Agripedia

भाजीपाला पिकांमध्ये वांगी हे पीक खूप महत्त्वपूर्ण असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये वांग्याचे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. जर आपण वांग्याच्या बाजारभावाचा विचार केला तर वर्षभर वांग्याला बाजारभाव चांगला मिळतो. परंतु वांगा पिकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे किडीचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणावर होतो. त्यामुळे कीड व्यवस्थापन यावर फार काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असते.

Updated on 24 October, 2022 8:23 PM IST

भाजीपाला पिकांमध्ये वांगी हे पीक खूप महत्त्वपूर्ण असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये वांग्याचे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. जर आपण वांग्याच्या बाजारभावाचा विचार केला तर वर्षभर वांग्याला बाजारभाव चांगला मिळतो. परंतु वांगा पिकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे किडीचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणावर होतो. त्यामुळे कीड व्यवस्थापन यावर फार काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असते.

जर आपण वांगी पिकावरील कीडीचा विचार केला तर यामध्ये फळ पोखरणारी अळी ही खूप नुकसानदायक ठरते. त्यामुळे या लेखात आपण या किडीचे नियंत्रण कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Water Soluble Fertilizer: विद्राव्य खतांचा वापर करत आहात तर 'अशा' पद्धतीने घ्या काळजी, तरच मिळेल भरघोस उत्पादन

 वांगी पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

1- या किडीमुळे सगळ्यात जास्त वांगी पिकाचे नुकसान होत असते. ही कीड वांग्याच्या झाडाच्या खोडात शिरून आतील भाग पोखरून खाते. त्यामुळे झाडाचे शेंडे सुकतात आणि झाडाची वाढ खुंटते.

2- यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या त्या झाडाच्या शेंड्यावर या आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे अशी शेंडे काढून टाकणे गरजेचे आहे.

3- या अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी घ्यायचे असेल तर क्लोरोपायरीफॉस 17 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर निंबोळी अर्काची( 5%)फवारणी करावी.त्यानंतर डायमेथोएट 15 मिली+ नुवाक्रोन मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे त्यानंतर परत निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.

4- मल्टी नुट्रीऐंट्स दोन लिटर प्रति 300 लिटर पाणी याप्रमाणे 20 दिवसांच्या अंतराने फवारणी करणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर डीएपी 0.5 टक्के व 13:0:45 हे खत 0.5 टक्केच्या आठ दिवसाच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

नक्की वाचा:Crop Planning: शेतकरी बंधूंनो! उन्हाळ्यामध्ये गवार लागवडीतून मिळवायचा असेल बंपर नफा तर 'अशा' पद्धतीने करा व्यवस्थापन, वाचा डिटेल्स

5-यासोबतच जमिनीतून फेरस सल्फेट,झिंक सल्फेट तसेच मॅग्नीज सल्फेट 10 किलो प्रत्येकी बोरॅक्‍स दोन किलो प्रती एकर याप्रमाणे शेणखतासोबत द्यावे.

6- लैंगिक गंध सापळा अर्धा एकर साठी पाच याप्रमाणे लावावीत व त्यातील गोळी दर पंधरा दिवसांनी बदलणे गरजेचे आहे. त्यासोबतच प्रकाश सापळे अर्धा एकर साठी एक या प्रमाणात लावावा.

7- त्यासोबतच जिवाणू खते यांचा अझोटोबॅक्टर दोन किलो+ पीएसबी दोन किलो आणि शेणखत मिसळून जमिनीला द्यावे.

( टीप- कुठलीही फवारणी करण्याअगोदर कृषी तज्ञांचा सल्ला घेणे किंवा कृषी सेवा केंद्र चालकांचा सल्ला घेणे कधीही फायद्याचे ठरते.)

नक्की वाचा:Floriculture: फुल शेती करायचा प्लान असेल तर करा 'या' फुलाची लागवड, कमवाल बंपर नफा

English Summary: this is important management tips in insect management in brinjal crop
Published on: 24 October 2022, 08:23 IST