Agripedia

आज आपण बीज प्रक्रिया व त्याचे होणारे फायदे याचे महत्त्व जाणून घेणार आहोत.

Updated on 25 June, 2022 9:23 PM IST

आज आपण बीज प्रक्रिया व त्याचे होणारे फायदे याचे महत्त्व जाणून घेणार आहोत.बीज प्रक्रिया (बीज संस्कार)1) जवळ जवळ सर्व बियाणे कंपन्यांच्या बियाण्यास रासायनिक बीज प्रक्रिया केलेली असल्याने रासायनिक बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही.2) जैविक बीज प्रक्रिया - करताना दोन पाकिट बियाणास साधारणपणे साधारण पणे 1 किलो बियाणे प्लास्टिकच्या टोपलीत टाकून त्यावर योग्य प्रमाणात गुळ मिश्रित पाणी शिंपडावे व त्यानंतर अझीटोबेकटर 25 ग्रॅम व पी एस बी 25 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम लावून योग्य प्रमाणे बियाण्यास चोळावे व 30 मिनिटे सावलीत वाळवावे.

3) जैविक बीज प्रक्रिया करण्यासाठी एक लिटर पाण्यात 100 ग्रॅम गूळ टाकून ते पाणी उकडून थंड करावे.बीज प्रक्रिया / बीज संस्कारा मुळे होणारे फायदे१) बियाणे लवकर उगवण्यास मदत होते.2) मुळ्यांच्या संख्येत वाढ होते.3) पानात हरितद्रव्य तयार होण्याच्या क्रियेचा वेग वाढतो.4) जिवाणू संवर्धकातील जिवाणू मुळाच्या कक्षेत इंडोल ऍसिटिक ऍसिड, विटामिन बी या सारख्या द्रव्यांची निर्मिती करतात त्यामुळे झाडांची जोरदार वाढ होते.5) मित्र बुरशीनाशक कामुळे जमिनीत प्रतिजैविकांची निर्मिती होते त्यामुळे जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा नायनाट होतो.

बीज प्रक्रिया (बीज संस्कार)1) जवळ जवळ सर्व बियाणे कंपन्यांच्या बियाण्यास रासायनिक बीज प्रक्रिया केलेली असल्याने रासायनिक बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही.2) जैविक बीज प्रक्रिया - करताना दोन पाकिट बियाणास साधारणपणे साधारण पणे 1 किलो बियाणे प्लास्टिकच्या टोपलीत टाकून त्यावर योग्य प्रमाणात गुळ मिश्रित पाणी शिंपडावे व त्यानंतर अझीटोबेकटर 25 ग्रॅम व पी एस बी 25 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम लावून योग्य प्रमाणे बियाण्यास चोळावे व 30 मिनिटे सावलीत वाळवावे.3) जैविक बीज प्रक्रिया करण्यासाठी एक लिटर पाण्यात 100 ग्रॅम गूळ टाकून ते पाणी उकडून थंड करावे.

जिवाणू संवर्धकातील जिवाणू मुळाच्या कक्षेत इंडोल ऍसिटिक ऍसिड, विटामिन बी या सारख्या द्रव्यांची निर्मिती करतात त्यामुळे झाडांची जोरदार वाढ होते.मित्र बुरशीनाशक कामुळे जमिनीत प्रतिजैविकांची निर्मिती होते त्यामुळे जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा नायनाट होतो.मित्र जीवाणू हे जमिनीत पोली सॅक्रेड हा चिकट द्रव्य निर्माण करतात त्यामुळे जमिनीची पोत (कस) सुधारण्यास मदत होते.

 

भगवती सिड्स,चोपडा

जिल्हा जळगाव

प्रा.दिलीप शिंदे सर

9822308252

English Summary: This is important advice on seed processing in cotton crop
Published on: 25 June 2022, 09:23 IST