हरभरा ही रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. जर आपण हरभरा लागवडीचा विचार केला तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जाती यामध्ये आहेत. परंतु या मधील काही जाती खूप महत्त्वपूर्ण असून अशा जातींची लागवड शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
तसेच जास्तीच्या उत्पादनासाठी सुधारित जातीसोबतच पेरणीची पद्धत तसेच खत व्यवस्थापन, जमिनीची निवड, पाणी व्यवस्थापन इत्यादी गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या लेखामध्ये आपण हरभरा पिकाची पेरणीचे तंत्र आणि काही सुधारित जातींची माहिती घेऊ.
हरभऱ्याची पेरणी तंत्र
तर आपण हरभऱ्याची पेरणी तंत्राचा विचार केला तर देशी हरभऱ्याची पेरणी पाभर किंवा तिफणीने करणे गरजेचे आहे. बहुतेक शेतकरी हरभऱ्याची पेरणी पाभरीने करतात.
पेरणी करताना दोन ओळींमध्ये साधारणतः 30 सेंटीमीटर अंतर ठेवणे गरजेचे असून दोन रोपांमधील अंतर दहा सेंटिमीटर ठेवून टोकन होईल असे ट्रॅक्टर वर चालणारे पेरणी यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने देखील तयार केले आहे. शेतकऱ्यांनी या यंत्राचा वापर केला तर खूप फायद्याचे ठरू शकते.
समजा शेतकरी बंधुंनी जर या प्रकारे पेरणी केली तर वेगवेगळ्या जातीचे बियाणे वेगवेगळ्या प्रमाणात लागते. उदाहरणच घ्यायचे झाले तर हरभऱ्याचे विजय व फुले विक्रम हेक्टरी 65 ते 70 किलो पर्यंत लागते तर विराट आणि विजय सारख्या वाणाचे बियाणे हे हेक्टरी 100 किलो बियाणे लागते.
नक्की वाचा:Crop Tips: टोमॅटोपासून हवे भरपूर उत्पादन तर वापरा 'या' टिप्स, मिळेल भरपूर उत्पादन आणि नफा
दुसरी पद्धत म्हणजे पेरणी न करता सरी-वरंब्यावर देखील हरभरा लागवड करता येते. यामध्ये जमीन जर भारी या प्रकारातील असेल तर 90 सेंटिमीटर रुंदीच्या सऱ्या पाडून त्यामध्ये वरंब्याच्या दोन्ही बाजूला दहा सेंटिमीटर अंतरावर एक बियाने टाकावे. या काही महत्त्वपूर्ण लागवडीच्या पद्धती आहेत.
हरभऱ्याचे सुधारित वाण
जर आपण हरभऱ्याच्या सुधारित वाणांचा विचार केला तर मर रोगास प्रतिकारक्षम असलेल्या व जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी उपयुक्त अशा विजय,दिग्विजय,फुले विक्रांत आणि विक्रम या जाती चांगल्या आहेत. यापैकी फुले विक्रांत या वाणाचा विचार केला तर बागायत क्षेत्रासाठी हे चांगले वाण आहे. काबुली हरभरामध्ये विराट हा वाहन आतिशय उत्पादनक्षम असून मर रोगाला प्रतिकारक्षम आहे.
Published on: 07 October 2022, 07:41 IST