Agripedia

भारतात तीन हंगामात शेती केली जाते. खरीप, रबी आणि उन्हाळी ह्या तिन्ही हंगामात भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. भारतातील बहुतांशी भागात मोसमी शेती केली जाते म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती केली जाते. भारतात खरीप हंगामातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. 'कापुस' हे पिक देखील खरीप हंगामातील एक महत्वाचे पिक आहे. महाराष्ट्रात देखील कापसाचे चांगले मोठे उत्पादन घेतले जाते.

Updated on 13 October, 2021 11:12 AM IST

भारतात तीन हंगामात शेती केली जाते. खरीप, रबी आणि उन्हाळी ह्या तिन्ही हंगामात भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. भारतातील बहुतांशी भागात मोसमी शेती केली जाते म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती केली जाते. भारतात खरीप हंगामातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. 'कापुस' हे पिक देखील खरीप हंगामातील एक महत्वाचे पिक आहे. महाराष्ट्रात देखील कापसाचे चांगले मोठे उत्पादन घेतले जाते.

खान्देशांत देखील कापसाचे क्षेत्र लक्षणीय आहे. खरीप हंगामात घेतले जाणाऱ्या ह्या पिकात ह्या दिवसात अनेक रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता असते. अनेक किडी कापसाच्या पिकावर आक्रमण करतात आणि कापुस उत्पादनात ह्यामुळे मोठी घट घडून येते.

कापुस पिकात सर्वात जास्त हानी होते ती गुलाबी बोन्ड अळी ह्या किडीमुळे. ह्या वर्षी देखील गुलाबी बोन्ड अळीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. ह्या वर्षी ह्या किडीचा प्रादुर्भाव हरियाणा, पंजाब, राजस्थान तसेच महाराष्ट्राच्या काही भागातील कापसाच्या क्षेत्रावर दिसून येत आहे. भारतात कापसाचे सर्वात जास्त उत्पादन हे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात घेतले जाते. कापुस पिकात गुलाबी बोन्ड अळी व्यतिरिक्त देखील काही किडी आहेत ज्यामुळे उत्पादनात प्रचंड घट घडून येते जर वेळीच ह्या किडिंवर नियंत्रण केले गेले नाही तर कापुस उत्पादनात मोठी घट घडून येण्याची शक्यता असते. गुलाबी बोन्ड अळीमुळे कापुस उत्पादनात 60 ते 70 टक्के घट घडून येते असं सांगितले जाते. आज आपण कापुस पिकाला क्षती पोहचवणाऱ्या दोन किडीविषयी जाणुन घेणार आहोत तसेच त्यावर प्रभावी नियंत्रण कसे करायचे हे देखील जाणुन घेणार आहोत.

त्या दोन किडी आहेत पांढरी माशी आणि अमेरिकन लष्करी अळी

 पांढरी माशी

कापसावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव अधिक होतो. ही माशी कापसाच्या पानांच्या खालच्या पृष्ठभागावर राहतात आणि पानांचा रस चोखतात. ह्या किडीच्या प्रादुर्भाव मुळे कापुस पिकाचे झाडे कमकुवत बनतात त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. पांढरी माशी झाडांवर एक चिकट पदार्थ सोडते, ज्यामुळे झाडावर बुरशी चाल करू लागते. आणि पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. हे टाळण्यासाठी अनेक कृषी वैज्ञानिक पिकचक्र अवलंबण्याचा सल्ला देतात. ह्या पिकचक्रचा म्हणजेच रोटेशन पद्धत्तीने पिके घेण्याचा फायदा होतो असं सांगितले जाते.  कापुस पिकासाठी एकरी 2-3 पिवळे ट्रॅप वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसला तर Acetamiprid 40 gm किंवा Acephate 75% WP 800 gm 200 ltr पाण्यात किंवा Thymethoxam 40 gm किंवा Imidaclorpid 40 ml 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 अमेरिकन लष्करी अळी

अमेरिकन लष्करी अळी नावात अमेरिका शब्दोल्लेख आहे पण भारतासाठी आणि कापुस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तो जास्त परिचयचा आहे. ह्या किडीमुळे कापसाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या अळीच्या हल्ल्यामुळे कापुस पिकामध्ये गोल छिद्रे तयार होतात. या छिद्रांच्या बाहेरील बाजूस अळीची विष्ठा दिसून येते. असे सांगितलं जात की, एकच अळी 30-40 कापसाच्या झाडांचे नुकसान करू शकते. ह्या अळीचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी लाईटिंग कार्ड, विजेरीचा, बल्बचा किंवा फेरोमोन कार्डचा वापर करण्याचा सल्ला कापुस उत्पादक शेतकरी देत असतात. 

आपल्या वावरात सतत एकच पिक घेऊ नये म्हणजे रोटेशन पद्धत वापरावी. ह्या प्रकारच्या किडिंपासून संरक्षण करण्यासाठी पूर्व मशागत महत्वाची ठरते. पूर्व मशागत केल्यानंतर आणि कापुस टोकन किंवा पेरणी करण्यापूर्वी शेतातील / वावरातील पिकांचे अवशेष, तन, पाला पाचोळा पूर्णपणे वेचून घ्यावे आणि वावर चांगले स्वच्छ करून टाकावे.  कापुस पिकात पाण्याचे नियोजन महत्वाचे ठरते. पाण्याचा जास्त वापर झाला आणि जमिनीत दलदल तयार झाली तर ह्या लष्करी अळी सक्रिय होतात आणि मोठ्या प्रमाणात क्षती पोहचवू शकतात, म्हणुन योग्य प्रमाणात पाणी वापरावे आणि जास्त नायट्रोजनयुक्त खताचा वापर करू नये कारण नायट्रोजेन हवेत देखील असते त्यामुळे त्याचा अतिरेक होऊ शकतो आणि त्यामुळे ह्या किडिंचे पालन पोषण होते.

English Summary: this insect dengerous for cotton crop
Published on: 13 October 2021, 11:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)