रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. महाराष्ट्रात हरभरा खालील क्षेत्र वाढत जाऊन दोन हजार सतरा ते अठरा मध्ये 18 लाख हेक्टर च्या पुढे पोहोचले आहे तसेच सरासरी हेक्टरी उत्पादकता 8.62 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत जाऊन पोहोचले आहे.
पारंपारिक शेतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारित वानांचा वापर केल्यास या पिकाचे बंपर उत्पादन घेणे शक्य आहे. या लेखामध्ये आपण हरभऱ्याच्या काही सुधारित वाण विषयी सविस्तर माहिती घेऊ.
- सुधारित वाण :
- देशी हरभरा :-हा हरभरा मुख्यत व डाळिंकरिता व बेसनाकरिता वापरतात ह्या प्रकारामध्ये साधारणत: दाण्यांचा रंग फिकट काथ्याते पिवळसर असतो.दाण्यांहेक्टरीचा आकार मध्यम असतो.
- भारती ( आय. सी. सी.व्ही. 10):- हावाणजिरायती, तसेच बागायती परिस्थितीत चांगला येतो. हा वाण मर रोग प्रतिबंध असून 110 ते 115 दिवसात कापणीस तयार होतो.जिरायतीतहेक्टरी 14 ते 15 क्विंटल तर ओलीता मध्ये 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर अशी उत्पादन क्षमता आहे.
- विजय (फुले जी-81-1-1):- जिरायती, ओलिताखाली तसेच उशिरा पेरणीकरिता प्रसारित केला आहे मर रोगास प्रतिकारक्षम असून, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता. जिरायतीत हेक्टरी 15 ते 20 क्विंटल व ओलिताखाली 35 ते 40 क्विंटल व उशिरा पेरणी केल्यास 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर अशी उत्पादन क्षमता आहे.
- जाकी 9218 :- हा देशी हरभऱ्याचा अति टपोर दाण्याचा वाण आहे. हा वाण लवकर परिपक्व होणारा (105 ते 110 दिवस) आणि मर रोग प्रतिबंधकआहे.सरासरी उत्पन्न 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे.हा वाण शून्य मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त आहे. हा वाण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे.
काबुली हरभरा:हा हारभरा छोले भटूरे बनवण्यासाठी वापरतात या हरभऱ्याच्या प्रकारांमध्ये दाण्याचा रंग पांढरा असतो.
- श्वेता (आय.सी.सी.व्ही.-2)मर रोगास प्रतिकारक्षम आहे. दाणे टपोरे असून, जिरायतीमध्ये 85 ते 90 दिवसात तर ओलिताखाली 100 ते 105 दिवसात पक्व होतो. जिरायतीमध्ये 8 ते 10 तर ओलिताखाली 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
- पीकेव्ही काबुली-2 :- मर रोगास प्रतिकारक्षम पेरणीस उशीर व पाण्याचा ताण पडल्यास टपोरे पणा वर परिणाम होतो म्हणून या वाणाची लागवड योग्य वेळी ओलिताखाली करावी. ओलिताखाली उत्पादन 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
- विराट :- हा काबुली वाण टपोऱ्या दाण्यांचा आहे. हा वाण मर रोगास प्रतिकारक्षम असून, ओलिताखाली 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
- पीकेव्ही काबुली-4 :-या वाणाच्या दाण्याचा आकार अति टपोर आहे. मर रोगास साधारण प्रतिकारक्षम. या वाणाचे सरासरी उत्पादन 15 क्विंटल एवढे मिळते.
- गुलाबी हरभरा :-
- गुल्लक -1 :-टपोऱ्या दाण्यांचा वाण, मूळकुजव्या व मर रोगास प्रतिकार असून, दाणे चांगले टपोरे, गोल व गुळगुळीत असतात.फुटाणे तसेच डोळे तयार केल्यास त्यांचे प्रमाण डी -8 पेक्षा जास्त आहे.
- हिरवा हरभरा :-
- दाण्यांचा रंग वाळल्यानंतर सुद्धा हिरवा राहतो. उसळ, पुलाव करण्यास उत्कृष्ट.
- पीकेव्ही हरिता :- हा वाण ओलिताखाली लागवडीसाठी योग्य. मर रोगास प्रतिकारक. उत्पादन सरासरी 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी आहे.
Published on: 18 February 2022, 04:43 IST