Agripedia

कपाशी हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असून गेल्या काही वर्षापासून गुलाबी बोंड अळीच्या रुपात एक वेगळेच ग्रहण या पिकावर आले आहे. आपल्याला माहित आहेच कि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कपाशी पिकाचे अतोनात नुकसान होते व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांच्या वापरावर अमाप खर्च देखील केला जात आहे

Updated on 24 September, 2022 11:57 AM IST

कपाशी हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असून गेल्या काही वर्षापासून गुलाबी बोंड अळीच्या रुपात एक वेगळेच ग्रहण या पिकावर आले आहे. आपल्याला माहित आहेच कि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कपाशी पिकाचे अतोनात नुकसान होते व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांच्या वापरावर अमाप खर्च देखील केला जात आहे

परंतु त्या अळीचे नियंत्रण होते की नाही हा देखील एक संशोधनाचा भाग आहे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे, हे देखील शेतकरी बंधूंना माहिती आहे. परंतु तरीसुद्धा आपण या लेखात काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ.

नक्की वाचा:कापूस दरवाढ रोखण्याचा दबाव केंद्राने झुगारला, असा राहील शेतकऱ्यांच्या कापसाला दर

 गुलाबी बोंड अळीचे परफेक्ट व्यवस्थापन

1- यासाठी सगळ्यात आगोदर पिकाची लागवड केल्यानंतर जेव्हा कपाशी 45 ते 50 दिवसाची होते तेव्हा शेतामध्ये एकरी दोन कामगंध सापळे लावावेत जेणेकरून याचे सर्वेक्षण करता येईल. नर पतंगाच्या नियंत्रणासाठी हेक्‍टरी 20 कामगंध सापळे वापरावेत. बोंड आळीच्या प्रकारानुसार विविध ल्युरचा वापर करावा. प्रत्येक महिन्याला ते बदलावे.

2- आपण दररोज शेतामध्ये फेरफटका मारल्यानंतर पिकात फिरतो. परंतु हे फिरत असताना एका आठवड्यातून किमान एकदा तरी कपाशीच्या ठराविक दहा ते पंधरा झाडांचे सूक्ष्म निरीक्षण करावे. या झाडांवरील पात्या, फुले आणि हिरवी बोंडे मोजावेत.

या झाडांपैकी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेली किती झाडे आहेत हे काळजीपूर्वक पहावे. याआधी निरीक्षणामध्ये जर तुम्हाला नुकसानीचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आढळून आले तर योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे.

नक्की वाचा:धान पिकातील खोडकिडा गादमाशी आणि वेगवेगळ्या कीटकांचे असे करा व्यवस्थापन

3-या सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच फेरोमन सापळे पिकापेक्षा एक ते दीड फूट उंच लावावेत व त्यामध्ये गुलाबी बोंड अळीचे लिंग प्रलोभने गॉसिपल्युर बसवावे व या सगळ्यांमध्ये दोन ते तीन दिवस सतत आठ ते दहा पतंग आढळून आल्यास त्वरित उपाययोजना कराव्यात.

4- तसेच कपाशीच्या शेतातील हिरवी बोंडे( कैऱ्या) फोडून नियमित सर्वेक्षण करावे व गुलाबी बोंड आळीने प्रादुर्भाव झालेली दहा टक्के बोंडे आढळून आल्यास व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्यात.

5-ट्रायकोग्रामा स्पे.या मित्र कीटकांची अंडी असलेली ट्रायकोकार्ड शेतात लावावेत.

6- पिकावर मित्र कीटक व किडी यांचे प्रमाण 1:5 आढळल्यास रासायनिक घटकांऐवजी निंबोळी अर्क (5%) प्रमाणे फवारणी करावी.

 किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर उपाय योजना

1- ट्रायकोग्रामा दीड लाख अंडी प्रसारण करावे तसेच फेरोमन सापळे( हिरव्या बोंड आळी साठी हेक्साल्युर आणि गुलाबी बोंड आळी साठी गॉसिपल्युर) हेक्टरी मोठ्या प्रमाणात लावावेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किडींच्या जैविक नियंत्रणासाठी प्रति हेक्‍टरी 20 पक्षीथांबे उभारावेत.

2- निंबोळी अर्क किंवा अझाडीरेक्टीन ( कडूनिंब उपयुक्त कीडनाशक) 300 पीपीएम 50 मिली किंवा स्पिनोसॅड( 45 एस सी)2.22 मिली फवारणी करावी.

नक्की वाचा:असे करा नागअळी चे व्यवस्थापन वाचेल मोठी मेहनत

English Summary: this is important management tips of pink bool worm in cotton crop
Published on: 24 September 2022, 11:57 IST