Agripedia

गंधक पिकाच्या वाढीसाठी लागणारे एक आवश्‍यक अन्नद्रव्य आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ले तयार करण्यासाठी

Updated on 19 February, 2022 10:56 AM IST

गंधक पिकाच्या वाढीसाठी लागणारे एक आवश्‍यक अन्नद्रव्य आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ले तयार करण्यासाठी गंधक काय एक आवश्यक घटक आहे. जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये गंधकाचा सहभाग महत्त्वाचा असून वनस्पती श्वसन क्रिया, तेलनिर्मिती व हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधक महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.

जास्त उत्पादन देणारे संकरित वाण प्रत्येक हंगामात गंधकाचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतात. परंतु आपल्याकडून जमिनीमध्ये त्या प्रमाणात गंधकयुक्त खते टाकली जात नाही.आपण जर विचार केला तर नत्रयुक्त खतामध्ये अमोनियम सल्फेट ऐवजी युरियाचा वापर वाढत आहे. पिके जेवढे स्फुरदमुळांद्वारे घेतात तेवढेच गंधकसुद्ध घेतात. या लेखात आपण गंधकाचे पिकांना होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

गंधकाचे महत्व(Importants of sulphur)

•गंधकाच्या वापरामुळे उत्पादन आणि लाभांशात वाढ होते.

•गंधकाच्या वापरामुळे कृषिमालाच्या उत्पादकतेत व गुणवत्तेत वाढ होते.

•गंधकाच्या वापराने जमिनीच्या आरोग्य आणि उत्पादकता टिकवता येते.

•गंधकाच्या वापराने नत्राची कार्यक्षमता वाढते व उपलब्धता देखील वाढते.

•गंधक आला भूसुधारक असे म्हणतात कारण गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

•गळित धान्य मध्ये प्रथिने व तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी गंधकाचा उपयोग होतो.

•गंधकामुळे पर्यावरण संवर्धन होते.

•इतर अन्नद्रव्यांसोबत सकारात्मक फायदा होतो.

गंधकाची कार्य

•गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. यामुळे पिकाच्या अन्ननिर्मिती ला चांगली चालना मिळते.

वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने,जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थ यामध्ये आढळते.हे तेलयुक्त पदार्थ वनस्पतींना तिखट वास प्रदान करते.

•गंधक हे अमायनो ऍसिड तयार करण्यासाठी मदत करते.

•गंधक हा मिथीओनाईन, थायमीन आणि बायोटीन यांचा महत्त्वपूर्ण घटक आहे.

•गंधक हा हरीतद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते.

•वनस्पतींच्या निरनिराळ्या विकराच्या व चयापचयाच्या क्रियेत मदत करते.

•फळे तयार होण्यास गंधकाचे अत्यंत आवश्यकता असते.

•गंधकाची कमतरता मुळेपिकामध्ये आढळून येणारी लक्षणे

•गंधकाचा अभाव असल्या पाने पिवळी पडतात.

फळे पिवळसर हिरवी दिसतात. फळांची वाढ कमी होते, रंग बदलतो व आतील गर कमी होतो.

•नवीन येणारी पाने आणि पालवी पिवळी पडू लागते.देठ किरकोळ व आखूड राहतात.कोवळ्या पानांवर जास्त परिणाम दिसतो.

•द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरणाचे गाठीचे प्रमाण कमी होते.

•पानगळ लवकर होते. पानांच्या कडा व शेंडे आतल्या बाजूस सुरळी होऊन गळतात

•प्रथिने आणि तेलाचे प्रमाण घटते.

English Summary: This is a crop growth essential nutrient
Published on: 19 February 2022, 10:56 IST