Agripedia

आपल्याकडे चंदनाची शेती फारच कमी प्रमाणात केली जाते. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात काही ठिकाणी चंदनाची झाडे दिसतात. जर चंदनाची शेती केली तर एका एकरात काही कोटींची कमाई होऊ शकते.

Updated on 16 February, 2022 5:21 PM IST

आपल्याकडे चंदनाची शेती फारच कमी प्रमाणात केली जाते. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात काही ठिकाणी चंदनाची झाडे दिसतात. जर चंदनाची शेती केली तर एका एकरात  काही कोटींची कमाई होऊ शकते.

परंतु चंदनाची शेती बद्दल हवी तेवढी माहिती आपल्याकडे नाही.या लेखात आपण चंदनाची शेती आणि झाडा बद्दल थोडक्यात माहिती घेऊ.

 किती असते चंदनाच्या झाडाची किंमत?

 चंदनाची झाडे खूप महागडी असतात. आपल्याला माहित आहेच कि याचा वापर होमहवन आणि पूजा मध्ये करतात. या महागड्या चंदनाची देखील शेती केली जाते हे फार कमी जणांना माहिती असेल. कारण आपल्या देशात फारच तुरळक ठिकाणी चंदनाची शेती केली जाते. जर एकजरी झाड चंदनाच्या लावले तरी कमीत कमी त्याची किंमत पाच लाख रुपये एवढी आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये चंदन शेतीचा प्रयोग झालेला आहे.

 किती असते चंदनाच्या एका रोपाची किंमत?

 चंदनाची रोपे खूप महाग मिळतात. एका रोपासाठी पाचशे ते सहाशे रुपये मोजावे लागतात. सरकारदेखील चंदनाच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. चंदनाची शेती आंध्र प्रदेश,कर्नाटक मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात चंदनाचे बियाणे पूर्वी कर्नाटकातून यायचे मात्र आता ते महाराष्ट्रातही उपलब्ध आहे.

 चंदनाची लागवड पद्धत

 चंदनाला  सोन्या पेक्षा जास्त किंमत आहे कारण ते सर्वच बाबतीत दुर्मिळ आहे. म्हणजे 100 बिया पेरल्या तर त्यामध्ये  10 ते 15 टक्के किंवा जास्तीत जास्त 25 टक्के येतात. एका किलो बियाणे पासून दोनशे ते अडीचशे रोपे तयार होतात. चंदनाच्या लागवडीसाठी जून महिना योग्य मानला जातो. पेरलेले बियाणे उगवायला जवळपास दोन महिने लागतात. उगवल्यानंतर पंधरा दिवसानंतर पिशवीत ठेवले जाते. दोन वर्षात चंदनाच्या रोपट्याची वाढ पिशवीतच होते. पाच ते सहा वर्षात झाडाची उंची 12 ते 15 फूट एवढी अपेक्षित आहे. ज्या खड्ड्यात चंदन लावलेला आहे तो खड्डा माती आणि शेणखताने भरलेला असतो.  चंदनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व प्रकारच्या मातीत उगवते आणि तग धरते.

चंदन शेती वर सरकारचे धोरण

 चंदनाची शेती कुणीही करू शकतो पण त्याची निर्यात मात्र शेतकरी करू शकत नाही. कुठल्या कंपन्यांनाही त्याची निर्यात बंदी आहे. याचा अर्थ फक्त सरकार चंदनाचे निर्यात करू शकते. चंदनाचे झाड तयार झाले की वनविभागाला तशी माहिती द्यावी लागते. त्यानंतरच निर्यातीचे काम केले जातात. चंदन हे जगातील सगळ्यात महाग झाड आहे. सध्या त्याची किंमत प्रति किलो 27 हजार रुपये आहे. एका झाडापासून 15 ते 20 किलो चंदनाचे लाकूड मिळते. त्याची किंमत पाच ते सहा लाख रुपये एवढी आहे. सुगंधी तेलापासून ते आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये चंदनाचा वापर केला जातो. म्हणूनच तर जास्त किंमत आहे

 चंदनात मिश्र शेती

 चंदनाच्या शेती मध्ये इतर पिके देखील घेता येतात. चंदनाच्या दोन झाडांच्या मध्ये वीस फुटाचे अंतर ठेवावे. त्यामध्ये इतर पिके देखील घेता येतात फक्त ऊस आणि तांदूळ त्यामध्ये घेता येत नाही. कारण या दोन्ही पिकांना पाणी भरपूर लागते आणि चंदनाच्या झाडाला पाण्याचा धोका जास्त असतो.

लाल आणि पांढरा चंदन

चंदनाचे झाड हळूहळू पक्व होते. चंदनाचे झाड जसजसे पक्क होत जाते तसतसा त्याचा सुगंध वाढत जातो. सुगंधी येतो तसे त्याचे वजनही वाढतं. चंदनाचे झाड जेवढ्या जास्त काळठेवाल त्यानुसार त्याचे वजन भरते. चंदनाची दोन प्रकार आहेत एक लाल चंदन आणि दुसरी पांढरा चंदन. आपल्याकडे पांढऱ्या चंदनाची शेती केली जाते कारण आपल्याकडे जमीन त्यासाठी अनुकूल आहे.हरियाणा,पंजाब,उत्तर प्रदेशात पांढरा चंदनाची शेती केली जाते. पाच ते 47 अंश  डिग्री सेल्सियस तापमानात चंदन व्यवस्थित येतो.

English Summary: this is important information about sandalwood farming and tree
Published on: 16 February 2022, 05:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)