चवळी ही शेंग वर्गातील भाजी असून, महाराष्ट्रातून सर्व भागात तिची लागवड केली जाते. भाजीचे पीक म्हणून चवळीची लागवड मोठ्या शहरांच्या आसपास व ग्रामीण भागात मर्यादित स्वरुपात होते. कडधान्य म्हणून सुद्धा चवळीची लागवड होते.
महाराष्ट्रात जवळजवळ सर्व जिल्ह्यातून चवळीची थोड्याफार प्रमाणात लागवड केली जाते. सलग मोठ्या क्षेत्रात व्यापारी तत्त्वावर चवळीची लागवड सध्या करत आहेत. महाराष्ट्रामध्ये अंदाजे आठ हजार हेक्टर क्षेत्र चवळीच्या लागवडीखाली असून एकूण उत्पादन 32 ते 35 हजारमे.टन आहे.
जाती –
पुसा फाल्गुनी:- ही जात झुडूप वजा वाढणारे असून उन्हाळी हंगामासाठी अतिशय चांगली आहे शेंगा गडद हिरव्या रंगाच्या असून 10 ते 12 सेमी पर्यंत लांब असतात. त्यांचे दोन बहर येतात.लागवडीपासून सात दिवसात शेंगांची काढणी सुरुवात होते.हेक्टरी90 ते 110 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
पुसा कोमल:-
ही जात करपा रोगास प्रतिकारक असून याची रोपटे झुडूपवजा व मध्यम उंचीचे असते. 90 दिवसात पीक तयार होते.हेक्टरी 90 ते 100 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
पुसा दो फसली :-
ही झुडूप वजा वाढणारी जात असून उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही हंगामात लागवड करता येते. शेंगा सुमारे 18 सेमी लांब असून शेंगाची काढणी लागवडीपासून 67 ते 70 दिवसात सुरू होते.हेक्टरी उत्पन्न 100 क्विंटलपर्यंत मिळते.
पुसा बरसाती :-
ही जात लवकर येणारी (45 दिवस) असून पाऊस आहे किंवा खरीप हंगामासाठी उपयुक्त आहे. शेंगा 15 ते 25 सेंमी लांब असून त्यांचे दोन तीन बहारयेतात. या जातीच्या हिरव्या चवळीची उत्पादन 85 ते 90 क्विंटल प्रति हेक्टरी होते.
असीम :-
ही जात आशी ते 85 दिवस मदतीची असून खरीप हंगामासाठी अधिक योग्य आहे. पहिली तोडणी 45 दिवसात मिळते. एकूण आठ ते दहा तोडण्या 35 ते 40 दिवसात आटोपता तया जातीच्या शेंगा फिकट हिरव्या मांसल आणि रसरशीत 15 ते 18 सेमी लांब असतात. मी पांढऱ्या रंगाचे असून फुले पांढऱ्या रंगाची असतात. हिरव्या शेंगा ची हेक्टरी उत्पादन खरीप हंगामात 75 तर उन्हाळ्यात 60 क्विंटल असते.
ऋतुराज :- झुडूप वजा वाढणारी जात असून पेरणीनंतर उन्हाळ्यात चाळीस दिवसांनी आणि खरिपात तीस दिवसांनी फुलांवर येते. फुले जांभळी असून शेंगा 22 ते 24 सेमी लांब कोवळ्या असतात. खरीप हंगामात पहिली तोडणी 40 ते 45 दिवसांनी मिळते. त्यानंतर दहा-बारा तोडण्या होतात. हिरव्या शेंगा आणि बी या दोन्हींसाठी ही जात उपयुक्त असून प्रतिहेक्टरी शेंगांचे उत्पादन 85 क्विंटल पर्यंत मिळते बियाणे हेक्टरी उत्पादन दहा क्विंटलपर्यंत मिळते. खरीप हंगामात पिक 60 ते 65 दिवसात आणि उन्हाळी हंगामात 75 ते 80 दिवसात निघते.
Published on: 11 February 2022, 07:10 IST