Agripedia

जमिनीमध्ये चांगला वाफसा आल्यानंतर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुरीची पेरणी पूर्ण करावी. जर तुरीची उशिरा लागवड केली तर पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची व्यवस्थित वाढ होत नाही तसेच फांद्याही कमी येतात. त्यामुळे उत्पादनात घट संभवते.

Updated on 18 December, 2021 12:37 PM IST

जमिनीमध्ये चांगला वाफसा आल्यानंतर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुरीची पेरणी पूर्ण करावी. जर तुरीची उशिरा लागवड केली तर पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस  पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची व्यवस्थित वाढ होत नाही तसेच फांद्याही कमी येतात. त्यामुळे उत्पादनात घट संभवते.

तुरीच्या लागवडीसाठी पूर्वमशागत

 तुरीची मुळे जमिनीत खोलवर जातात त्यामुळे जमिनीची चांगली नांगरट करावीकुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. जेव्हा तुम्ही वखराची दुसरी पाळी द्याल त्याआधी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे.काडीकचरा,पिकांचे अवशेषउचलून जमीन चांगली स्वच्छ करावे. नांगरट झाल्यानंतर जमीन चांगली तापू द्यावी. तसेच जमिनीची निवड करताना ती मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.शार युक्त आणि  चोपण जमिनीत हे पीक चांगले येत नाही.

  तुरीच्या सुधारित जाती

 आय सी पी एल-87,विपूला, फुले राजेश्वरी,  बी एस एम आर-853,  बी एस एम आर-736, बिडीएन-711, बीडीएन- 716

 तूर पिकाचे लागवड तंत्र

  • आयसीपीएल 87 जातीच्या पेरणीसाठी हेक्‍टरी 18 ते 20 किलो बियाणे लागते.
  • मध्यम कालावधीच्या राजेश्वरी,विपुला  आणि बिडीएन 711 या जातींचे हेक्‍टरी 12 ते 15 किलो बियाणे पुरेसे आहे.
  • उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावरील जातींसाठी हेक्‍टरी पाच ते सहा किलो बियाणे टोकण पद्धतीने लावावे.

तूर पिकाचे लागवड अंतर

  • आयसीपीएल 87 या लवकर तयार होणाऱ्या जातीची45 ×10 सेंटी मीटर अंतरावर लागवड करावी.
  • मध्यम कालावधीतील जातीची 60×20 सेंटीमीटर किंवा 90×20 सेंटी मीटर अंतरावर लागवड करावी.

 तूर पिकासाठी खत व्यवस्थापन

  • पेरणी करणे अगोदर हेक्‍टरी पाचटन चांगले कुजलेले शेणखत शेवटच्या वखरणी वेळी पसरावे.
  • सलग तुरीसाठी पेरणीवेळी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद वेळेस द्यावे.
  • जर तूर पिकामध्ये आंतरपीक घेतले असेल तर ज्या पिकाच्या ओळी जास्त आहेत त्या पिकाची शिफारशीत खत मात्रा द्यावी.

 तूर पिकासाठी पाणी व्यवस्थापन

1-पीकवाढीच्या अवस्थेत,फुलोरा अवस्थेत आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. ठिबक सिंचनाने  50 टक्के बाष्पीभवन नंतर पाणी द्यावे.

  • पिकाला फुले येण्याच्या वस्थेत किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास 20 ग्रॅम युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेट किंवा डीएपी प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बीजप्रक्रिया

  • प्रतिकिलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धन दहा किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून प्रक्रिया करावी.
  • जमिनीमध्ये वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा दरम्यान पेरणी पूर्ण करावी. जर उशिरा लागवड केली तर पिकास लवकर पेरलेल्या पिकावर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात.तसेच फुले आणि शेंगांचे संख्याही कमी राहते उत्पादनात घट येते.
English Summary: this important cultivation method of pigeon pea for more production
Published on: 18 December 2021, 12:37 IST