Agripedia

शेती व्यवसायासोबतच पशुपालन हा व्यवसाय भारतात मोठ्याप्रमाणावर केला जातो. यामध्ये मुख्यतः गाई,म्हशींचे पालन केले जाते.

Updated on 26 January, 2022 6:35 PM IST

शेती व्यवसायासोबतच पशुपालन हा व्यवसाय भारतात मोठ्याप्रमाणावर केला जातो. यामध्ये मुख्यतः गाई,म्हशींचे पालन केले जाते. भारतात गायींच्या जवळजवळ २६ जाती आहेत. यामध्ये साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी या गायी सर्वोत्कृष्ट समजल्या जातात. गायींपासून शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न (income) मिळते यांमुळे शेतकरी पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात.

भारतातील गायींच्या जाती

भारतात प्रामुख्याने डांगी, देवणी, खिल्लार, साहिवाल, गिर, गवळावू, देवणी या जातीच्या गायींचे पालन केले जाते.

१) देवणी : महाराष्ट्रात लातूर, नांदेड,उस्मानाबाद,बीड,परभणी जिल्ह्यात ही गाय आढळून येते. डांगी व गिर यांच्या संक्रमनातून तयार झालेल्या,

या गाईला मराठवाड्याचे भूषण असे म्हणतात. ही गाई दिवसाला ६ तर ७ लिटर दूध सहज देत असून एका वेतात 636 – 1230 किलोग्रॅम एवढे दूध उत्पादन देते.

२) खिल्लार– महाराष्टात हि गाय सोलापूर,सातारा, पुणे व कोल्हापूर येथे प्रामुख्याने आढळते. या गाई प्रति वेतात ९०० ते १००० किलोग्रॅम एवढे दूध देतात. हि गाय अत्यंत चपळ, काटक व सुंदर दिसते.

३) गवळावू– ही गाई नागपूर व वर्धा जिल्ह्यात आढळत असून ही गाय दुधासाठी प्रसिद्ध आहे. गवळावू गाय एका वेतात ८०० लिटर दूध देते. या गाई पासून मिळणारे बैल हे चपळ व उत्कृष्ष्ट असतात. हि गाय हलक्या बांध्याची व माध्यम उंचीची असूनही जाड कामासाठी उपयुक्त आहे.

४) राठी – राठी ही दुधाळ जनावरांची जात म्हणून ओळखली जाते. जी राजस्थानच्या कोरड्या प्रदेशात आढळते. ही जात साहिवाल, रेड सिंधी, थारपारकर आणि धान्नी जातींच्या एकत्रीकरणातून विकसित (develope) झाल्याचे मानले जाते, ज्यात साहिवाल रक्ताचे प्रमाण आहे. गुरे हे कार्यक्षम आणि चांगले दूध देणारे आहेत. ते 1560 किलोग्रॅम दूध तयार करतात आणि दुग्धपान दूध उत्पादन 1062 ते 2810 किलोग्रॅम पर्यंत असते.

५) डांगी – भारतातील एक देशी गुरांची जात म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश स्थानिक भाषेत हिला सोनखेरी व कलबेरी असेही म्हणाले जाते. डांगी ह्या गाईचे नाव डांग पर्वत रांगामधून पडले. सह्याद्री पर्वत रंगांधले हे गोवंश आहे. डांगी ह्या गाई भिजल्या तरी पाणी अंगात मुरत नाही तसेच आजरपण हि येत नाही हे अति महत्वाचे वैशिष्ठ आहे.डांगी ही जात शरीराच्या आकाराने मध्यम ते मोठी असते. अतिवृष्टीच्या भागात त्यांच्या अनुकूलतेसाठी त्यांच्या त्वचेतून तेल घटक स्राव होतो ज्यामुळे ते अतिवृष्टी (Heavy rain fall) सहन करू शकतात.

६) साहिवाल – साहिवालचा ह्या गाईचा उगम अविभाजित भारताच्या माँटगोमेरी प्रदेशात झाला आहे . या गुरांची जात लोला, लांबी बार, तेली, मांटगोमेरी आणि मुलतानी या नावानेही ओळखली जातात साहिवाल ही देशातील सर्वोत्कृष्ट देशी डेअरी जाती आहे. साहिवालचे सरासरी दूध उत्पादन 1400 ते 2500 किलोग्रॅम प्रति दुग्धपान आहे. हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेश सारख्या भारतातील अनेक भागांमध्ये आढळू शकते.

 

संकलन - विजय भुतेकर

चिखली, बुलढाणा

English Summary: This is Indian more yield give cow breed
Published on: 26 January 2022, 06:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)