ऊस लागवड केल्यानंतर पूर्ण उगवणीसाठी सहा ते आठ आठवडेकालावधी लागतो. सुरुवातीच्या काळात वाढ हळू होते. उसाच्या दोन सऱ्यांमध्ये मोकळ्या जागेतआंतरपीक घेतल्याने तणांचे प्रमाण कमी होते.सुरू उसामध्ये भुईमूग,मेथी,कोथिंबीर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतरपिके फायद्याची ठरतात
द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोतही सुधारतो.उसामध्ये आंतरपीक घेतल्याने नक्कीच फायदा होतो. प्रामुख्याने उसाचे निव्वळ उत्पन्नात वाढ होते.उसाचे बियाणे खते व आंतरमशागतीसाठी झालेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघतो.
- सुरू ऊस कांदा :- सुरू ऊस सहा ते आठ आठवड्यांचा झाल्यानंतर म्हणजेच त्याचे कोंब जमिनीवर उगवून आल्यानंतर कांदा या पिकाच्या रोपाची वरंब्याच्या दोन्ही बाजूला लागण करावी. या आंतरपीक पद्धतीमध्ये कांद्याला उसाबरोबरच पाणी आणि खते मिळतात.त्यामुळे त्याला वेगळे पाणी आणि खत देण्याची गरज भासत नाही. कांद्याची मुळे ही जमिनीत खूप खोलवर जात नाहीत. ती फक्त पाच ते सहा सें.मी. एवढेच खोलीवर जातात. त्यामुळे ते तेवढ्याच जमिनीतून अन्नद्रव्ये शोषून घेतात. त्याचा ऊस या मुख्य पिकावर कोणताही परिणाम होत नाही. विशेषत: सुरुवातीच्या काळात उसाची वाढ खूप मंद गतीने होते तर त्याच काळात कांद्याची वाढ खूप जलद गतीने होते. त्यामुळे कांदा काढण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यात तयार होतो.आंतरपीक म्हणून कांद्याचे लागवड केलेली उत्पादकता सरासरी 150 ते 200 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी मिळते. कारण या कांद्याची लागवड आपण रोपांची पुनर्लागवड करून केलेली असते असे हे आंतरपीक ऊस या मुख्य पिकाबरोबर पाणी, प्रकाश, अन्नद्रव्ये या बाबतीत कुठेही स्पर्धा करत नाही.व शेतकऱ्याला दुहेरी उत्पन्न मिळवून देते.
- सुरू ऊस भुईमूग :- ही आंतरपीक पद्धती जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी तसेच अतिरिक्त उत्पन्न व नफा मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सुरू उसाचे कोंब जमिनीवर आल्यावर भुईमूग या पिकाची लागवड टोकण पद्धतीने वरंब्याच्या दोन्ही बाजूला करावी. त्यांच्याप्रमाणेच भुईमूग या पिकाला वेगळी अन्नद्रव्ये तसेच पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही. सुरुवातीलाच खताबरोबर जमिनीमध्ये अन्नद्रव्ये मिसळलेली असतात.तसेच ऊस पिकाच्या गरजेनुसार पिकाला पाणी दिले तरी चालते. भुईमूग हे पीक जमिनीत नत्र स्थिरीकरण करणारे पीक आहे. या पिकांच्या मुळांच्या गाठीत रायझोबियम नावाचे जीवाणू हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण सहजीवी पद्धतीने करतात. भुईमूग या पिकाने स्थिर केलेले नत्र नंतर सुरू ऊस या पिकाला उपलब्ध होते.याचा मोठा फायदा ऊसाला होतो. उसाच्या वाढीवर भुईमूग या आंतर पिकावर कोणताही परिणाम करत नाही. या पद्धतीमधून भुईमुगाचेहेक्टरी 10 ते 15 क्विंटल उत्पन्न मिळवता येते
- सुरू ऊस - मेथी /कोथिंबीर :- हे आंतरपीक शक्यतो शहराच्या जवळपास असणाऱ्या उस क्षेत्रांमध्ये घेतली जाते. उन्हाळ्यामध्ये मेथी/कोथिंबीर या भाज्यांना बाजारात खूप मागणी असते. त्यामुळे शेतकरी नगदी पैसा मिळवण्यासाठी सुरु उसात मेथी/कोथिंबीर या भाज्यांची लागवड करावी. ऊस उगवून आल्यानंतर दोन्ही वरंब्याच्या बाजूने मेथी कोथिंबीर यांची लागवड करावी. या आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना कमी कालावधीत नगदी पैसा पिकावर कोणताही परिणाम होत नाही.
- सुरू ऊस काकडी/कलिंगड:-ही आंतरपीक पद्धती उन्हाळ्यामध्ये काकडी/ कलिंगड या वेलवर्गीय फळपिकांना असलेली मागणी लक्षात घेऊन केली जाते. या आंतरपीक पद्धतीत जेव्हा सुरू उसाचे पीक सहा ते आठ आठवड्याचे होते म्हणजेच उसाचेकोंब उगवून जमिनीवर येतात त्यावेळी प्रत्येक वरंब्याच्या एका कडेला साधारणपणे दोन फूट अंतरावर एक बी याप्रमाणे टोकण पद्धतीने लावतात. काकडी/कलिंगड हे वेलवर्गीय फळपीक असल्यामुळे हे जमिनीवर समांतर पद्धतीने वाढते. या वेलाची वाढ वरंब्यावर केली जाते.
- तसेच या वेळा ची फळे वरंब्यावर सरीमध्ये जिथे ऊस कोंबामध्ये अंतर आहे. अशा ठिकाणी वाढवली जातात. या आंध्र पिकाला कोणत्याही प्रकारची वेगळी अन्नद्रव्ये तसेच पाणी देण्याची आवश्यकता नसते. तसेच या पिकामुळे ऊस या पिकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. तसेच त्यांच्या वाढीवर कोणताही परिणाम होत नाही.
आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यास काकडीचे 75 ते 100 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. तसेच कलिंगडापासून 200 ते 250 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.ही आंतरपिके तीन ते साडेतीन महिन्यात येणारी असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात यानंतर पिकांना बाजारात खूप मागणी असते. व तसेच ही आंतरपिके शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देतात.
Published on: 28 February 2022, 05:06 IST