आपल्याकडे मुळा लागवड फार कमी प्रमाणात होते. म्हणजेच पाहिले तर महाराष्ट्र मध्ये फार मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.त्यामुळे बाजारांमध्ये मुळ्याची मागणी चांगल्याप्रकारे दिसून येते. सर्व शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या निरीक्षणानुसार शास्त्रीय पद्धतीने मुळा लागवड केली तर आर्थिक उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकते. या लेखात आपण मुळा लागवड च्या सोप्या पद्धती जाणून घेणार आहोत.
मुळाशेतीसाठी आवश्यक असलेले तापमान
मुळ्याची वाढ होण्यासाठी साधारण दहा वीस ते पंचवीस सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. या तापमानामध्ये मुळांची वाढ जलद होते. परंतु मुळाला चांगला स्वाद आणि कमी तिखटपणा यावा यासाठी मुळाच्या वाढीच्या काळात तापमान हे पंधरा ते तीस अंश सेल्सिअस असावे.
आवश्यक जमीन
मुळांची वाढ सरळ आणि चांगली व्हावी यासाठी जमीन चांगल्याप्रकारे भुसभुशीत करावी. जमीन भुसभुशीत नसेल तर मूळ यांचा आकार वाकडा होतो आणि त्यावर असंख्य प्रकारचे तंतू मुळे येतात. मुळा लागवडीसाठी तशी मध्यम ते खोल, भुसभुशीत किंवा रेताड जमिनीत मला चांगल्या प्रकारे पोसलाजातो.चोपन जमिनीमध्ये मुळ्याची लागवड करू नये.
मुळ्याच्या सुधारित जाती
पुसा चेतकी, पुसा रेशमी, पुसा देशी, पुसा हिमानी, जपानीज व्हाईट, गणेश सिथेटिंग यामुळेच या जाती आशियाई किंवा उष्ण समशीतोष्ण हवामानात चांगल्या वाढणाऱ्या जाती आहेत.
मुळात पिकाच्या अधिक उत्पादनासाठी कोणती काळजी घ्यावी?
मुळात पिके कमी कालावधीत येणारे पीक आहे त्यामुळे चांगले उत्पादन मिळण्यासाठी या पिकाला खते वेळेवर द्यावी. जमिनीत मशागत करताना चांगले कुजलेले शेणखत पंचवीस टनापर्यंत दर हेक्टरी जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळून द्यावे.कोरड्या जमिनीमध्ये मुळाची लागवड करू नये.लागवड केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे.
अशा पद्धतीने करा लागवड
- मुळ्याची लागवड करताना दोनओळीं मध्ये 30 ते 45 सेंटिमीटरअंतरआणि दोन रोपांमध्ये आठ ते दहा सेंटिमीटर अंतर ठेवावे.
- लागवड करताना ती सपाट वाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर केली जाते. दोन वरंब्यात मधील अंतर हे मुळ्याच्या जातीवर अवलंबून असते.
- जातीपरत्वे विचार केला तर युरोपीय जातीसाठी हे अंतर तीस सेंटिमीटर ठेवतात. आशियाई जाती करता 45 सेंटिमीटर अंतर ठेवणे चांगले असते. वरंब्यावर लागवड करताना ती आठ सेंटिमीटर अंतरावर दोन ते तीन बिया टोकण करून पेरणी करतात. सपाट वाफ्या मध्ये लागवड करताना 15 सेंटीमीटर वर लागवड करावी.
- बियांची पेरणी दोन ते तीन सेंटिमीटर खोलीवर करावी.जमिनीत पुरेसा ओलावा असावा.मुळ्याची लागवड कमी अंतरावर केल्यास मध्यम आकाराचे मुळे मिळवून उत्पादन चांगले मिळते. मुळ्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी 10 ते 12 किलो बियाणे लागते.
किड व्यवस्थापन
मुळा पिकावर मावा या किडीचा उपद्रव ढगाळ हवामानात जास्त प्रमाणात होतो. तसेच काळी अळी ही प्रमुख कीड असते. या किडीची पिल्ले तसेच प्रौढ किडे पानांमधील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पिकाची पाने गुंडाळली जातात व रोप कमजोर होण्याची शक्यता असते. या किडीच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात वीस मिलिलिटर मॅलॅथिऑन मिसळून पिकावर फवारावे. ( स्त्रोत- मी E शेतकरी)
Published on: 29 September 2021, 10:53 IST