्पादन मिळवू शकतात. परंतु या तंत्रज्ञानामध्ये पिके घेत असताना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे असते.

Updated on 16 August, 2022 1:32 PM IST

शेतकरी बंधू उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात करू लागले आहेत. या तंत्रज्ञानामध्ये पॉली हाउस मधील शेती हे प्रगत तंत्र आहे. या तंत्राच्या साह्याने शेतकरी हंगामी आणि बिगर हंगामी भाजीपाला घेऊन चांगले उत्पादन मिळवू शकतात. परंतु या तंत्रज्ञानामध्ये पिके घेत असताना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे असते.

या लेखात आपण पॉलिहाऊस मध्ये शेती करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, जेणेकरून आपल्याला मिळणारे उत्पादन हे जास्त मिळेल. या बाबतीतली माहिती घेऊ.

 पॉलिहाऊस फार्मिंगमध्ये या गोष्टींची घ्यावी विशेष काळजी

1- जेव्हा आपण पॉलिहाऊसमध्ये पिकांची लागवड केलेली असते. तेव्हा ऋतूनुसार काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. समजा हिवाळा असेल तर यावेळी पॉलिहाऊसचे शेडनेट दुपारी दोन ते तीन तास उघडणे गरजेचे असते.

असं केल्याने जो काही ओलसरपणा असतो त्यामुळे जे रोग किंवा कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते ती जवळजवळ कमी होते. तसेच पिकाला भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे पिकांचे पोषण चांगले होते व पर्यायाने वाढ देखील जोमदार होते.

नक्की वाचा:Technology: शेतकरी बंधूंनो! 'या' तंत्राचा वापर कराल तर घेता येईल वर्षभर पिकांचे उत्पादन,होईल फायदा

2- एखाद्या भाजीपाल्याची रोपवाटिका किंवा फळांचे रोपवाटिका जर पॉलीहाउस मध्ये तयार केली असेल तर संतुलित पोषण द्रव्य पुरवठ्यासाठी विद्राव्य खतांचे पाण्यात द्रावण तयार करून रोपवाटिकानां देणे गरजेचे आहे. यामुळे वनस्पतींना लागणाऱ्या ओलावा  टिकून राहतात व पोषणच्या बाबतीत असलेली कमतरता देखील पूर्ण होते.

3- बरेचदा पॉलिहाऊस किंवा हरितगृहामध्ये काही भाग थोडा फाटलेला असतो. हे टाळण्यासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कारण या फाटलेल्या भागांमधून कीटक व रोगाचा प्रवेश पॉलिहाऊसमध्ये होऊ शकतो. त्यामुळे जरासा फाटलेल्या भाग असतील तर त्याला शिलाई मारून घेणे उत्तम ठरते किंवा पॉलिहाऊसची पॉली वेळोवेळी बदलणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:Mix Crop Cultivation: लसुन आणि मिरचीची मिश्रशेती देईन शेतकऱ्यांना खूप आर्थिक फायदा, मिळेल समृद्धी

4- पॉलिहाऊस साठी लागणारे साहित्य हे दर्जेदार असणे कधीही चांगले कारण तुम्ही स्वस्त मटेरियलचा वापर केला तर यामध्ये मेंटेनन्स चा खर्च वाढण्याची  शक्यता असते. त्यामुळे दर्जेदार पॉलिहाऊस तुम्हाला चांगला परतावा देऊ शकते.

5- तुम्हाला जर पॉलीहाऊस फर्मिंग च्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर भाजीपाला लागवडीचा विचार करण्याआधी बाजारात ज्या भाजीपाल्याला जास्त मागणी असते, त्या दृष्टीकोनातून लागवड करणे फायद्याचे ठरते.

6- पॉलिहाऊस फार्मिंगच्या माध्यमातून तुम्हाला चांगला परतावा पाहिजे असेल तर तुम्ही सिंचनासाठी चांगल्या पाण्याचा वापर तसेच दर्जेदार जमीन व दर्जेदार बियाणे तसेच रोपवाटिका आणि टेक्निकली मॅनेजमेंटची देखील गरज असते.

नक्की वाचा:Water Soluble fertilizer: फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा वापर ठरेल पिकांसाठी महत्वाचा, मिळेल भरघोस उत्पादन

English Summary: this is main important thinks in polyhouse farming
Published on: 16 August 2022, 01:32 IST