Agripedia

शेतीव्यवसायाला चालना देण्यासाठी सरकार नेहमी काही ना काही योजना घेऊन येत असते.

Updated on 05 March, 2022 2:11 PM IST

शेतीव्यवसायाला चालना देण्यासाठी सरकार नेहमी काही ना काही योजना घेऊन येत असते. आता शेतकऱ्यांचे (farmers) उत्पादनात वाढ होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जालना जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जालनामध्ये रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. या शेतीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी बैठक घेतली.

बैठकीमध्ये शेतकऱ्यांना यावर्षी 1 हजार 800 एकरावर आणि येणाऱ्या 5 वर्षात 5 हजार एकरावर तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना (farmers) सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात नक्किच वाढ होणार आहे.

प्रशासनाचे नियोजन –

1) जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे की या महिन्यात जालना जिल्ह्यात पोकरा, मनगेरा, शेतकऱ्यांच्या रोपवाटिका आणि वनीकरण विभागाच्या

रोपवाटिका यांच्या माध्यमातून 55 लाख तुतीची रोपे तयार केली जाणार आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

2) 3 वर्षांसाठी तुती लागवडी व कीटक संगोपन गृह बांधकामासाठी मंजुरी व सामग्रीसाठी प्रत्येक एकरासाठी 3 लाख 32 हजार 740 रुपयांचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि हा लाभ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिला जाणार आहे.

3) शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी कृषी विभागाच्या पोकरा योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार.

आवश्यक कागदपत्रे

• सातबारा, 8 अ नमुना

• आधार कार्ड

• बॅंक पासबुकची झेरॉक्स

• दोन फोटो आणि रेशीम मंडळाच्या अर्जाचा नमुना

English Summary: This is a big decision taken by the District Collector to increase the income of the farmers.
Published on: 05 March 2022, 02:11 IST