Agripedia

शेती आणि कृषी सबंधित उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस शासनाकडून विविध पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात.

Updated on 10 February, 2022 12:17 PM IST

शेती आणि कृषी सबंधित उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस शासनाकडून विविध पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात. जेणेकरून कृषी क्षेत्रात आणखी गोडी निर्माण व्हावी. तर या लेखमध्ये जाणून घेऊ विवीध पुरस्कारांची महिती.

1) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार-   

हा पुरस्कार राज्यातील कृषी क्षेत्रात अती उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती/गट/संस्थेस दिला जातो. हा पुरस्कार राज्याच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. रु.75000 रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा सर्वोच्च पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच व्यक्ती/गट/संस्थेस देण्यात येतो.

2. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार-              

हा पुरस्कार कृषी व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय आणि सहकार व ग्रामीण विकास या क्षेत्रात अती उत्कृष्ट काम करणारे व्यक्ती/संस्थेस देण्यात येतो. रु.50000 चा धनादेश,स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र आणि सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)                        

3. जिजामाता कृषीभुषण पुरस्कार- 

कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे महिला शेतकरी यांना हा पुरस्कार देण्यात येतो. रु. 50000 चा धनादेश, स्मृतिचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व पती सह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यातून दरवर्षी देण्यात पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)             

                                   

4. कृषी भुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार-

सेंद्रीय शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी/संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो.

रु. 50000/- चा धनादेश, स्मृतिचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पती सह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.     

राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)                        

                                                         

5. वसंतराव नाईक शेतिमीत्र पुरस्कार-  

 शेती क्षेत्रात प्रभावीरित्या विस्तार कार्य करणारे व्यक्ती/संस्था/वृत्तपत्र/साप्ताहिके/मासिके/दुरचित्रवाहिन्या यांना हा पुरस्कार दिला जातो. संबंधीत व्यक्ती शेतकरी असावा किंवा त्याच्या नावावर 7/12 असावा असे बंधन नाही. मात्र शेतकरी अस्ल्यास त्यास प्राधान्य देण्यात येईल. रु.30000 चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र, सपत्निक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.            

राज्यातून दरवर्षी देण्यात पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)                             

5. वसंतराव नाईक शेतिमीत्र पुरस्कार-  

 शेती क्षेत्रात प्रभावीरित्या विस्तार कार्य करणारे व्यक्ती/संस्था/वृत्तपत्र/साप्ताहिके/मासिके/दुरचित्रवाहिन्या यांना हा पुरस्कार दिला जातो. संबंधीत व्यक्ती शेतकरी असावा किंवा त्याच्या नावावर 7/12 असावा असे बंधन नाही. मात्र शेतकरी अस्ल्यास त्यास प्राधान्य देण्यात येईल. रु.30000 चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र, सपत्निक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.            

राज्यातून दरवर्षी देण्यात पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)                             

6. वसंतराव नाईक शेतिनीष्ठ शेतकरी पुरस्कार-    

शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नवनवीन पद्धतीने पिक लागवड, इतर शेतकरी यांना मार्गदर्शन करणे, शासन/सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर इत्त्यादी निकषांतर्गत शेतकरी यांचे एकंदरीत कार्य विचारात घेउन सर्व साधारण आणि आदिवासी गटातील शेतकरी यांना हा पुरस्कार दिला जातो. रु.11000 चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज्यातून दरवर्षी देण्यात पुरस्कार संख्या-40 ( सर्वसाधारण गटासाठी प्रती जिल्हा 1 याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रती विभाग 1 याप्रमाणे 6)

7. उद्यानपंडीत पुरस्कार-

फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

रु. 25000/-चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)                             

8. युवा शेतकरी पुरस्कार-

रु. 30000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या-8 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)    

प्रस्ताव सादर करतेवेळी शेतकरी यांचे वय 18 ते 40 वर्षे असावे.   

9. डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार-

हा पुरस्कार कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे साठी आहे.

राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार संख्या-9

( 8 कृषी विभागातून प्रत्येक एक अधिकारी/कर्मचारी आणि कृषी आयुक्तालय /मंत्रालय स्तरावरुन एक अधिकारी/कर्मचारी)

        

10.उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार-

राज्यातून दरवर्षी देण्यात पुरस्कार संख्या-1

आणखी सविस्तर महिती साठी आपल्या जवळच्या कृषी विभागास भेट द्यावी

English Summary: This is awards in agriculture sector know about
Published on: 10 February 2022, 12:17 IST