Agripedia

शतावरी ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. लागवड नोव्हेंबर – डिसेंबर या दरम्यान केली जाते. बिया ठोकून किंवा गड्याच्या फुटव्यापासून लागवड केली जाते. पांढरी शतावरी 4 बाय 3 फूट आणि पिवळी शतावरी 3 बाय 3 किंवा 3 बाय 2 फूट अंतरावर लागवड करावी.

Updated on 26 February, 2022 6:33 PM IST

शतावरी ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. लागवड नोव्हेंबर – डिसेंबर या दरम्यान केली जाते. बिया ठोकून किंवा गड्याच्या फुटव्यापासून लागवड केली जाते. पांढरी शतावरी 4 बाय 3 फूट आणि पिवळी शतावरी 3 बाय 3 किंवा 3 बाय 2 फूट अंतरावर लागवड करावी.

 शतावरी लागवडीसाठी चांगला निचरा होणारी हलकी, मध्यम, रेताड जमीन निवडावी. ही वनस्पती उष्ण तसेच समशीतोष्ण हवामानात चांगली वाढते. जमिनीची नांगरट करून,कुळव्याच्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

 जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. त्यानंतर 5 फूट अंतराने 1 फूट खोल व 1 फूट रुंद असे चर खणावेत.चरातील माती काढून निम्म्या मातीत शेणखत मिसळून ती त्याच चरात निम्म्याने भरावी.व उरलेली माती रोपे भरताना वापरावी. साधारण 75 ते 90 सें.मी.अंतराच्या सऱ्या किंवा पाट पाडावेत.

  • लागवड तंत्र :-
  • लागवड ऑक्‍टोबर ते डिसेंबर या दरम्यान केली जाते.बिया टोकून किंवा गड्याच्या फुटव्यापासून किंवा कठीण खोडाच्या कलमापासून रोपे तयार करून लागवड केली जाते.
  • पांढरी शतावरी 4 बाय 3 फूट आणि पिवळी शतावरी 3 बाय 3 फूट किंवा 3 बाय 2 फूट अंतरावर लागवड करावी. साधारण 10ते 15 सें.मी.उंच फुटवे आलेली रोपे लावावीत.
  • पहिले 3ते 4 दिवस हलके पाणी द्यावे त्यानंतर एक दिवसाआड दोन वेळेस पाणी द्यावे. नंतर गरजेप्रमाणे 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी देणे गरजेचे आहे. झाडाच्या बुंध्याभोवती चर किंवा खड्ड्यावर पालापाचोळा किंवा गवत टाकून आच्छादन करावे.त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
  • लागवडीआधी मातीचे परीक्षण करावे. जमिनीचा प्रकार व मातीतील खतांचा प्रमाण यावर आधारित खतांची मात्रा ठरवावी. चांगल्या व निकोप वाढीसाठी सेंद्रिय खतांचा वापर जास्त प्रमाणात करावा.
  • लागवडीनंतर बुंध्याजवळील खड्ड्यातील माती खुरपून गड्यांना भर द्यावी. चांगल्या वाढीसाठी काठ्यांचा आधार द्यावा. ते शक्य नसल्यास टोमॅटोला तारा किंवा दोरी बांधतो, त्याप्रमाणे बांधून आधार द्यावा.
  • काढणी:-
  • लागवडीनंतर 18 ते 20 महिन्यांनी काढणी करता येते.
  • झपक्याने वाढलेल्या मुळा खणून काढाव्यात व वेलीची खोडी तशीच ठेवावीत.
  • काढलेली मुळे स्वच्छ करून लगेच मुळांवरील बारीक साल काढून 10 ते 15 सें.मी. लांबीचे तुकडे करावे. मुळा मधील शिरओढून काढावी.म्हणजे वाढण्याची प्रक्रिया लवकर होते.
  • उत्पादन :-
  • पांढरी शतावरी 10 ते 12टन प्रति हेक्‍टर मुळ्या मिळतात.
  • पिवळी शतावरी 4 ते 6 टन प्रति हेक्टर मुळ्या मिळतात.
  • औषधी महत्त्व :-
  • ही चवीसकडू व पचनास गोड असते.
  • ही वात व पित्त नाशक असून सर्व शरीर धातूंना बळ देणारी, बुद्धीचा तल्लख पणा वाढवणारी वा डोळ्यांना हितकारक आहे.
  • पित्तप्रकोप, अपचन आणि जुलाब यासाठी मधातून शतावरी दिली जाते.
  • शक्ती वाढवण्यासाठी शतावरी चूर्ण दुधात खडीसाखर मिसळून द्यावे.
  • मुतखड्यासाठी शतावरीचा रस सात दिवस सकाळच्या वेळी घ्यावा.
  • शरीरात वाढलेल्या पित्तामुळे छातीत दुखणे घशाला जळजळ, तोंड कोरडे पडणे, डोके दुखणे,
  • आंबट कडू ढेक, बेंबी भोवती पोट दुखणे या व्याधींवर गुणकारी आहे.
  • मूत्राशयाचा रोगावर व बाळंतपणात मातेस दूध सुटण्यासाठी शतावरी अत्यंत उपयुक्त आहे.
English Summary: this cultivation method important for shatavari cultivation
Published on: 26 February 2022, 06:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)