Agripedia

गुलाब फुलाला वर्षभर जागतिक आणि स्थानिक बाजारात मागणी असते. देशांतर्गत बाजारपेठेत देखील दर्जेदार गुलाब फुलांना मागणी वाढत आहे. त्यामुळे हरितगृहातील गुलाब फुल शेती अधिक फायद्याची ठरू शकते.

Updated on 04 February, 2022 2:22 PM IST

गुलाब फुलाला वर्षभर जागतिक आणि स्थानिक बाजारात मागणी असते. देशांतर्गत बाजारपेठेत देखील दर्जेदार गुलाब फुलांना मागणी वाढत आहे. त्यामुळे हरितगृहातील गुलाब फुल शेती अधिक फायद्याची ठरू शकते.

त्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे फायद्याचे ठरेल जर आपण ख्रिसमस, व्हॅलेंटाईन डे या सारख्या तसेच लग्न समारंभ यांच्या कालावधीचा विचार करून जर सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान बाजारात फुले विक्रीस आणता येतील या दृष्टीने लागवड करणे फायद्याचे ठरते.कमीत कमी दहा ते वीस गुंठे क्षेत्रावरील लागवड फायदेशीर ठरेल. या लेखात आपण हरितगृहातील गुलाब लागवड तंत्रज्ञान जाणून घेऊ.

 हरितगृहातील गुलाब लागवड तंत्रज्ञान

  • हवामान- फुलांचा रंग, फुलाच्या पाकळ्यांची संख्या, फुल दांड्याची लांबी या सगळ्या गोष्टी तापमानावर अवलंबून असतात. गुलाबाच्या योग्य वाढीसाठी कमाल तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस इतके असावे. वातावरणातील सापेक्ष आद्रता हे 60 ते 70 टक्के असावी.आद्रता जर कमी असेल तर लाल कोळी किडीचा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. किंवा जास्त आद्रता व कमी तापमानात बोटट्रायटीस व डाऊनी मिल्ड्यू या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • गुलाब लागवडीची वेळ- निर्यातीसाठी गुलाबाची उपलब्धता सप्टेंबरपासून असावी लागते. सप्टेंबर मध्ये गुलाब विक्रीसाठी यावा यासाठी मे किंवा जून महिन्यामध्ये लागवड करावी.

जमिनीचे व्यवस्थापन

  • गुलाब लागवडीसाठी गादीवाफे तयार करताना मातीचे निर्जंतुकीकरण करणे फार आवश्यक असते. त्यासाठी 100 चौरस मीटर भागासाठी साडेसात ते दहा लिटर फार्मोलीनप्रति 100 लिटर पाण्यात मिसळून ते दहा बाय दहा मीटर क्षेत्रावर झारीच्या साह्याने शिंपडावे. त्यानंतर काळे प्लास्टिक पेपरने माती सात दिवस हवाबंद व्यवस्थित झाकून ठेवावी. त्यानंतर प्रति चौरस मीटर क्षेत्रासाठी 100 लिटर चांगले पाणी वापरून जमीन फ्लश करून घ्यावी. त्यामुळे जमिनीतील आम्लयुक्त पाण्याचा निचरा होऊन जमीन आमलविरहित होते. त्यानंतर वापसा आला कि अपेक्षित मापाप्रमाणे गादीवाफे तयार करून त्या रोपांची लागवड करावी.
  • हरितगृहाच्या लांबी प्रमाण योग्य लांबीची 1 ते 1.6 मीटर रुंद व 30 सेंटिमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावेत. दोन वाफ्याच्या  दरम्यान 50 ते 60 सेंटिमीटर अंतर राखावे.
  • जमीन खडकाळ, मुरमाड किंवा लागवड योग्य नसेल तर मातीविना माध्यम कोकोपीटचा वापर करावा.
  • जर कोकोपीटचा वापर केला तर स्टॅंड कुंड्या सिंचन यंत्रणेसाठी अंदाजे 30 टक्के जादा खर्च येतो. परंतु कोकोपीट मधील बुरशीजन्य रोगांचा मुळाना होणारा प्रादुर्भाव टाळता येतो.
  • कोकोपीट मधील गुलाब लागवडीसाठी 30 सेंटीमीटर व्यासाची कुंडी वापरावी. कुंडीचे आकारमान तिच्यात वीस लिटर पाणी मावेल इतके असावे. पाच गुंठे साठी 3200 कुंड्या व दोन रोपे प्रति कुंडी या प्रमाणे लागवड करावी.
  • रोजा इंडिका, रोझा मल्टिप्लोरा, मेटल ब्राँयर या तिन्ही पैकी एक गुंठा व डोळे भरलेली पोली बॅग मध्ये वाढवलेली सात ते आठ महिने वयाचे कलमे वापरावे.
  • लागवड करताना ती पंचेचाळीस बाय वीस सेंटीमीटर अंतरावर करावी. दोन ओळीतील अंतर 30 ते 45 सेंटिमीटर व दोन रूपात 15 ते 20 सेंटिमीटर अंतर ठेवावे. प्रति चौरस मीटर क्षेत्रावर सहा ते नऊ रोपे लावावीत.

3-पाण्याचे व्यवस्थापन- पाण्याचा सामू हा साडेसहा ते सात दरम्यान असावा जर सामू जास्त असेल तर योग्य प्रमाणात नायट्रिक ऍसिड चा वापर करावा. पाणी सहाशे ते साडे सातशे मिली दिवस या प्रमाणात द्यावे.

  • आंतरमशागत- फांद्या वाकवणे-फांदया जमिनीलगत 45 अंश कोनात वाकवणे आवश्यक असते. पानातील अन्नद्रव्य जोमाने वाढणाऱ्या फांद्या आंकडे पाठवणे हा त्यामागील उद्देश असतो.

कळ्या खुडणे- पानांच्या बेचक्यातून वाढणाऱ्या कळ्या खुडल्या मुळे फुल दांड्यांची व फुलांची गुणवत्ता सुधारते.

 शेंडा खुडणी- फांद्या सरळ व जोमाने वाढवणे हा उद्देश ठेवून फांदीवरील मुख्य कळी शेंड्या सह काढणे याला टॉपिंग म्हणतात.

उन्हाळ्यामध्ये कमकुवत आनंद यांचे टॉपिंग करावे.

5-खत व्यवस्थापन-- प्रति चौरस मीटर क्षेत्रासाठी  शेणखत  दहा किलो या प्रमाणात वापरावे. लागवडीनंतर तीन आठवड्यांनी नत्र 30 ग्रॅम,स्फुरद 30 ग्रॅम व पालाश ग्रॅम या प्रमाणात विद्राव्य खतातून ठिबक संचातून सोडावे. एक महिन्यानंतर पुढील चार महिने पुढील प्रमाणे विद्राव्य खते द्यावीत.

आ) एकात्मिक खत व्यवस्थापन- लागवडीनंतर दर वर्षी प्रति चौरस मीटर क्षेत्रासाठी शेणखत दोन किलो अधिक निंबोळी पेंड 200 ग्राम त्या प्रमाणामध्ये द्यावे. तसेच गांडूळ खत 500 ग्रॅम चौरस मीटर या प्रमाणात वर्षातून दोन वेळा द्यावे त्याशिवाय जैविक खते अझोस्पिरिलम अधिक पीएसबी प्रति दोन ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात दर दोन महिन्यांनी द्यावे. गांडूळ खत 500 ग्रॅम / चौरस मीटर क्षेत्रास वर्षातून दोन वेळा द्यावे.

English Summary: this is improvise technology and management in rose cultivation in shadenet
Published on: 04 February 2022, 02:22 IST